21 व्या शतकासाठी 21 धडे | 21 Lessons For The 21st Century
मानवाची
उत्क्रांती ही एक खूपच दीर्घ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, ज्यात लाखो वर्षांच्या काळात शरीर, मेंदू, समाज आणि सांस्कृतिक विकास झाला आहे. हॉमिनिड्सचा उदय सुमारे 2.5 दशलक्ष वर्षांपूर्वी होमो हॅबिलिस नावाचा मानव उदयास आला, ज्याने पहिल्यांदा साधनांचा वापर केला. सुमारे 1.8
दशलक्ष वर्षांपूर्वी होमो इरेक्टसने आग आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर
केला. त्यांनी आफ्रिका ते आशिया आणि युरोपमध्ये स्थलांतर केले. भारतीय उपखंडात,
सोहन आणि भीमबेटका यासारख्या स्थळांवर पाषाणयुगीन अवशेष आढळतात.
सुमारे 300,000 वर्षांपूर्वी आधुनिक मानव (होमो सेपियन्स)
आफ्रिकेतून उत्क्रांत झाला. त्यांनी विविध प्रसंग आणि घटनामधून अनुभूतुच्या आधारे
बोधनिक (Cognitive) क्षमतांमध्ये मोठी वाढ घडवून आणली,
ज्यामुळे भाषेचा विकास आणि सामाजिक संरचनांची निर्मिती झाली.