शिकण्याचीसुद्धा स्टाईल असते
अध्ययनाची योग्य व अयोग्य अशी कोणतीच
पध्दती खरोखर अस्तित्त्वात नाही. कारण प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय (unique) असते,
पण प्रत्येक व्यक्तीची अशी खास अध्ययनाची शैली असते, आणि प्रत्येक अध्ययन शैलीचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. त्यामुळे स्वत:ची अध्ययन शैली चांगल्या प्रकारे जाणून घेतल्याने आपले
अध्ययन कार्य अधिक चांगल्या प्रकारे व पध्दतीने करण्यास मदत होईल. यासाठी अनेक संशोधने झाली आहेत; त्यापैकी नील फ्लेमिंग (1992) यांनी VAK प्रतिमान
मांडलेले आहे. V म्हणजे दृष्य, A म्हणजे श्राव्य
आणि K म्हणजे कृतीपर अध्ययन शैली होय.
वर उल्लेख केल्याप्रमाणे अध्ययन शैली व
तिचे फायदे अनेक आहेत. सद्यस्थित आपण नेमकेपणाने अध्ययन शैलीच्या प्रकारानुसार करावयाची तयारी व अध्ययन
शैलीची ओळख याविषयी चर्चा करू या. प्रत्येकाची अध्ययन शैली ही इतरापासून खुपच भिन्न असते व
तिच्यासारखी तिच असू शकते.
अ) दृष्य अध्ययन शैली (Visual):
या शैलीतील विद्यार्थी हे स्वत: आपल्या
डोळ्याने पाहिलेल्या गोष्टी, घटना व प्रसंगातून शिकतात. अशी मुले ही नेहमी वर्गात
पहिल्या बाकावर बसतात; चित्रपट गॄहात देखील त्यांना पहिल्या रांगेतील सीट हवी असते,
आणि स्पर्धात्मक कार्यक्रमही जवळून पाहायला आवडते. घटना, प्रसंग व गोष्टींच्या बाह्य स्वरूपाविषयी
सर्वकांही वर्णन करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. दृष्य
अध्ययन शैलीतील विद्यार्थ्याना ग्राफ्स, नकाशे आकृत्या व
फोटो यासारखे दृष्य साधने आवडतात. अशी मुले ही चांगली लिहू
शकतात आणि लिखित स्वरूपाच्या कार्यात तरबेज असतात.
- दृष्य अध्ययन शैली असलेल्या विद्यार्थ्यांची
वैशिष्टे:
- पुस्तके, मासिके व इतर वाचन साहित्यात अधिक रस.
- लिखित स्वरूपातील
माहिती जास्त लक्ष केद्रिंत करते; जसे ग्राफ्स, नकासे, आराखडे, चार्टस, फ्लॅशकार्डस व
अधोरेखित केलेल्या नोट्स इत्यादी.
- यांना नोट्स
लिहू न शकल्यास फ्रस्ट्रेशन येते.
- यांची प्रतिमा स्मृती
चांगल्या प्रकारे काम करते. ( प्रतिमा स्मृती:
वेदनिक स्मृतीमधील दृष्य घटकावर आधारीत स्मृती)
- अशा व्यक्ती
एखादी वाचलेली माहिती जशीच्या तशी आठवू शकतात.
- यांना
अभ्यासाठी शांत जागेची आवश्यकता असते.
- जरी माहिती
छापील स्वरूपात असली तरीही अशा विद्यार्थ्याना स्वत:च्या नोट्स स्वत: काढायला
आवडतात.
- अशा विद्यार्थ्याना
दिर्घ व्याख्यानास बसायला अडचणी येतात.
- स्पेलींग
लेखणात अशा व्यक्ती चांगल्या असतात.
- सविस्तर माहिती लक्षात ठेवण्याकडे कल असतो.
- अशा विद्यार्थ्याचे
वर्तन व्यवस्थित व टापटिप स्वरूपाचे असते.
- क्वचित प्रसंगी
शाब्दीक सूचना पुन्हा सांगावयास लावतात.
- असे विद्यार्थी
शिक्षकांची देहबोली व चेहऱ्यावरील अभिव्यक्ती चांगल्याप्रकारे टिपतात.
- दृष्य
साधनाद्वारे अशा व्यक्तींचे अवधान केद्रींकरण चांगल्याप्रकारे होते.
दृष्य अध्ययन
शैलीच्या विद्यार्थ्यासाठी टिप्स्:
आपल्या अध्ययन
शैलीत सुधारणा घडवून आणण्यासाठी खालील टिप्स् लक्षपूर्वक पहा व आमलात आणा.
लिखित माहितीसाठी
शिक्षकांना विनंती करा.
नोट्स
काढण्यासाठी आराखडे व फ्लोचार्टची मदत
घ्या.
नोट्स काढताना
रंगीत पेनचा वापर करा.
स्पेलींगचे
शब्द किंवा घटना, दृष्य कल्पना तयार केल्यास त्या आठवण्यास मदत होईल.
व्याख्यान/तासिकेदरम्यान महत्वाचे मूद्दे लिहून काढत चला.
फलकावरील सर्व
माहिती आपल्या कलानुसार उतरवून घेण्याचा प्रयत्न करा.
वर्गामध्ये
पहिल्या रांगेत बसण्याचा प्रयत्न करा.
विषयाशी
संबंधीत चलतचित्रे (Videos) पहा.
स्वत: तयार
केलेल्या नोट्समधील महत्वाचे मूद्दे अधोरेखित करत जा.
नोट्स काढताना
महत्वाच्या गोष्टीसाठी समर्पक उदाहरणे देण्याचा प्रयत्न करा.
विषयातील
माहितीमध्ये सुसंगतता प्रस्थापित करण्यासाठी दृष्य सूचके, तक्ते, आराखडे व फ्लोचार्ट तयार करा.
अवघड वाटणाऱ्या
मुद्यासाठी अधिकची स्पष्टीकरणे लिहून ठेवा.
दृष्य अध्ययन शैलीच्या विद्यार्थ्यासाठी निबंध लेखन, विस्तॄत व मुक्त प्रश्न, नकाशा लेखन व फ्लोचार्ट यासारख्या पद्धतीने
परीक्षा घ्याव्यात.
दृष्य अध्ययन शैली असलेल्या विद्यार्थ्यासाठी
मौखिक प्रश्नोत्तरे पद्धती खूपच अवघड असते.
ब) श्राव्य
अध्ययन शैली (Auditory):
श्राव्य अध्ययन
शैलीचे विद्यार्थी हे खुप चांगले श्रोते असतात. अध्यापन, संवाद, संगीत, चर्चा इत्यादीद्वारे मिळणारी माहिती असे विद्यार्थी खुप चांगल्या प्रकारे ग्रहण करतात. या प्रकारातील विद्यार्थ्याना जर वर्गतील
व्याख्याने रेकॉर्डींग करून दिल्यास त्यांना त्याचे पूनरध्ययन
करण्यास फायदा होतो. पुस्तकातील
मजकुर रेकॉर्ड करून त्याचा आस्वाद घ्यायला आवडतो व ते
एखादे पुस्तक खुप मोठयाने वाचतात; कारण स्वतःचा आवाज त्यांना ऐकून संग्रहीत ठेवावयाचा असतो. लिखित स्वरूपाच्या चाचणीऐवजी अशा विद्यार्थ्याची
जर मौखिक परीक्षा घेतली तर त्यांना खुपकांही सांगता येईल.
- श्राव्य अध्ययन
शैली असलेल्या विद्यार्थ्याची वैशिष्टे:
- वर्गात नेहमी
बोलत असतात.
- अशा विद्यार्थ्याचे
श्राव्य पुस्तके, तोंडी सादरीकरण
व शाब्दिक सूचनाद्वारे अधिक परिणामकारकपणे अध्ययन होते.
- स्वत: न ऐकलेली
माहिती आठविण्यास उपयुक्त ठरत नाही.
- लिखित
प्रलेखापेक्षा तोंडी प्रलेख (Records) सादरीकरणावर अधिक भर असतो.
- वादविवाद व
चर्चा पद्धती खूप आवडते.
- मोठयाने
वाचल्याचा फायदा होतो.
- लिखित
सूचनापेक्षा शाब्दिक सूचनांचे पालन करण्यास सक्षम असतात.
- स्वत: ऐकलेले
आठवण्याची कला चांगली असते.
- व्यक्तींची
नांवे चांगल्याप्रकारे आठवतात.
- बातम्या
ऐकण्याकडे कल असतो.
- नकाशे, तक्ते किंवा ग्राफ्स सहजासहजी समजत
नाहीत.
- इतरांशी संवाद
साधण्यास आनंद मिळतो.
- कधिकधी गाणी
गुणगुणत असतात.
- परदेशी भाषेवर
प्रभूत्व मिळवू शकतात.
- फोन नंबरसारखी
माहिती वारंवार उच्चारावी लागते त्याशिवाय लक्षात राहत नाहीत.
- गटचर्चेतून
फायदा होतो.
- वाचन सावकाश सावकाश
असते.
- सुस्पष्ट
बोलण्याकडे कल असतो.
- खुपवेळ शांत बसू शकत नाहीत.
- श्राव्य अध्ययन
शैलीच्या विद्यार्थ्यासाठी टिप्स्:
आपल्या अध्ययन
शैलीत सुधारणा घडवून आणण्यासाठी खालील टिप्स् लक्षपूर्वक पहा.
- अध्ययनासाठी ऑडिओ
टेपचा वापर करणे.
- अभ्यास करताना
माहिती मोठयाने वाचणे.
- माहितीचे आकलन
होण्यासाठी प्रश्न विचारणे.
- चलतचित्र (Videos)
पाहणे/ऐकणे.
- घटना
आठवण्यासाठी शब्द सहाचर्य तंत्र वापरणे.
- वर्ग चर्चेत
सक्रिय सहभाग नोंदविणे.
- नोट्स व
दिग्दर्शन रेकॉर्ड करणे.
- टेप केलेल्या
नोट्स ऐकणे.
- श्राव्य गोंधळापासून दूर रहावे.
- समूह अभ्यास
किंवा सहध्यायी अभ्यास पद्धतीमध्ये सहभाग घ्यावा.
- सनसणावळ्या, नांवे व घटना आठवण्यासाठी विशिष्ट चालींचा उपयोग करावा.
- सर्व माहिती
लिखित स्वरूपात लिहून ती मोठयाने वाचावी.
श्राव्य
अध्ययन शैलीच्या विद्यार्थ्यासाठी तोंडी व लेखी बहुपार्यायी परीक्षेद्वारे
चांगल्याप्रकारे मुल्यमापन करता येते.
श्राव्य
अध्ययन शैली असलेल्या विद्यार्थ्यासाठी वाचन आकलनाद्वारे मुल्यमापन केल्यास त्यांना खूपच
अवघडल्यासारखे वाटते.
क) कृतीपर
अध्ययन शैली (kinaesthetic):
या अध्ययन
शैलीतील विद्यार्थी हे कृतीतून शिकतात. स्पर्श, अभिनय, वस्तू, गोष्टी हाताळणे, सहभाग घेणे याद्वारे होणया अध्ययनात अशा विद्यार्थ्याना अधिक रस असतो. प्रकल्प पद्धतीद्वारे अशा विद्यार्थ्याना शिकण्यात
अधिक आनंद मिळतो. अशा विद्यार्थ्याना एका जागी जास्त वेळ काही न करता बसून राहणे शिक्षा केल्या सारखे
असते व त्यांना त्यामुळे निराशा येऊ शकते. वस्तूचा शोध घेणे, हाताळणे व प्रयोग करण्यातून त्यांना आनंद मिळतो.
- कृतीपर अध्ययन
शैली असलेल्या व्यक्तीची वैशिष्टे:
- प्रत्यक्ष कृती, निरनिराळे अनुभव व शोध या गोष्टीमध्ये आनंद मिळतो.
- प्रत्यक्ष
वस्तू, साहित्य हाताळल्यास चांगल्याप्रकारे लक्षात राहते.
- विविध संकल्पना
दिग्दर्शन पद्धतीने समजून घेण्यात आनंद मिळतो.
- सराव व
अनुभवाद्वारे कौशल्यावर प्रभूत्व मिळवतात.
- प्रत्यक्ष हाताळणी तंत्राद्वारे अध्ययनात फायदा होतो.
- शारीरिक कष्ट व
क्षेत्रिय अभ्यासाद्वारे चांगले अध्ययन होते.
- वस्तू संग्रह
करण्याकडे कल असतो.
- बऱ्याचदा
हस्तलिखित चांगले नसते.
- स्पेलिंगबाबत
कमकुवत असतात.
- हातवरे करून
संभाषण व जलद बोलण्याचा फायदा होतो.
- भूमिकापालन
तंत्राद्वारे फायदा होतो.
- अशा व्यक्ती खेळात चांगल्या असतात.
- काम करताना
किंवा अभ्यास करताना बॅगग्राउंड संगीत ऐकणे/लावणे आवडते.
- अभ्यास करताना
वारंवार खंड पडतो.
- संगीत वाद्ये
वाजविण्यात चांगले असतात.
- नृत्य, मार्शल आर्ट्स यासारख्या कलेत पारंगत असतात.
- कला, हस्तकला व प्रयोगशाळेतील प्रयोगात आनंद मिळतो.
- दिर्घ काळाच्या व्याख्यानामुळे थकवा येतो.
- मित्रमैत्रिणीशी
हस्तांदोलन व स्पर्शाची भाषा आवडते.
- अध्ययन
स्वातंत्र व हालचाल करण्याची मुबा दिल्यास अध्ययन चांगले होते.
- कृतीपर अध्ययन
शैलीच्या विद्यार्थ्यासाठी टिप्स्:
आपल्या अध्ययन
शैलीत सुधारणा घडवून आणण्यासाठी खालील टिप्स् लक्षपूर्वक पहा.
- वर उल्लेख
केलेल्या तंत्राचा सराव.
- वरील नियम व
तत्वांची अंमलबजावणी.
- स्वत:च
स्वत:साठी एखादे प्रतिमान (model) तयार करणे.
- प्रत्यक्ष कृतीतून
कार्यरत राहणे.
- पारंपारीक टेबलखुर्ची किंवा डेस्क सारख्या आसनापेक्षा आपणास
अभ्यासासाठी आरामदायक आसनांचा वापर करावा.
- थोडे शारीरिक
परीश्रमापेक्षा स्मृती सुधार तंत्रे किंवा ड्रील्सवर काम करावे.
- स्मृती
सुधारासाठी मुकाभिनय किंवा प्रत्यक्ष अभिनय हा फलदायी ठरू शकेल.
- टेबल/डेस्कवर पुस्तक ठेऊन वाचण्यापेक्षा ते तुमच्या हातामध्ये ठेवण्याचा
प्रयत्न करा.
- एखद्या
गोष्टीचे स्पष्टीकरण देतेवेळी उभे राहण्याचा प्रयत्न करा.
- वाचन करीत
असताना टिपणे (notes) काढत चला.
- माहिती
आठवण्यापेक्षा ती मुद्यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा.
- नेहमी वर्गात
सुरूवातीला बसत जा.
- अभ्यासाचे
प्रतिमान तयार करताना प्राथमिक संकल्पना स्पष्ट होतील अशाप्रकारे करा.
- शक्य झाल्यास
वर्गातील व्याख्याने रेकॉर्डींग करून ते विद्यार्थ्याना पुन्हा ऐकण्यास
प्राधान्य द्या.
कृतीपर अध्ययन शैलीच्या विद्यार्थ्यासाठी
रिकाम्या जागा भरा व बहुपर्पायी यासारख्या
परीक्षेद्वारे चांगल्याप्रकारे मुल्यमापन करता येते.
कृतीपर अध्ययन शैली असलेल्या विद्यार्थ्यासाठी
दिर्घ निबंध लेखनाद्वारे मुल्यमापपन केल्यास त्यांना खूपच अवघडल्यासारखे वाटते.
अध्ययन शैली
जाणून घेतल्यामुळे होणारे फायदे:
प्रत्येक
विद्यार्थी हा एकमेवाद्वितीय अध्यनार्थी असतो. त्यामुळे कोणतेही दोन
विद्यार्थी एकसारखे असू शकत नाहीत आणि कोणतेही दोन विद्यार्थी एकाच पद्धतीने
अभ्यास करू शकत नाहीत. त्यामुळे अध्ययन शैली
जाणून घेतल्यामुळे शैक्षणिक, वैयक्तिक व व्यावसायिक फायदे होतात.
- अध्ययनाच्या
अंगभूत क्षमतेत वाढ होते
- सर्व शैक्षणिक
स्तरावर फलदायी/यशदायी
- अध्ययन
शैलीच्या जाणिवेमुळे चांगला अभ्यास
व परीक्षेत चांगले यश मिळते.
- वर्गातील
मर्यादेतून बाहेर पडता येते.
- अवसाद व ताणाची
पातळी कमी होण्यास
मदत होते.
- सद्याची अध्ययन
तंत्रे विस्तारण्यास मदत होते.
- आत्मविश्वास व
स्वआदर सुधारण्यास मदत होते.
- मेंदूचा वापर
अधिक चांगल्याप्रकारे कसा करावा हे समजते.
- आपली बलस्थाने
व कमकुवत अंगाची ओळख होण्यास मदत होते.
- अध्ययनातील
आनंद कसा मिळवायचा हे समजते.
- अध्ययनासाठीच्या
प्रेरणा विकसित होतात.
- अंगभूत क्षमता
व कौशल्ये यांच्यात वाढ कशी करावी हे समजते.
- व्यावसायिक
घटकांशी अद्ययावत राहण्यास मदत होते.
- स्पर्धेत टिकाव
कसे धरावे हे समजते.
- संघ व्यवस्थापन
परिणामकरित्या करणेस मदत होते.
- एखाद्या घटकाचे
सादरीकरण अधिक परिणामकारकपणे करण्यास शिकतो.
- संभाषण कौशल्ये
विकसीत होतात.
- एखादी गोष्ट
साध्य करण्याच्या क्षमतेत वाढ होते.
अनेक
संशोधनातून असे दिसून आलेले आहे की सर्वसाधारण विद्यार्थ्याचा विचार केल्यास
त्यांची विभागणी ही 65% दृष्य, 30% श्राव्य व
5% कृतीपर अध्ययन शैलीत केली जाऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली अध्ययन शैली ओळखून अभ्यास सवयी विकसित करावी.
व्यक्ती तितक्या प्रवृत्तीच्या नियमानुसार
काही विद्यार्थ्यामध्ये दोन किंवा तिन्हीचे एकत्रीकरण आढळून येईल. त्यामुळे आपली नेमकी
अध्ययन शैली जाणून घेऊन अभ्यास करा आणि पालकहो विध्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययन शैलीनुसार
अभ्यास करु द्या ही विनंती.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
Fleming, N. D. and Mills, Colleen (1992).
Not Another Inventory, Rather a Catalyst for Reflection, To Improve the Academy,
Vol. 11, pp. 137
Marton, F., & Booth, S.A. (1997). Learning and awareeneess.
Mahwah, NJ: Lawrence Erlbaum associates.
Sternberg, R. J. (1997). Thinking styles. New York: Cambridge
University press
Sternberg, R. J., & Grigorenko, E.L. (1997). Styles of thinking
in school. European journal of High
Ability, 6(2), 1-18
Sternberg, R. J., & Grigorenko, E.L. (1997). Are cognitive
styles still in style?. Ameerican
Psychooloogist, 52, 700-712
Sternberg, R. J., & Zhang, Li-Fang (2001). Perspectives on
thinking, learning, and cognitive styles. Mahwah, NJ: Lawrence Erlbaum
associates.