वाचन सवयी | Reading Habits
COVID-19 महामारीने जगभरातील अनेक क्षेत्रांवर दीर्घकालीन परिणाम केले, ज्यात शिक्षण व वाचन यावर होणारे परिणाम विशेषतः महत्त्वाचे ठरले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात शाळा, ग्रंथालये, आणि
सार्वजनिक वाचनालये बंद राहिली. यामुळे वाचनाची पारंपरिक साधने मुलांपासून
प्रौढांपर्यंत सर्वांपासून दुरावली. डिजिटल शिक्षणाच्या अनिवार्यता आणि ऑनलाइन
सामग्रीच्या वाढत्या वापरामुळे वाचनाची सवय एकाकीपणाने प्रभावित झाली. ऑनलाइन
शिक्षण आणि मनोरंजनाच्या साधनांमुळे छापील साहित्य वाचने कमी झाले. ई-बुक्स आणि
ऑडिओबुक्सने लोकप्रियता मिळवली असली तरी सखोल वाचनाची सवय कमकुवत झालीवाचनासाठी
लागणारी सामाजिक आणि कौटुंबिक प्रोत्साहन मिळणे कमी झाले. विशेषतः मुलांमध्ये
स्क्रीनवर अधिक वेळ घालवल्यामुळे प्रिंटेड साहित्य वाचनाची सवय दुर्लक्षित झाली. त्यामुळे
वाचनाच्या सवयींवर आलेल्या संकटाचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. यामुळे वाचनाची
गरज, त्यासाठीच्या प्रभावी धोरणांची अंमलबजावणी, आणि वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने विचार करण्याची आवश्यकता
निर्माण झाली आहे. महामारीनंतर निर्माण झालेल्या या समस्यांवर उपाययोजना
करण्यासाठी आपण सांस्कृतिक, सामाजिक, आणि
शैक्षणिक दृष्टिकोनातून विचार करणे गरजेचे वाटते.