SOAR Analysis | SOAR विश्लेषण
SOAR
Analysis हे एक स्व-विश्लेषण तंत्र असून ते आपल्या विद्यमान सामर्थ्यावर
लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि भविष्यकालीन उद्दिष्टांसाठी नवी दृष्टी विकसित
करण्यासाठी वापरू शकतो. हे मुळात एक धोरणात्मक नियोजन करण्याचे साधन आहे
ज्याद्वारे आपण आपल्या महत्वाकांक्षा सुस्पष्ट करू शकतो.
SOAR
विश्लेषण हे प्रामुख्याने आपण कोण आहोत आणि भविष्यात आपण स्वतःला
कुठे पाहतो आणि इतरांबरोबर कसे काम करत आहात हे समजून घेण्यास मदत करते. आपण SWOT
विश्लेषण बद्दलचा लेख वाचला असाल तर त्याच्याशी हे साम्य असेल. SWOT
विश्लेषण हे आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे
आहे तर SOAR विश्लेषण हे व्यक्तिमत्वाबरोबरच ध्येय धोरणे
निश्चितीसाठी आवश्यक आहे. आपण हे लक्षात ठेवावे की आपल्या विचारांची किंवा धोरणात्मक
प्रक्रियेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ही सर्व फ्रेमवर्क आहेत. म्हणूनच, या सर्वांचे अगदी नवीन तंत्रात विलीन करून दुसरी रचना शोधणे देखील शक्य
आहे. जर आपला विश्वास असेल तरच त्यांना मर्यादा आहे अन्यथा आपल्या महत्वाकांक्षेला
आकाश ठेंगणे असते. आपण SOAR विश्लेषणाच्या घटकांचे एक-एक करून परिक्षण
करणार आहोत आणि प्रत्येक शीर्षकाच्या खाली SOAR
विश्लेषण
प्रश्न सापडतील.