आनंदाचे
बीजगणित | The Algebra of Happiness
जीवनात
आनंदी राहायचे असेल तर खूप सोपे आहे, पण आनंदी आहे हे दाखवायचे असेल तर ते महाग
आहे. कारण आनंदी असणं आणि आनंदी असल्याचे जगाला दाखविणे यासाठी धडपड करावी लागते.
आजकाल लोक प्रवास करत असताना तो जगाला दाखयाच्या नादात प्रवासाचा आनंद घ्यायचाच विसरून
जात आहेत. हे खाण-पीन आणि सगळ्याच गोष्टी दाखविण्यासाठीची जणू स्पर्धाच सुरु आहे
त्यामुळे आनंदी जगण्याचे बीजगणित स्कॉट गॅलोवे यांनी ‘द अल्जेब्रा ऑफ हॅपिनेस’ या
पुस्तकातून मांडलेला आहे.
स्कॉट
गॅलोवे हे न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथे मार्केटिंगचे
प्राध्यापक आहेत, कदाचित आपणास ते
सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक द फोर: द हिडन डीएनए ऑफ ऍमेझॉन, ऍपल, फेसबुक आणि गुगलचे लेखक म्हणून माहित असतील (जर
माहित नसतील तर त्यांचे हे पुस्तक वाचलेच पाहिजे). द अल्जेब्रा ऑफ हॅपिनेस हे
गॅलोवेचे दुसरे पुस्तक आहे आणि ते आनंदी जीवनाच्या मूलभूत गोष्टींबद्दल त्यांचा
दृष्टीकोन दर्शविते. गॅलोवेच्या वैयक्तिक अनुभवातून छोट्या छोट्या रंजक कथामधून
आपल्या संपत्तीपासून आरोग्यापर्यंत, आणि आपल्या प्रेम संबंधाविषयीची
शिकवण सदर पुस्तकातून दिलेली आहे.