शाश्वत विकास आणि भारत
शाश्वत विकास अहवाल 2023 हा डब्लीन युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे जून, 2023 मध्ये प्रकाशित झाला. ही शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने सर्व सदस्य राष्ट्रांच्या प्रगतीच्या वार्षिक मूल्यांकनाची आठवी आवृत्ती आहे. या अहवालामध्ये 166 देशांचा समावेश होता त्यात भारत 112 नंबरवर आहे. आपल्या शेजारील भूतान (61), श्रीलंका (83), नेपाल (99) व बांग्लादेश (101) या देशांच्या तुलनेत खुपच मागास आहे.
संयुक्त
राष्ट्र, शांतता आणि मानवतेसाठी कार्यरत जागतिक व्यासपीठाने,
2030 च्या अजेंड्याला मान्यता दिली ज्यात शाश्वत विकास ध्येये मांडलेले
आहेत. सप्टेंबर 2015 मध्ये, संयुक्त
राष्ट्रांच्या सर्व 193 सदस्य देशांच्या जागतिक नेत्यांनी 17 शाश्वत विकास उद्दिष्टे जागतिक लक्ष्य म्हणून मान्य केली. 2030 अजेंड्यातील ध्येये ही मानवनिर्मित सर्व संकटातून मानवी हस्तक्षेप कमी
करण्याची क्षमता आहे. ही उद्दिष्टे जागतिक आव्हानांवर केंद्रित आहेत ज्यामध्ये गरिबी,
उपासमार, असमानता, हवामान
बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, शांतता आणि
न्याय यासाठी असून आपल्या चांगल्या भविष्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विकास आणि
पर्यावरणाच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आलेली आहेत. ही
उद्दिष्टे व्यापक आणि परस्परावलंबी असल्याने, प्रत्येक
लक्ष्याच्या दिशेने प्रगतीचे मापन करण्यासाठी अधिक कार्यक्षम बनवली आहेत.