कायझेन:
एक छोटेसे पाऊल आयुष्य बदलू शकते
आज चारचाकी
वाहनांच्या बाजारात टोयोटा या कंपनीला तोड नाही. ही जपानी कंपनी वर्षांनुवर्षे आपल्या
उत्पादनांमुळे व विक्रीनंतरची सेवा यासाठी वाखाणली जाते. आपल्या उत्पादनांची
गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी यांनी कायझेन नावाचे तंत्र यशस्वीपणे राबविले
आहे. कायझेन हा मुळत: जपानी शब्द आहे. म्हणजेच, जपानी व्यवसाय तत्त्वज्ञानातून कैझेन तत्त्वाचा
उदय झाला. कायझेन शब्दाला विभाजित केल्यास दोन शब्द मिळतात. KAI शब्दाचा अर्थ ‘विकास’ आणि ZEN शब्दाचा अर्थ ‘चांगल्यासाठी’ असा होतो. Kaizen या शब्दाचा अर्थ सामान्यतः सतत सुधारणा
असा होतो. तसेच KAI आणि ZEN हे दोन शब्द छोटे छोटे चांगले बदल या भावनेशी निगडित आहेत.
छोटय़ा-छोटय़ा गोष्टींद्वारे मोठमोठी ध्येये गाठता येतात, हा कायझेन विचारसरणीचा मूलभूत पाया आहे. Kaizen ही जपानी संज्ञा दुसऱ्या महायुद्धानंतर
प्रथम जपानमधील व्यवसाय सुधारण्यासाठी लागू करण्यात आली होती, तेव्हापासून कायझेन हे तंत्र जगातील सर्व व्यवसायांमध्ये सतत
सुधारणा करण्यासाठी समाविष्ट आहे.