ताण – तणाव व्यवस्थापन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ताण – तणाव व्यवस्थापन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १७ एप्रिल, २०२५

वक्त्यांचा वेळेचा अपव्यवहार : एक वैचारिक अत्याचार

वक्त्यांचा वेळेचा अपव्यवहार : एक वैचारिक अत्याचार

एका रविवारी सकाळी आपल्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढत, आपण एका विद्वान वक्त्याच्या भाषणाला जाण्याचे ठरवतो. विषय रोचक असतो, समाज, शिक्षण, किंवा आपल्याला अंतर्मुख करणारा एखादा सामाजिक प्रश्न. आपण वेळेआधी पोहोचतो, निश्चित ठिकाणी बसतो, आणि कार्यक्रम सुरू होण्याची उत्सुकतेने वाट पाहतो. परंतु, ठरलेली वेळ उलटूनही मंच रिकामाच असतो. कार्यक्रम 30-40 मिनिटे उशिरा सुरू होतो. नंतर जेव्हा वक्ता भाषणाला सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला त्याचे विचार प्रगल्भ वाटतात, परंतु थोड्याच वेळात भाषण भरकटते पुनरुक्ती, विषयांतर, अंतहीन किस्से... आणि मग एक तास, दोन तास… वेळ हरवलेली असते. श्रोत्यांचे लक्ष हलकेच ढळते, चेहऱ्यावर कंटाळवाण्या भावछटा उमटतात. काहीजण आपले घड्याळ तपासतात, काहीजण निमूट कार्यक्रम सोडून निघून जातात.

शुक्रवार, २१ मार्च, २०२५

सोशल लिसनिंग: समाज माध्यमावरील चर्चेचे निरीक्षण | Social Listening

 

सोशल लिसनिंग: समाज माध्यमावरील चर्चेचे निरीक्षण

डिजिटल युगात सोशल मीडिया केवळ संवादाचे साधन राहिले नसून, तो व्यवसाय, संशोधन आणि धोरणात्मक निर्णयांसाठी महत्त्वाचा स्रोत बनला आहे. सोशल लिसनिंग (Social Listening) ही अशा चर्चांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आणि त्यातून उपयुक्त माहिती मिळवण्याची प्रक्रिया आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ग्राहक, संशोधक आणि धोरणनिर्माते आपले विचार, भावना आणि ट्रेंड शेअर करतात, आणि असे हे डेटाचे भांडार समाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते. सोशल लिसनिंगचा उपयोग व्यवसायांना ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यासाठी, संशोधकांना जनमताचा अभ्यास करण्यासाठी आणि धोरणकर्त्यांना महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी करता येतो. याशिवाय, संकट व्यवस्थापन, ब्रँड मॉनिटरिंग आणि स्पर्धात्मक विश्लेषण यासाठीही हे तंत्रज्ञान प्रभावी ठरते.

शुक्रवार, ७ मार्च, २०२५

आंतरराष्ट्रीय महिला दिन: इतिहास आणि महत्त्व | International Women's Day

 

आंतरराष्ट्रीय महिला दिन: इतिहास आणि महत्त्व

एकदा राजू आणि त्याचे वडील आनंदराव गाडी चालवायला पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर गेले होते. राजू नुकताच गाडी शिकलेला होता आणि त्याला वेगाची खूपच हौस होती. वडील वारंवार सूचना करत होते – "राजू, वेग जरा कमी कर! हायवेवर स्पीड लिमिट पाळली पाहिजे!"

पण उत्साही राजूने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. एका वळणावर त्याचा ताबा सुटला आणि गाडी जोरात दरीच्या कडेवर आदळली. मोठा आवाज झाला. धूर आणि चिखलाच्या ढगात सगळं हरवलं.

      गाडीच्या आघाडीच्या सीटवर असलेले आनंदराव जागीच संपले. पण राजू रक्ताच्या थारोळ्यात जिवंत होता. आजूबाजूच्या लोकांनी ताबडतोब मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले. त्याच्या आईला आणि नातेवाईकांना कळवण्यात आले.

दवाखान्यात धावपळ सुरू होती. डॉक्टरांनी तत्काळ ऑपरेशनची तयारी केली. राजूला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यासाठी स्ट्रेचरवर टाकण्यात आले. त्याचवेळी त्याच्या डॉक्टर पालकांना कळवण्यात आले. थोड्याच वेळात एक डॉक्टर आत धावत आले. त्यांचा चेहरा काळजीने भरलेला होता. त्यांनी पेशंटकडे पाहिलं आणि त्यांच्या तोंडून सहज उद्गार निघाले –

"हे तर माझं मुलं आहे!"

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

शाळा महाविद्यालयातील शिक्षण व्यवस्थेतून शिक्षण हद्दपार

 

शाळा महाविद्यालयातील शिक्षण व्यवस्थेतून शिक्षण हद्दपार

आज महावीर महाविद्यालयात प्राचार्य डॉ सुनीलकुमार लवटे सरांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभाच्या मनोगतात सरांनी आजच्या शिक्षण प्रणालीबाबत काही निरीक्षणे नोंदविली जी मला खूप अस्वस्थ करणारी होती. आजच्या शिक्षण व्यवस्थेतून शिक्षणच गायब झालेले आहे की काय? अशी अवस्था झालेली आहे. प्रत्यक्षात शिक्षण हा कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा कणा असतो. परंतु, आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये शाळा आणि महाविद्यालये शिक्षण केंद्र न राहता व्यवसायिक केंद्र बनली आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांचे औपचारिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. NEET आणि CET सारख्या स्पर्धा परीक्षा, खाजगी शिकवणीचे प्रस्थ, विद्यार्थ्यांची उदासीनता आणि बेरोजगारीमुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. या लेखात या सर्व घटकांचा सखोल आढावा घेतला आहे.

मंगळवार, २१ जानेवारी, २०२५

इयत्ता 12 वी नंतर करिअर निवड: अभ्यासक्रम, पात्रता, आणि प्रवेश परीक्षा | Entrance | NEET | CET

 

इयत्ता 12 वी नंतर करिअर निवड: अभ्यासक्रम, पात्रता, आणि प्रवेश परीक्षा

भारतामध्ये इयत्ता 12 वी नंतर प्रवेश घेण्यासाठी विविध कोर्सेस आणि त्यासाठी लागणारी पात्रता यांची माहिती विविध राज्यांमध्ये आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळी असू शकते. विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या कोर्सेसची निवड करता येते. खाली दिलेल्या माहितीमध्ये महाराष्ट्रातील इयत्ता 12 वी नंतर असलेल्या मुख्य प्रवेश परीक्षा आणि त्यासाठी आवश्यक असलेली पात्रता याविषयी माहिती दिलेली आहे.

मेडिकल (MBBS/ BHMS/ BAMS/ BDS)

भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, मेडिकल क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी NEET (National Eligibility cum Entrance Test) ही मुख्य प्रवेश परीक्षा आहे. MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) आणि BDS (Bachelor of Dental Surgery) या दोन प्रमुख वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना 12 वी मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) विषयांसह उत्तीर्ण व्हायला हवे. मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी यातील पात्रता आणि कठोर प्रवेश परीक्षा आवश्यक आहेत. NEET परीक्षेतील उच्च गुणांनुसार विद्यार्थ्यांना सरकारी व खाजगी कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळतो. मेडिकल क्षेत्राच्या शिक्षण पूर्ण केल्यावर डॉक्टर किंवा दंतवैद्य यांची भूमिका असू शकते.

मंगळवार, ७ जानेवारी, २०२५

तिशीनंतरही स्पर्धा परीक्षांच्या जंजाळात अडकलेली तरुण पिढी

तिशीनंतरही स्पर्धा परीक्षांच्या जंजाळात अडकलेले तरुण

महाराष्ट्र आणि भारतातील स्पर्धा परीक्षांना दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसाठी सुमारे 3.5 लाखांहून अधिक अर्ज येतात, परंतु उपलब्ध पदांची संख्या सुमारे 350 असते, ज्यामुळे निवडीचे प्रमाण 1% पेक्षाही कमी ठरते. पुणे शहर हे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. येथे MPSC आणि UPSC परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50 हजारापेक्षा जास्त आहे. देशपातळीवर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेसाठी दरवर्षी सुमारे 10 लाखांहून अधिक विद्यार्थी अर्ज करतात, परंतु अंतिम निवडीसाठी उपलब्ध पदांची संख्या मर्यादित असते. या आकडेवारीतून स्पष्ट होते की, स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, परंतु उपलब्ध पदांची संख्या मर्यादित असल्यामुळे स्पर्धा तीव्र आहे. या एकूण प्रक्रियेत तिशी ओलांडलेल्या तरी परीक्षा देणाऱ्या परमनंट बेकारांच्या जत्थ्यांची समस्या भारतातील सामाजिक, आर्थिक, आणि शैक्षणिक व्यवस्थेशी निगडीत एक गंभीर वास्तव आहे. शिक्षण, बेरोजगारी, आणि स्पर्धात्मक परीक्षांचे दुष्टचक्र यामुळे देशात लाखो तरुण हे वर्षानुवर्षे स्थिर रोजगार मिळवण्याच्या आशेने संघर्ष करत आहेत.

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

21 व्या शतकासाठी 21 धडे | 21 Lessons For The 21st Century

 21 व्या शतकासाठी 21 धडे | 21 Lessons For The 21st Century

मानवाची उत्क्रांती ही एक खूपच दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यात लाखो वर्षांच्या काळात शरीर, मेंदू, समाज आणि सांस्कृतिक विकास झाला आहे. हॉमिनिड्सचा उदय सुमारे 2.5 दशलक्ष वर्षांपूर्वी होमो हॅबिलिस नावाचा मानव उदयास आला, ज्याने पहिल्यांदा साधनांचा वापर केला. सुमारे 1.8 दशलक्ष वर्षांपूर्वी होमो इरेक्टसने आग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर केला. त्यांनी आफ्रिका ते आशिया आणि युरोपमध्ये स्थलांतर केले. भारतीय उपखंडात, सोहन आणि भीमबेटका यासारख्या स्थळांवर पाषाणयुगीन अवशेष आढळतात. सुमारे 300,000 वर्षांपूर्वी आधुनिक मानव (होमो सेपियन्स) आफ्रिकेतून उत्क्रांत झाला. त्यांनी विविध प्रसंग आणि घटनामधून अनुभूतुच्या आधारे बोधनिक (Cognitive) क्षमतांमध्ये मोठी वाढ घडवून आणली, ज्यामुळे भाषेचा विकास आणि सामाजिक संरचनांची निर्मिती झाली.

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

हॅपी हार्मोन्स | आनंदी संप्रेरके | Happy Hormones

 

हॅपी हार्मोन्स आनंदी राहण्यासाठी आवश्यक आहेत

कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आनंदी असणे खूप महत्वाचे आहे. तथापि, आज आपली जीवनशैली अशी बनली आहे की आपण आनंदी राहण्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही, परंतु आपणास हे माहित आहे का की अशा काही सवयी आहेत ज्या शरीरात फील गुड हार्मोन्स तयार करण्यास मदत करतात. आनंदी हार्मोन्स कोणते आहेत आणि त्यांचे प्रमाण संतुलित कसे ठेवता येईल याविषयी या लेखात जाणून घेऊया.

आनंदी संप्रेरकांचा (हॅपी हार्मोन्स) शोध एक दीर्घकालीन आणि संशोधन-आधारित प्रक्रिया होती, जी अनेक दशकांपासून चालू होती. ही संप्रेरके कशी कार्य करतात आणि त्यांचा मानसिक आरोग्याशी कसा संबंध आहे हे समजण्यासाठी वैज्ञानिकांनी विविध प्रयोग आणि अभ्यास केले. डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन्स या संप्रेरकांना आनंदी संप्रेरके म्हणून ओळखले जाते.

मंगळवार, २ जुलै, २०२४

कॉर्टिसॉल एक स्टेरॉईड हार्मोन | Cortisol Harmone

 

कॉर्टिसॉल एक स्टेरॉईड हार्मोन

ताण हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. परीक्षा, कामाचा ताण, आर्थिक अडचणी, वैयक्तिक संबंधांमधील समस्या अशा अनेक गोष्टी आपल्याला तणावाखाली आणू शकतात. जेव्हा आपण तणावाखाली असतो, तेव्हा आपले शरीर "लढा किंवा पळ" (fight-or-flight) मोडमध्ये जातं. या मोडमध्ये, आपले अधिवृक्क ग्रंथी (adrenal gland) कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन सोडतात. अनेकांच्या बाबतीत हा कोणत्याही कारणाशिवाय स्त्रवत राहतो त्यामुळे ओबेसिटी, विनाकारण येणारा ताण, अस्वस्थता किंवा कसंतरी होण हे यात समाविष्ट होत.

ताणासंबंधी शरीरशास्त्रीय कारणमीमांसा | Biological Bases of Stress

 

ताणासंबंधी शरीरशास्त्रीय कारणमीमांसा

ताण हे मानसिक दबाव निर्माण करते आणि शरीरामध्ये अल्प आणि दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम होणारे बदल घडवून आणते. ताणाच्या प्रतिक्रियेमध्ये दोन परस्पर संबंधित प्रणाली मोठ्या प्रमाणात सहभागी असतात. त्या म्हणजे अनुकंपी-अधिवृक्क मज्जासंस्था (SAM) प्रणाली आणि हायपोथॅलॅमस-पियुषिका-अधिवृक्क ग्रंथी अक्ष आहेत. मेंदूद्वारे अनुकंपी मज्जासंस्थेच्या नियंत्रणाखाली भय, क्रोध, उत्तेजना इत्यादी भावनांची निर्मिती होते. यांचे नियंत्रण प्रामुख्याने शरीरात ऐड्रिनैलिन यंत्रणेद्वारे केले जाते.

बुधवार, १५ मे, २०२४

बार्नम प्रभाव | Barnum Effect

 

बार्नम प्रभाव | Barnum Effect

पैशाचा जपून वापर करा, नातेसंबंधांत तणाव राहील, उशिरा पण चांगली नोकरी मिळेल, सुशील मुलीशी (पगारदार मुलाशी) लग्न करण्याची इच्छा लवकरच पूर्ण होईल, पगारवाढ होईल पण तणावसुद्धा वाढेल, रेंगाळलेली कामे मार्गी लागतील, मित्रपरिवाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, इत्यादी. आता तुम्हीच सांगा, कोणाला सुशील मुलगी/पगारदार मुलगा नकोय? कोणाला पगारवाढ नकोय? कोण आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवतो? कोणाचे नातेसंबंध साखरे सारखे गोड असतात. भविष्यवाणी करतांना ह्या अशाच "सर्वसामान्य" स्टेटमेंट्स आपणास सांगितल्या जातात ज्यातून 3-4 स्टेटमेंट्स तर नक्कीच आपल्या आयुष्याच्या सध्याच्या परिस्थितीला चपखल बसतात. (https://www.youtube.com/watch?v=DhFQjH40FgI हास्य जत्रा ओंकार भोजने यांनी सांगितलेली भविष्यवाणी आवश्य पहा)

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

वरिष्ठांची आज्ञा पाळणे | Obedience to Authority

 

वरिष्ठांची आज्ञा पाळणे Obedience to Authority

अलिकडे ठाणे जिल्यातील एका महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना त्या संबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे उघडकीस आला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोके ठेवायला भाग पाडून अमानुष मारहाण केली जात आहे. संबंधीत महाविद्यालयातील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचं प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडे देण्यात येतात. यावेळी विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. पण विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसीमध्ये जाण्यास घाबरत आहेत.

ही एवढी क्रूरता येते कोठून? त्या मुलाने संबंधीत मुलाला का मारहाण केली असेल? यामागे काही मानसशास्त्रीय काही कारणे आहेत का? मिलग्राम प्रयोग हा वरिष्ठांच्या आज्ञा पाळण्यावर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणारा एक प्रसिद्ध आणि वादग्रस्त अभ्यास झाला.

शुक्रवार, १९ एप्रिल, २०२४

आनंदाचे बीजगणित | The Algebra of Happiness

 

आनंदाचे बीजगणित | The Algebra of Happiness

जीवनात आनंदी राहायचे असेल तर खूप सोपे आहे, पण आनंदी आहे हे दाखवायचे असेल तर ते महाग आहे. कारण आनंदी असणं आणि आनंदी असल्याचे जगाला दाखविणे यासाठी धडपड करावी लागते. आजकाल लोक प्रवास करत असताना तो जगाला दाखयाच्या नादात प्रवासाचा आनंद घ्यायचाच विसरून जात आहेत. हे खाण-पीन आणि सगळ्याच गोष्टी दाखविण्यासाठीची जणू स्पर्धाच सुरु आहे त्यामुळे आनंदी जगण्याचे बीजगणित स्कॉट गॅलोवे यांनी ‘द अल्जेब्रा ऑफ हॅपिनेस’ या पुस्तकातून मांडलेला आहे.

स्कॉट गॅलोवे हे न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथे मार्केटिंगचे प्राध्यापक आहेत, कदाचित आपणास ते सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक द फोर: द हिडन डीएनए ऑफ ऍमेझॉन, ऍपल, फेसबुक आणि गुगलचे लेखक म्हणून माहित असतील (जर माहित नसतील तर त्यांचे हे पुस्तक वाचलेच पाहिजे). द अल्जेब्रा ऑफ हॅपिनेस हे गॅलोवेचे दुसरे पुस्तक आहे आणि ते आनंदी जीवनाच्या मूलभूत गोष्टींबद्दल त्यांचा दृष्टीकोन दर्शविते. गॅलोवेच्या वैयक्तिक अनुभवातून छोट्या छोट्या रंजक कथामधून आपल्या संपत्तीपासून आरोग्यापर्यंत, आणि आपल्या प्रेम संबंधाविषयीची शिकवण सदर पुस्तकातून दिलेली आहे.

गुरुवार, २१ मार्च, २०२४

विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस | Mindfulness for children

 

विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस | Mindfulness for children

दोन बौध्द भिक्खू नदी ओलांडत होते तेव्हा वृद्ध भिक्खूने पाहिले की एक तरुणी नदी पार करण्याचा प्रयत्न करीत आहे. नदी खोल असल्याने ती मुलगी म्हणेल, माझा हात धर या विचाराने तो घाबरला होता. ती एक 18 वर्षाची सुंदर मुलगी होती, तो तिच्याजवळून जात असताना त्या मुलीने विचारले की, "मला नदी पार करण्यास मला मदत कराल का?"

तो वृद्ध भिक्खू म्हणाला, मला माफ करा, मी एक भिक्खू आहे आणि मी महिलांना हात लावत नाही. त्याचे हात पाय थरथर कापू लागले आणि तो घाबरून धावत धावत नदी पार गेला. निसर्गाचे आभार मानले की आपण वाचलो, एक संकट सांगून उभे होते, खड्ड्यात पडण्यापासून वाचलो. नदीच्या किनाऱ्यावर पोहचल्यावर मागे वळून पाहिलं तर त्यास मोठा आश्चर्याचा धक्का बसला. त्या आश्चर्यामध्ये थोडा मत्सर आणि थोडी ईर्ष्या देखील होती.

रविवार, २८ जानेवारी, २०२४

ताण-तणावापासून सुटकेसाठी संरक्षण यंत्रणा |Défense Mechanism

 ताण-तणावापासून सुटकेसाठी संरक्षण यंत्रणा (Défense Mechanism)

मानसशास्त्रज्ञांच्या मदतीशिवाय आपल्या समस्यांचे खरे कारण समजून घेणे आपल्यासाठी अवघड जाते का? कारण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्या लक्षात येईल की, अनेकदा हे कार्य अबोध पातळीवर सुरु असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा आपण नकळतपणे स्वतःची फसवणूक करतो तेव्हा ते आपल्यासाठी सोपे होते. हे एखाद्या व्यक्तीसाठी मानसिक संरक्षणाचे एक चांगले, पर्यावरणास अनुकूल कार्य असते. पण दुसरीकडे, ते आपले नुकसान करतात कारण ते वास्तवाचा विपर्यास करतात आणि आपल्या समस्यांकडे डोळेझाक करतात. नेमके हे प्रकरण काय आहे हे सविस्तर पाहू या.

फ्रॉईडचा असा विश्वास होता की, मनाचे बोध, बोधपूर्व आणि अबोध असे तीन स्तर असतात. तसेच फ्रॉईडने असे प्रतिपादन केले की व्यक्तिमत्त्वाचे तीन भाग असतात. हे तीनही भाग परस्परसंबंधित असतात. त्यांच्यात सतत आंतरक्रिया सुरू असते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती अशी की, फ्रॉईडने सुचवलेले हे तीनही भाग म्हणजे प्रत्यक्षातील मेंदूत असणारे शारीरिक भाग नसून व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी मांडलेल्या सांकेतिक संकल्पना आहेत.

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

शाश्वत विकास आणि भारत | Sustainable Development and India

 शाश्वत विकास आणि भारत

शाश्वत विकास अहवाल 2023 हा डब्लीन युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे जून, 2023 मध्ये प्रकाशित झाला. ही शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने सर्व सदस्य राष्ट्रांच्या प्रगतीच्या वार्षिक मूल्यांकनाची आठवी आवृत्ती आहे. या अहवालामध्ये 166 देशांचा समावेश होता त्यात भारत 112 नंबरवर आहे. आपल्या शेजारील भूतान (61), श्रीलंका (83), नेपाल (99) व बांग्लादेश (101) या देशांच्या तुलनेत खुपच मागास आहे.

संयुक्त राष्ट्र, शांतता आणि मानवतेसाठी कार्यरत जागतिक व्यासपीठाने, 2030 च्या अजेंड्याला मान्यता दिली ज्यात शाश्वत विकास ध्येये मांडलेले आहेत. सप्टेंबर 2015 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या सर्व 193 सदस्य देशांच्या जागतिक नेत्यांनी 17 शाश्वत विकास उद्दिष्टे जागतिक लक्ष्य म्हणून मान्य केली. 2030 अजेंड्यातील ध्येये ही मानवनिर्मित सर्व संकटातून मानवी हस्तक्षेप कमी करण्याची क्षमता आहे. ही उद्दिष्टे जागतिक आव्हानांवर केंद्रित आहेत ज्यामध्ये गरिबी, उपासमार, असमानता, हवामान बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, शांतता आणि न्याय यासाठी असून आपल्या चांगल्या भविष्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विकास आणि पर्यावरणाच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे व्यापक आणि परस्परावलंबी असल्याने, प्रत्येक लक्ष्याच्या दिशेने प्रगतीचे मापन करण्यासाठी अधिक कार्यक्षम बनवली आहेत.

सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

सॉफ्ट स्किल्स: नातेसंबंध हाताळण्याची कौशल्ये | Soft Skills for managing relationships

 

सॉफ्ट स्किल्स: नातेसंबंध हाताळण्याची कौशल्ये | Soft Skills for managing relationships 

आज आपणास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल मग ते नोकरी असो किंवा व्यवसाय तर आपल्या अंगी सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स अशी दोन अंत्यत महत्त्वाची कौशल्ये आवश्यक आहेत. हार्ड कौशल्ये ही आपण आपल्या शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या सगळ्या पदव्या किंवा गुणपत्रिका होत. हार्ड कौशल्ये, ज्यांना तांत्रिक कौशल्ये देखील म्हणतात जी नोकरीशी निगडीत असतात, जी प्रत्येक कामाच्या स्वरूपावरून आवश्यक पात्रता असते. दुसऱ्या शब्दांत, प्रत्येक कंपनीतील प्रत्येक पदासाठी एक अद्वितीय हार्ड कौशल्यांची सूची असते. उदाहरणार्थ, एका अकाउंटंटला बँक स्टेटमेंट्सची जुळवाजुळव कशी करावी हे माहित असणे आवश्यक आहे, तर ते शिक्षकास अनावश्यक आहे. त्याच वेळी, शिक्षकासाठी त्यांच्या अनुभवाची पातळी काहीही असो, शिकवित असलेल्या विषयातील आशय समृद्धी महत्त्वाची असते, परंतु इन्कम टक्स रिटर्न भरणे हे एक कौशल्य आहे जे सहसा शिक्षकासाठी आवश्यक नसते. म्हणजेच ज्या त्या कामासाठी मुलभूत ज्ञान आणि कौशल्ये अभ्यासक्रमातून आत्मसात केलेले असतात त्यास हार्ड स्किल्स किंवा तांत्रिक कौशल्ये म्हणतात. तांत्रिक कौशल्ये ही प्रशिक्षण, शिक्षण आणि सराव याद्वारे मिळवलेली आणि मापन करता येणारी कौशल्ये होत. यामध्ये आपले कार्य किती कौशल्याने केल्या जाते हे ठरविले जाते. विशिष्ट क्षेत्राशी निगडीत आवश्यक क्षमता असतात ज्यांना आपण साधारण कौशल्ये अथवा व्यवहारिक कौशल्य देखील म्हणू शकतो.

शनिवार, ८ जुलै, २०२३

माइंडफुलनेस: सजगपणे जगण्याची क्षमता | Mindfulness

 

माइंडफुलनेस: सजगपणे जगण्याची क्षमता | Mindfulness

एका शहरात सागर आणि प्रीती कुटुंबापासून दूर दोघेच रहात होते. त्यांना पाच वर्षाचा रोहन नावाचा मुलगा होता. दोघेही कामावर जात असल्याने तो गुंतून राहावा म्हणून त्याला मोबाईल दिलेला होता. रोहन कोणतीही गोष्ट करायची असेल तर मोबाईलशिवाय करू शकत नव्हता. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला मोबाईल लागायचा, जेवण करताना तर पहिली अटच ती असायची. त्याचे आई-वडील सांगतात की मोबाईल दिल्याशिवाय तो जेवतच नाही.........

आज जवळपास सर्वच घरात वरील प्रसंग घडताना दिसत असेल. मुले काय खात आहेत, पीत आहेत याचे भानच राहिलेले नाही. हे भान किंवा अस्तित्वाची जाणीव असणे म्हणजे काय तर माइंडफुलनेस किंवा सजगता होय. आपण माइंडफुलनेस ही एक मूलभूत मानवी क्षमता म्हणू शकतो,  मानवाला कोणत्याही प्रसंगी पूर्णपणे सचेतन राहण्याची, जागरूक राहण्याची, मन शांत ठेवून सारासार विचार करण्याची, आपण कोठे आहोत आणि आपण नेमकं काय करीत आहोत याची निष्पक्षपणे जाणीव असणे होय.

थोडक्यात सांगायचे झाले तर माइंडफुलनेस म्हणजे सद्य स्थितीत जगणे होय, दोन श्वासामधील जगणं होय. काही लोक आपल्या भूतकाळात जगतात, तर काही लोक आपल्या भविष्यकाळात विहार करत असतात. परंतु आपल्याला जर आनंदी राहायचे असेल तर आपण वर्तमानात जगले पाहिजे आणि सद्य स्थितीतला क्षण जगता आला पाहिजे. आपणास जर कायमस्वरूपी आनंदी राहायचे असेल तर आपण माइंडफुलनेसच्या मदतीने आनंदी राहू शकतो. काही लोकांचा स्वभावच असा असतो की, ते तुरूंगामध्ये जरी असले तरी तिथे आनंदी असतात आणि काहींचा स्वभाव असा असतो की त्यांना राज महालात जरी ठेवले तरी ते कायम दुखी असतात.

माइंडफुलनेस हा नेहमी आनंदी राहण्याचा एक राजमार्ग आहे. आपण विचार करत असाल की हे काय आणि कसे असते? खरं तर माइंडफुलनेस ही एक अशी पद्धत आहे, ज्याद्वारे आपण आपल्या आत, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा परिस्थितींबद्दल जागरूकता निर्माण करतो. हे एक प्रकारचे ध्यानच आहे, फरक एवढाच आहे की, एका विशिष्ट वेळी स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, माइंडफुलनेसमध्ये, आपण आपले लक्ष त्या क्षणावर केंद्रित केले पाहिजे, आपण जिथे आहोत, त्याच स्थितीत तो क्षण अनुभवणे आणि जगणे आवश्यक आहे.

असे मानले जाते की माइंडफुलनेस तंत्राच्या नियमित सरावाने आपण आनंदी राहू शकतो. वास्तविक, याद्वारे आपण वर्तमान क्षणाशी जोडतो आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारतो. आपण परिस्थिती बदलू शकत नाही पण आपण आपली प्रतिक्रिया नक्कीच बदलू शकतो आणि परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलू शकतो. यामुळे आपण हळूहळू प्रत्येक परिस्थिती स्वीकारायला आणि त्यात आनंदी राहायला शिकतो. कारण आपण त्याची निवड केलेली असते “मी आनंदी आहे कारण मी आनंदी राहण्याची निवड केलेली आहे”.

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

राग व्यवस्थापन भाग 2 | Anger Management part 2

 

राग व्यवस्थापन भाग 2 | Anger Management part 2 

कोणत्याही व्यक्तीला राग येणे स्वाभाविक आणि ते सोपे आहे; परंतु योग्य व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य हेतूसाठी, आणि योग्य मार्गाने राग व्यक्त करणे प्रत्येकाचे सामर्थ्य नसते आणि ते सोपेही नसते. अरिस्टॉटल

रागावर नियंत्रण ठेवण्याची तंत्रे आणि पद्धती

शिथिलीकरण

साधीसोपी शिथिलीकरण तंत्रे, जसे की खोलवर श्वासोच्छवास आणि आरामदायक स्थिती, रागाची भावना शांत करण्यात मदत करू शकतात. अशी काही पुस्तके आणि कार्यक्रम आहेत जे आपणास शिथिलीकरणाची तंत्रे शिकवू शकतात आणि एकदा का आपण ही तंत्रे शिकलात की आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांचा वापर करू शकतो. जर आपण अशा नात्यात गुंतलेले असाल जिथे तुम्ही आणि तुमचा पार्टनर उग्र स्वभावाचे असाल, तर ही तंत्रे शिकणे तुमच्या दोघांसाठी चांगली कल्पना असू शकते. पण निसर्ग अशा लोकांना कमीच एकत्र येऊ देतो कारण त्यालाही स्वतःची फिकीर असेल ना! आपण प्रयत्न करू शकतो अशा काही सोप्या टिप्स:

आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा, हळूहळू आपला श्वास आता घ्या त्याची अनुभूती आपणास झाली पाहिजे तसेच उच्छवास हा हळूहळू बाहेर कसा पडतो याचीही अनुभूती घ्या.

शांतता निर्माण करणारे शब्द किंवा वाक्यांश जसे की "रिलक्स," "कुल" खोलवर श्वास घेताना पुनःपुन्हा उच्चारा. (3 इडीएटस मधील वाक्यांश छातीवर हात ठेवून म्हणा ‘आल इज वेल’)

तुमची स्मृती किंवा तुमच्या कल्पनेतून, आरामदायी अनुभवाची कल्पना करा, (व्हिज्युअलायझेशन तंत्र) एखाद्या समुद्र किनाऱ्यावर तुम्ही अनवाणी‍ पायांनी फिरत आहात अशी कल्पना करा किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी आहात याची कल्पना करा.

अधिक तान द्यावे लागणार नाहीत असे सौम्य योगासनासारखे व्यायाम आपल्या स्नायूंना आराम देऊ शकतात आणि आपणास अधिक शांत वाटू शकते.

या तंत्रांचा दररोज सराव केल्यास आपणास तणावपूर्ण परिस्थितीत त्यांची आपोआप मदत होते.

बोधात्मक पुनर्रचना

सोप्या भाषेत सांगायचे तर याचा अर्थ आपली विचार करण्याची पद्धत बदलणे. रागावलेले लोक शिव्याशाप देतात, उद्विग्नता किंवा चमत्कारिक शब्द उच्चारतात जे की त्यांचे आंतरिक  प्रतिबिंबित दर्शविते. जेव्हा आपण रागावता तेव्हा तुमची विचारसरणी अतिशोक्तीपूर्ण आणि नाटकीय असू शकते. आपले विचार अधिक तर्कसंगत विचारांनी बदलण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, "अरे, हे भयानक आहे, ते अत्यंत वाईट आहे, सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे," असे स्वतःला सांगण्याऐवजी "हे किती निराशाजनक आहे, आणि त्यामुळे मी नाराज आहे याची जाणीव होणे, यामुळे काही जगाचा अंत होणार नाही आणि मा‍झ्या रागवण्याने तो काही सुटणार नाही की दुरुस्त होणार नाही.” त्यामुळे स्वतःबद्दल किंवा इतर कोणाबद्दल बोलताना "कधीही नाही" किंवा "नेहमी" यासारख्या टोकाच्या शब्दांपासून सावध रहा आणि नेहमी हे लक्षात असू दे की रागाने काहीही ठीक होणार नाही, पण प्रत्यक्षात त्रास आणि पश्चाताप मात्र होतो.

उत्तम संवादाने प्रश्न सुटतात

रागावलेले लोक निष्कर्षापर्यंत पोहोचतात - आणि त्यावर कार्य करतात - आणि त्यातील काही निष्कर्ष खूप चुकीचे असू शकतात. आपण वादविवाद सारख्या चर्चेत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे संथ गतीने आणि आपल्या प्रतिसादांचा विचार करा. आपल्या डोक्यात येणारा पहिला विचार बोलू नका, शांत व्हा आणि आपणास काय म्हणायचे आहे याचा काळजीपूर्वक विचार करा. त्याच वेळी, समोरची व्यक्ती काय म्हणत आहे ते काळजीपूर्वक ऐका आणि उत्तर देण्यापूर्वी पुरेसा वेळ घ्या.

जेव्हा आपल्यावर टीका केली जाते तेव्हा बचावात्मक होणे स्वाभाविक आहे, परंतु त्यांच्याशी लढण्यापेक्षा, त्यांनी काय उच्चारले आहे ते शांतपणे ऐका आणि अशा व्यक्तींना सौम्य शब्दात चपखलपणे उत्तर द्या. एका अर्थाने पाहिल्यास शहाण्या माणसाने मूर्खाच्या नादाला लागूच नये, शांत राहिल्याने परिस्थिती आपत्तीजनक होण्यापासून रोखता येते.

सभोवतालचे वातावरण हलके फुलके ठेवणे

"हलके फुलके विनोद" विविध मार्गांनी राग कमी करण्यास मदत करू शकतात. जेव्हा आपणास राग येतो तेव्हा, हलके फुलके विनोद मूड हलका करू शकतात आणि हे आपणास अधिक संतुलित दृष्टीकोन मिळवण्यास मदत करू शकतात. खरे तर, हास्य ही रागाच्या विसंगत भावस्थिती मानली जाते कारण काहीतरी मजेदार शोधण्याची मानसिक स्थिती रागाच्या मानसिक स्थितीशी विसंगत आहे. अगदी थोड्या क्षणासाठी, जेव्हा आपणास काहीतरी मजेदार आढळते आणि आपण हसतो तेव्हा राग नाहीसा होतो. त्यामुळे समोरची व्यक्ती रागवल्यावर व्यक्तीमध्ये किंवा आणीबाणीच्या परिस्थितीतही स्वतःला तटस्थ ठेऊन त्यामध्ये गंमत पाहण्याचा प्रयत्न करा.

आरोग्यदायी जीवनशैली

आपले शरीर हे निसर्गातील सर्वोत्तम स्वयंचलित यंत्र असून त्याची योग्य प्रकारे काळजी घेतल्यास त्याचा वापर आपण अशक्य कामासाठी देखील करू शकतो. आरोग्यदायी जीवनशैली आचरणात आणणं, हा शरीरावर इतर कोणत्याही पदार्थांचा, उत्पादनांचा मारा करण्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे. आरोग्यदायी जीवनशैली आचरण न केल्याने रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, झोपेच्या तक्रारी अलिकडे सामान्य होऊन गेलेल्या आहेत. सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, सकाळचा नाष्टा पोटभर घेणे, निश्चित दिनक्रम आणि प्राधान्य क्रम आखून घेणे, इतरांशी सौजन्याने व्यवहार करणे, सदृढ नातेसंबंध जोपासणे, दिवसातून एकवेळ आपल्या कुटुंबीयांसोबत घालविणे, दुपारचे जेवण सामान्य आणि रात्रीचे जेवण हलके फुलके असावे आणि रात्री दहाच्या आत झोपी जाणे यामुळे मेंदूचे घड्याळ व्यवस्थित कामा करण्यास मदत होते.

राग आलाच नाहीतर काय होईल

आपण आपली नैसर्गिक आणि स्वाभाविक रागाची भावना व्यक्त केलीच नाही तर काय होऊ शकते यासाठी एक साधू आणि साप यांची कथा पाहू या.

जंगलात एक विषारी साप राहत होता. तो जंगलाच्या एका कोपऱ्यात संचार करायचा आणि तिकडे जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. एके दिवशी एक साधू तेथे तपश्चर्या करायला आला. सापाने साधूला सगळी हकीकत सांगितली की लोक त्याला घाबरून त्याच्याजवळ कोणी येतच नाही. साधूने सापाला समजावले की त्याने कोणालाही दंश करू नये. साधूने आपल्या आशीर्वादाने सापाचे विषही संपवले. काही दिवसांनी साधू जंगल सोडून गेला. त्यानंतर काही दिवसांनी तो परत आला तेव्हा त्याला अर्धमेल्या अवस्थेत साप दिसला. चिंतित होऊन साधूने सापाला याचे कारण विचारले. साप सांगू लागला, जेव्हा मी लोकांना चावणे बंद केले तेव्हा त्यांनी मला घाबरणे सोडले. त्यांनी माझ्यावर दगडफेक सुरू केली. एवढेच नाही तर त्यांनी मला दोरी म्हणून वापर केला अनेक तर्‍हेने माझे हालाहल केले. यावर साधू म्हणाले, जे तुमचे नुकसान करतात त्यांच्यापासून तुम्ही स्वतःचे रक्षण केले पाहिजे आणि निसर्गाने प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही अस्त्र दिलेले आहे त्यांचा वापर समोरच्या व्यक्तीला घाबरण्यासाठी करायला हवे. साधूने सापाला सांगीतले की तू केवळ स्वत:च्या रक्षणासाठी फणा काढ म्हणजे समोरचा समजून जाईल की थांबले पाहिजे. सापाने त्याचे पालन केले आणि आनंदी जीवन जगू लागला. त्यामुळे निसर्गाने बहाल केलेले रागाचे अस्त्र कोठे, केंव्हा, कसे, आणि किती प्रमाणात वापरायचे हेच व्यवस्थापन आहे.

रागाने आपल्यावर नियंत्रण मिळवण्याआधी आपण रागावर नियंत्रण मिळवू या!

एक आजोबा आपल्या नातवाला एक प्राचीन दंतकथा सांगतात “दोन प्रचंड लांडगे प्रत्येकाच्या हृदयात आरामात, एक पांढरा आणि काळा. पांढरा लांडगा चांगला, दयाळू आणि प्रेमळ आहे, त्याला सुसंवाद आवडतो आणि जेव्हा स्वतःचे संरक्षण करण्याची किंवा प्रियजनांची काळजी घेण्याची गरज असते तेव्हा तो ठामपणे अडचणीसमोर उभा राहतो. दुसरा काळा लांडगा हिंसक आणि संतापलेला असतो. अनावश्यक घटनांनी रागावतो आणि सतत विनाकारण भांडत राहतो. त्याचे विचार द्वेषाने भरलेले असल्याने त्याचा राग निरुपयोगी आहे आणि त्यामुळेच तो समस्या निर्माण करतो. हे दोन लांडगे माझ्या हृदयात नेहमी भांडत राहतात ”.

नातवाने विचारले: "शेवटी, दोन्ही लांडग्यापैकी कोण जिंकतो?"

अजोबाने उत्तर दिले: “दोघेही, कारण मी फक्त पांढऱ्याला लांडग्याला खायला घातले, तर काळा लांडगा अंधारात लपून बसेल आणि माझे लक्ष विचलित झाल्यावर, पांढऱ्या लांडग्यावर प्राणघातक हल्ला करेल. त्याउलट, जर मी दिले लक्ष दिले आणि तिचा स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर मला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मी तिची शक्ती करू शकतो."

नातू गोंधळून गेला: "हे दोघे जिंकणे कसे शक्य आहे?"

आजोबाने हसत हसत स्पष्ट केले की, “काळ्या लांडग्याचे काही गुण आपल्याला काही विशिष्ट परिस्थितीत आवश्यक असू शकतात, कारण तो बिनधास्त व दृढनिश्चयी आहे, तो हुशार आहे आणि त्याच्या संवेदनाही तीव्र आहेत. अंधाराची सवय असलेले त्याची डोळे आपल्याला धोक्यासंबंधी इशारा देतात आणि आपला बचाव करू शकतात. जर मी त्या दोघांना खायला घातले तर मा‍झ्या मनावर विजय मिळवण्यासाठी त्यांना भांडण करावे लागणार नाही, म्हणून केव्हा कोणता लांडगा निवडायचा हे मी ठरवू शकतो."

ही कथा आपल्यासाठी एक अत्यंत मौल्यवान धडा देते, दडलेला राग हा भुकेल्या लांडग्यासारखा आहे, जो खूप धोकादायक आहे. आपणास हे कसे नियंत्रीत करावे हे न कळल्याने ते कोणत्याही क्षणी आपला ताबा घेतील. या कारणास्तव, आपण आपल्या नकारात्मक भावना न लपवता आणि न दाबता त्या बिनशर्त स्वीकारल्या पाहिजेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या आणीबाणीच्या परिस्थितीत वापरल्या पाहिजेत. ‘वेनम’ हा हॉलीवूडपट 2018 मध्ये प्रसारित झाला होता त्यामध्ये एका पत्रकाराच्या शरीरात एलियन प्रवेश करतो आणि त्याच्यामध्ये अमुलाग्र बदल होतात तो एकाच वेळी शांत आणि भयंकर रूप धारण करू शकला कारण तो त्या काळ्या एलियनला नियंत्रित करू शकत होता.

समारोप:

जेव्हा आपण रागवतो आणि त्या अवस्थेत बोलतो तेंव्हा ते आपले सर्वोत्तम भाषण ठरू शकेल पण त्याचा पश्चाताप नेहमी होईल. रागाला धरून ठेवणे म्हणजे दुसर्‍यावर फेकण्याच्या उद्देशाने गरम कोळसा पकडण्यासारखे आहे; त्यामुळे दुसर्‍याला काहीही इजा होणार नही पण आपण मात्र होरपळून निघू. तथागत बुद्ध म्हणतात की, रागाला धरून ठेवणे म्हणजे विष पिणे आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीने मरावे अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. त्यामुळे रागवलेल्या अवस्थेतील प्रत्येक मिनिटामध्ये आपण आनंदाचे 60 सेकंद गमावतो हे लक्षात असू दे. आपला प्रत्येक सेकंद आरोग्यपूर्ण आणि आनंदाने व्यतीत होवो हीच प्रार्थना!


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

उपवास (Fasting) : थांबण्याची, स्वच्छ होण्याची आणि जीवनाच्या लयीशी जुळवून घेण्याची कला

  उपवास : थांबण्याची , स्वच्छ होण्याची आणि जीवनाच्या लयीशी जुळवून घेण्याची कला (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) उपवास ही भारतीय ...