योगा थेरपी आणि मनोसामाजिक आरोग्य
आंतरराष्ट्रीय
योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा
दिवस जगभरातील लोकांना योगाचे फायदे जाणून घेण्यासाठी आणि जीवनात समाविष्ट करण्यास
प्रोत्साहित करण्यासाठी समर्पित आहे. 2014 मध्ये, भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत 21 जून रोजी
आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव
मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला आणि 11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्र महासभेने 21 जून रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा ठराव मंजूर
केला. 21 जून 2015 या दिवशी पहिला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला होता.