मानसिक आरोग्य सेवा कायदा (MHCA, 2017)
समुपदेशक
(तथाकथित): नमस्कार मला आपला फोन नंबर आपल्या
मुलाच्या शाळेतून मिळाला. मी या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आहे आणि तुमचं आयुष्य
बदलून टाकणारे मार्गदर्शन देऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला माझ्या खास योजनांमध्ये
नोंदणी करावी लागेल.
ग्राहक:
काय योजना आहेत? त्याची माहिती द्याल का?
समुपदेशक
(तथाकथित): आमच्याकडे अनेक पॅकेजेस आहेत -
बेसिक, प्रीमियम, आणि अल्टिमेट. बेसिक
पॅकेज फक्त काही मार्गदर्शनासाठी आहे, तर प्रीमियम आणि
अल्टिमेट पॅकेजेसमध्ये तुम्हाला विशेष उपचार मिळतील. अल्टिमेट पॅकेजसाठी मात्र
एकदा १०,००० रुपये भरावे लागतील.
ग्राहक: पण, काय तुम्ही प्रमाणित समुपदेशक आहात?