हॅविंगहर्स्ट वैकासिक कार्ये | Havighurst’s
Developmental Task Theory
ओबामा 55 व्या वर्षी निवृत्त झाले, ट्रम्प यांनी 70 व्या वर्षी आणि बायडेन
यांनी तर 80 व्या वर्षी त्यांच्या करिअरची सुरुवात केली. सिडनी पर्थपेक्षा 3 तास
पुढे आहे, पण
त्यामुळे पर्थची गती कमी होत नाही. कोणीतरी वयाच्या 22 व्या वर्षी पदवी प्राप्त
केली, परंतु
चांगली नोकरी मिळवण्यापूर्वी 5 वर्षे वाट पहावी लागली. कोणी 25 व्या वर्षी CEO झाला आणि 50 व्या वर्षी मरण पावला. तर
कोणी 50 व्या वर्षी CEO झाला आणि 90 वर्षे जगला. कोणीतरी अजूनही अविवाहित आहे, तर कोणी लग्न केले आहे. ही यादी न
संपणारी आहे .............
या जगात प्रत्येकजण आपापल्या टाइम झोनवर आधारित
कार्यरत आहे. आपल्या आजूबाजूचे काही लोक आपल्या पुढे आहेत तर काही आपल्या मागे
आहेत असे वाटू शकते. पण प्रत्येकजण आपापल्या परीने, आपापल्या काळात धावत असतो.
सध्या आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची कार्ये
कोणती आहेत? आपण साफसफाई करणे किंवा बिल भरणे यासारख्या
छोट्या गोष्टींबद्दल बोलत नाही. तर आपल्या सर्वांगीण विकासातील सर्वात मोठ्या
उद्दिष्टांबद्दल बोलत आहे. हॅविंगहर्स्ट यांच्या वैकासिक कार्य सिद्धांतानुसार, आपले वय ही मोठी भूमिका बजावते.
कोण आहेत हे हॅविंगहर्स्ट?