कॉर्टिसॉल एक स्टेरॉईड हार्मोन
ताण हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.
परीक्षा, कामाचा ताण, आर्थिक अडचणी, वैयक्तिक संबंधांमधील समस्या अशा अनेक गोष्टी आपल्याला तणावाखाली आणू
शकतात. जेव्हा आपण तणावाखाली असतो, तेव्हा
आपले शरीर "लढा किंवा पळ" (fight-or-flight) मोडमध्ये जातं. या मोडमध्ये, आपले
अधिवृक्क ग्रंथी (adrenal gland) कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन सोडतात. अनेकांच्या
बाबतीत हा कोणत्याही कारणाशिवाय स्त्रवत राहतो त्यामुळे ओबेसिटी, विनाकारण येणारा
ताण, अस्वस्थता किंवा कसंतरी होण हे यात समाविष्ट होत.