आपल्या
नकळत आपला वापर होत तर नाही ना?
आपणाला कधीकधी गोंधळलेल्यासारखे वाटते का? कधीकधी आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे अपराधीपणाची भावना जाणवते का? कोणीतरी तुमच्या भावनाशी नकळत खेळत आहे आणि तुम्हाला ते माहित देखील नाही? असे काही आपल्याबाबत घडत आहे का? कोणत्यातरी कारणाने तुमचा गैरवापर केल्याने केवळ तुमचे नातेच खराब होत नाही, तर तुमच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. नातेसंबंधातील
भावनिक हाताळणी (मॅनिप्युलेशन) ओळखणे कठीण असले तरी, हाताळणीची छुपे संकेत ओळखता आल्यास आपल्याला स्वतःचे संरक्षण करण्यात मदत होऊ
शकते आणि असलेले नातेसंबंध सदृढ करता येते.
नातेसंबंधातील
भावनिक हाताळणी
भावनिक हाताळणी हे एक प्रकारचे असामाजिक वर्तन आहे आणि त्यात शब्द, वर्तन, कृती आणि वगळणे समाविष्ट आहे जे तुमचे विचार, भावना आणि वर्तन नियंत्रित आणि विकृत करतात. हे स्वतःला, तुमच्या प्रियजनांना आणि तुमच्या सभोवतालचे जग तुम्ही कसे पाहता यावर परिणाम करू शकते. सतत हाताळणी केल्याने तुमच्या आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम होतो आणि दीर्घकाळासाठी तणाव, चिंता आणि नैराश्य येऊ शकते. आपणही हाताळले जात आहात का? हे खालील काही प्रश्नांच्या सहाय्याने जाणून घेऊ या.
1. आपणास नेहमी अपराधीपणा
वाटतो का?
तुम्हाला प्रत्येकवेळी
असे वाटते की नेहमी तुमचीच चूक असते? आपणास हाताळणारे अनेकदा त्यांना हवे ते
मिळवण्यासाठी गिल्ट-ट्रिपिंगचा वापर करतात. तुमचे विचार, भावना आणि वर्तन
बदलण्यासाठी ते त्यांच्या चुकांसाठी तुम्हाला जबाबदार धरतात. ते आपल्या स्वतःच्या कृतींचे समर्थन करण्यासाठी सत्य
लपवून, आपण नेहमी चुका करत आहात यावर विश्वास ठेवण्यासाठी आपल्या प्रयत्नांना दुय्यम
लेखले जाते. तुम्हाला असे वाटते का, की काहीही झाले तरी तुम्ही कधीही काहीही करू
शकत नाही. याचे कारण तुम्हाला कोणीतरी त्यांच्या कामासाठी वापरून घेत आहेत.
2. आपल्यावर सतत टिकाटिप्पणी
केली जाते का?
तुमचा
जोडीदार, बॉस, मित्रमैत्रिणी
किंवा कुटुंबातील इतर सदस्य तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर टिकाटिप्पणी करतात
का? तुम्ही एखाद्या
गोष्टीवर कितीही कठोर परिश्रम करत असलात तरी, आपणास हाताळणारे तुमच्यावर
टीका करण्यास किंवा ती गोष्ट ते किती चांगल्या प्रकारे करू शकले असते हे दाखवण्यास
कधीही कचरत नाहीत. ते तुम्हाला सतत जाणवून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा कनिष्ठ
आहात आणि ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. कपडे, घर, नोकरी, जोडीदार किंवा साधे चप्पल यातही ते काहीतरी
चूक दाखवून आपण कसे टापटीप किंवा सरस आणि तुम्ही किती तकलादू हे दाखविण्याचा नेहमी
प्रयत्न सुरु असतो.
3. तुमचा स्व-आदर कमी झाला आहे का?
तुम्ही स्वत:ला कमकुवत मानता का? तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला हाताळणारे नेहमी
तुमचा आत्मविश्वास तोडण्यावर भर देत असतात कारण त्यांना त्यामुळे तुमच्यावर
नियंत्रण ठेवणे सोपे होईल. म्हणूनच ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे
वाटण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती वापरतात. ते तुम्हाला नेहमी जाणीव करून देत असतात
की, तुम्ही तुमची योग्यता
सिद्ध करणे आवश्यक आहे आणि तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचे प्रमाणीकरणाचे
सर्टिफिकेट घेणे आवश्यक असते. ते तुमच्यावर सत्ता गाजण्यासाठी तुम्हाला कमी लेखतात
कारण ते तुम्हाला त्यांच्या समान मानत नाहीत. ते तुमचा स्वाभिमान भंग करतात म्हणून, तुम्ही त्यांना हवे
असलेले सराव काही करायला लागता, कारण संघर्ष
टाळण्यासाठी आणि स्वतःच्या नैसर्गिक भावना व्यक्त करण्यापासून थांबवता. कशाला वाद
घाला, जाऊदे ही कटकट म्हणून
नेहमी त्यांच्यासाठी राबत असता.
4. तुम्हाला तुमच्या
विवेकशक्तीवर शंका आहे का?
तुम्ही
तुमच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे का? तुमचे वागणे इतरापेक्षा
वेगळे आहे असे तुम्हाला वाटते का? आहारी जाणे (गॅसलाइटिंग) ही एक धोकादायक हाताळण्याची
युक्ती आहे जी हाताळण्याऱ्याकडून वापरली जाते ज्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल आणि
तुमच्या वास्तविकतेवर शंका येते. जेव्हा तुमचा हाताळणारा तथ्ये फिरवतो किंवा
तुम्ही त्यांचा सामना करता तेव्हा ते पूर्णपणे नाकारतात तेव्हा तुम्ही पूर्णपणे
त्यांच्या आहारी गेलेले असता. ते तुम्हाला पटवून देतात की तुम्ही घटना चुकीच्या
लक्षात ठेवत आहात किंवा तुमच्या डोक्यात गोष्टी तयार करत आहात, तुम्हाला तुमच्या
स्वतःच्या विचारांवर, आठवणींवर, भावनांवर आणि निर्णयांवर शंका घेण्यास भाग पडतात. गॅसलाइटिंगमुळे तुम्ही
गोंधळलेले, तणावग्रस्त, चिंताग्रस्त, असुरक्षित आणि शंकेच्या विचारांनी त्रस्त असता.
5. तुमची तुलना नेहमी
इतर लोकांशी केली जाते का?
तुमचा
जोडीदार, पालक, मित्रमैत्रिणी किंवा बॉस सतत तुमच्या प्रयत्नांची किंवा यशाची तुलना
दुसऱ्या कोणाशी तरी करतात का? तुमची इतरांशी तुलना करणे ही तुम्हाला
कमीपणाची जाणीव करून देण्यासाठी आणि तुमचा आत्मविश्वास भंग करण्यासाठी एक छुपी
हाताळणी असते. अशा तुलनेतून इतर तुमच्यापेक्षा चांगले कसे करत आहेत आणि तुम्ही
नेहमीच अपेक्षा भंग कसे करता हे हाताळणाऱ्याला तुम्हाला दाखवून द्यायचे असते.
जेणेकरून आपण त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकली पाहिजे आणि त्यांच्या मतानुसार वागले
पाहिजे.
6. हाताळणी करणारे
तुमच्यावर अतिप्रेम करतात का?
तुमचा
जोडीदार तुमच्यावर नेहमीच प्रेम, कौतुक आणि लक्ष देतो का? जरी ते चांगले वाटत असले तरी, तुम्हाला वाटते की ते अनावश्यक आहे? प्रेमाचा वर्षाव (लव्ह बॉम्बिंग) हे तुमच्या भावनांवर प्रभाव टाकण्यासाठी
आणि तुम्हाला हाताळणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याचे तंत्र आहे. तुमच्यावर
अधिकचे लक्ष आणि आपुलकी दाखवून, तुमचा मॅनिप्युलेटर तुमचे विचार आणि भावना हायजॅक करण्याचा प्रयत्न करतो
आणि तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा लवकर नातेसंबंधात अडकविण्याचा प्रयत्न करतो. जसजसे
तुम्ही त्यांना अधिक गांभीर्याने घेता आणि त्यांच्यावर अवलंबून राहता, ते नातेसंबंधात अधिक मागणी करणारे आणि
अपमानास्पद वागतात. ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करून तुमचा विश्वास संपादन करतात
आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करता तेव्हा ते त्यांना
हवे तसे करायला भाग पडतात.
7. तुमच्या
असुरक्षिततेचे शोषण करतात असे वाटते का?
कोणीतरी
आपल्या भीतीचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करत आहे का? तुमचा आत्मविश्वास
तोडण्यासाठी तुमची सर्वात मोठी कमकुवतता, दोष आणि असुरक्षितता कशी ओळखायची हे
मॅनिपुलेटरला नेहमी कळत असते. ते
हेतुपुरस्सर तुमच्यावर टीका करतील किंवा इतरांसमोर तुमच्या दोषांबद्दल बोलतील किंवा
जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती किंवा असुरक्षितता वाटत असेल तेव्हा तुमची
भीती आणि असुरक्षितता अधिकच अधोरेखित करतात. तुम्ही त्यांच्या तुलनेत किती कमकुवत
आहात हे दाखवण्यासाठी, ते तुमच्या दोषांचा आणि भीतीचा वापर तुम्हाला दुखावण्यासाठी
आणि अपमान करण्यासाठी करतात. तुम्हाला अस्वस्थ आणि असुरक्षित करून ते तुमचा फायदा
घेतात. आपण अशा लोकांपासून सावध झाले पाहिजे, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन
नातेसंबंध जपले पाहिजेत. तर यासाठी खालील काही मार्ग आपणास मदतगार ठरू शकतील.
हाताळणी करण्याऱ्यापासून
स्वतःचा बचाव कसा करावा?
तुमची होणारी
फसवणूक आणि शोषण नष्ट होऊन तुमचे नाते मजबूत करू इच्छित आहात का? हाताळणी थांबवण्याचे काही
मार्ग खालीप्रमाणे:
- तुमच्या स्वाभिमानावर काम करा. हाताळणी करणाऱ्या बर्याच लोकांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता असते. स्वत:वर लक्ष केंद्रित करण्याचा सराव करून पहा जसे की, काही नवीन कपडे खरेदी करा किंवा एखाडी मजेदार गोष्ट करून किंवा नवीन प्रोडक्ट वापरून पहा.
- परिपूर्णतेच अट्टाहास सोडा. प्रवाहाबरोबर जायला शिका. सर्व काही तुमच्या नियंत्रणात नाही आणि स्वतःला त्याची नियमितपणे आठवण करून द्यावी लागेल.
- काहीतरी नवीन शिका. नवीन छंद शोधा आणि तुम्ही यापूर्वी कधीही न केलेले काहीतरी करून पहा. हे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांवर कमी आणि तुमच्या आवडीनिवडीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल.
- चिंता कमी करण्याचा प्रयत्न करा. ध्यान आणि योगासने चिंतेसाठी चमत्कार ठरू शकतात. जेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तेंव्हा इतर उपचारांच्या संयोगाने या पद्धतीचा वापर करून तुमच्या मनाला आणि शरीराला आरोग्यपूर्ण ठेवण्यास मदत करू शकतात.
- व्यायाम करा. आपणास दैनंदिन कार्यासाठी काही सेरोटोनिनची आवश्यकता असते. ट्रेडमिलवर जा किंवा तुमचा मूड सुधारण्यासाठी तुमचा आवडता व्यायाम करा आणि तुमचे लक्ष स्वतःला सुधारण्याकडे वळवा.
- समुपदेशकाकडे जा. मानसशास्त्रीय समुपदेशनात प्रामुख्याने अशा लोकांशी डील करतात ज्यांना दैनंदिन जीवनात अडचणी येतात. जसे वैयक्तिक जीवन आणि कौटुंबिक त्रास, शाळेतील खराब कामगिरी, आत्मविश्वासाचा आणि आत्म-सन्मान यांचा अभाव, निर्णय घेताना संकोच, परस्पर संबंध प्रस्थापित करण्यात आणि टिकवून ठेवण्यात अडचणी इ.
- थेरपीकडे जा. थेरपीचा फायदा सर्वांना होऊ शकतो, परंतु विशेषत: टोकाचे वर्तन असणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा अधिक होतो. एखाद्या असामाजिक किंवा अपसामान्य वर्तनाला सामान्य बनविण्यासाठी याचा वापर सर्रास केला जातो.
- इतरांचा आदर करा. इतरांच्या सीमा आणि वैयक्तिक जागा ओळखा. वादाच्या वेळी इतरांचा आदर बाळगा आणि शक्य तितक्या तर्कसंगत राहण्याचा प्रयत्न करा.
- बोलण्या अगोदर ऐका. जेव्हा कोणी तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला त्यांना कसे वाटते, तेव्हा लक्ष द्या आणि लक्षपूर्वक ऐकून झाल्यावर आपले मत शांतपणे मांडा.
त्यामुळे
वेळीच सावध व्हा, स्व-आदर जपा, आपल्या कमकुवत
बाजू केवळ विश्वासू व्यक्तिनाच सांगा, आपल्या
भावनांचे प्रकटीकरण सर्वासमोर करून नका कारण असे काही लोक त्याचा बाजार मांडतात. स्वतःची
काळजी घ्या, स्वत:ला ओळख आणि कोणाच्याही आहारी जाऊ नका. थोडेसे डोळस व्हा त्यासाठी
ठेच लागलीच पाहिजे असे काही नाही.