गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

प्लेसिबो इफेक्ट | कृतक गुटी | Placebo Effect

 

प्लेसिबो इफेक्ट/प्रभाव | कृतक गुटी | Placebo Effect

            अनेक डॉक्टरांनी ''मिस्टर राइट,'' जो लिम्फ नोड्सच्या अंतिम टप्प्यातील कर्करोगाने ग्रस्त होता त्याच्याकडे काहीच दिवस शिल्लक आहेत असे सांगितले होते.  1957 मध्ये  मिस्टर राइटला लाँग बीच, कॅलिफोर्निया येथे संत्र्याच्या आकाराच्या ट्यूमरसह रुग्णालयात दाखल केले, त्याने ऐकले होते की शास्त्रज्ञांनी घोड्याचे सीरम, क्रेबिओझेन शोधले आहे, जे कर्करोगावर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. मिस्टर राइटने डॉक्टरांकडे ते मिळवण्यासाठी विनवणी केली.

      त्याचे डॉक्टर, डॉ. फिलिप वेस्ट यांनी शेवटी सहमती दर्शवली आणि शुक्रवारी दुपारी मिस्टर राइट यांना एक इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर पुढच्या सोमवारी, डॉक्टर चकित झाले कारण त्यांचा पेशंट त्याच्या ''मृत्यू शय्येवरून'' बाहेर पडून, तो परिचारिकांशी विनोद करत होता. ट्यूमर, ''गरम स्टोव्हवरील बर्फाच्या गोळ्याप्रमाणे वितळले होते.''

      दोन महिन्यांनंतर, मिस्टर राइट यांनी वैद्यकीय अहवाल वाचले की घोड्याचे सीरम हा एक बनावट उपाय आहे. त्यानंतर त्याला तात्काळ रोगाची लक्षणे दिसू लागली. ''तुम्ही पेपरमध्ये जे वाचता त्यावर विश्वास ठेवू नका,'' असे डॉक्टरांनी मिस्टर राइटला सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्‍शन दिले आणि त्यास सांगितले की त्या औषधाची 'नवीन सुपर-रिफाइंड डबल स्ट्रेंथ' आवृत्ती आहे. वास्तविक, ते पाणी होते, परंतु पुन्हा, ट्यूमरचा मास वितळला. मिस्टर राइट आणखी दोन महिने आरोग्य पूर्ण जीवन जगले,  जोपर्यंत त्यांनी क्रेबिओझेन निरुपयोगी असल्याचे सांगणारा निश्चित अहवाल वाचला नाही, त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

      ज्या डॉक्टरांना ही कथा माहित आहे त्यांनी ती त्या विचित्र कथांपैकी एक म्हणून नाकारली ज्याचे उत्तर वैद्यकशास्त्र देऊ शकत नाही. रुग्णाच्या विश्वासामुळे प्राणघातक आजार बरा होऊ शकतो किंवा नाहीसा होऊ शकतो ही कल्पना खूपच विचित्र आहे, यालाच प्लेसिबो इफेक्ट म्हणतात. 

"विश्‍वासाच्या जोरावर जग जिंकता येते", असे आपण आपल्या वाडवडीलांना बोलताना अनेकदा ऐकले असेल. हे विधान केवळ मानवी जीवनातच नव्हे तर वैद्यकीय व्यवहारात देखील वापरले जाते. होय, प्लेसिबो इफेक्ट ही अशीच एक वैद्यकीय पद्धत आहे ज्यामध्ये रुग्ण कोणत्याही औषधाने बरा होत नाही तर त्याच्या विश्वासाच्या आधारावर बरा होतो. या प्रकारच्या थेरपीमध्ये डॉक्टर रुग्णाच्या मनात असा विश्वास निर्माण करतात की तो त्यांच्या औषधाने बरा होईल. मात्र प्रत्यक्षात या उपचारात रुग्णाला कोणतेही औषध दिले जात नाही. आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचारांसाठी प्लेसिबो इफेक्टचा यशस्वीपणे वापर केला जात आहे. केवळ डॉक्टरच नाही तर पंडित-पुजारी, बुवा-बाबाही प्लेसिबो ​​इफेक्टचा वापर करतात. जेव्हा तुम्ही तुमची समस्या बाबांकडे घेऊन जाता तेव्हा ते तुम्हाला उपाय सांगतात. त्याच्या तोडग्याने आपली समस्या दूर होईल असे आश्वासन तो देतो आणि तसे घडते. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवते तेव्हा प्लेसिबो प्रभाव अधिक प्रभावी असतो.

प्लेसबो प्रभावाचा अर्थ

प्लेसिबो हा लॅटिन शब्द आहे. 'प्लेसबो डोमिनो' हा शब्द पाचव्या शतकात बायबलच्या एका उताऱ्यातही वापरण्यात आला होता, ज्याचा अर्थ - "मी देवाला संतुष्ट करीन." ही वैद्यकीय पद्धत 18 व्या शतकात प्रथमच वापरली गेली. प्लेसिबो थेरपीमध्ये, रुग्णाला बरे करण्यासाठी त्याच्या विश्वासाच्या आधारावर उपचार केले जातात. प्लेसिबो हे असे औषध आहे ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.  मानसशास्त्रीय शब्दकोशानुसार प्लेसिबो इफेक्ट यास कृतक गुटी असे म्हणतात.

रुग्णाच्या भ्रमावर उपचार केले जातात

बहुतांशपणे असे घडते की त्या व्यक्तीला प्रत्यक्षात कोणताही आजार नसून तो आजारी असल्याचा केवळ भ्रम असतो. प्लेसिबो थेरपीमध्ये या भ्रमाचा उपचार केला जातो. उदाहरणार्थ, तुम्हाला तीन ते चार दिवस सर्दी आणि खोकला आहे. तुम्ही उपचारासाठी डॉक्टरकडे जाता आणि तो तुम्हाला औषध देतो.

डॉक्टर तुम्हाला दररोज एक टॅब्लेट घेण्यास आणि आठवड्यानंतर परत येण्यास सांगतात. तुम्ही औषध घेता आणि तुमचे दुखणे बरे होते कारण तुम्ही त्या डॉक्टरवर विश्वास ठेवता. आता प्रत्यक्षात काय होते की डॉक्टर तुम्हाला अशी गोळी देतात ज्यामध्ये कोणतेही रासायनिक द्रव्य नसते, म्हणजे त्यात कोणतेही औषध नसते. वास्तविक, सर्दी-खोकला 4-5 दिवसांत स्वतःच बरा होतो. परंतु तुम्हाला वाटते की औषध आश्चर्यकारक आहे. आधुनिक वैद्यकीय पद्धतींमध्ये अशा गोळ्या यशस्वीपणे वापरल्या जात आहेत.

संशोधकाच्या मते प्लेसिबो

या थेरपीचा प्रत्यक्ष कोणताही परिणाम होत नाही आणि जरी रुग्णाच्या तब्येतीत काही सुधारणा होत असेल तर ती इतर काही कारणांमुळे होत असते, याला प्लेसिबो इफेक्ट किंवा प्लेसबो प्रभाव म्हणतात. असे नाही की, रुग्णाला याची जाणीव नसते तेव्हाच प्लेसिबो ​​इफेक्ट काम करेल, पण अनेक संशोधनांमध्ये असेही आढळून आले आहे की असे अनेक रोग आहेत ज्यामध्ये रुग्णाला माहित असते की त्याच्या उपचारासाठी प्लेसिबोचा वापर केला जात आहे, पण तरीही अशा आजारांवर प्लेसिबो प्रभावी ठरते.

हॉवर्ड मेडिकल स्कूलमध्ये प्लेसिबो इफेक्टवर संशोधन करण्यात आले. या संशोधनात अपचनाचा त्रास असलेल्या काही लोकांना उपचारासाठी औषध देण्यात आले. यामध्ये केवळ मिठाई असून त्यात औषध नसल्याचेही त्यांना सांगण्यात आले, पण तरीही संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना या गोळ्यांनी अपचनाच्या समस्येपासून आराम मिळाला.

प्लेसिबो प्रभावाची परिणामकारकता

प्लेसिबो इफेक्ट एखाद्या व्यक्तीच्या धारणा आणि अपेक्षांच्या तत्त्वावर आधारित असतो. या वैद्यकीय पद्धतीचा परिणाम एखाद्या व्यक्तीचे मन आणि त्याचे शरीर यांच्यातील संबंधांवर आधारित आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर एखाद्या व्यक्तीला काही औषधाने किंवा गोळीने तो बरा होईल अशी अपेक्षा असेल तर त्याच्या शरीरात असे काही परिणाम होतात जे प्रत्यक्ष औषधाने होतात. या कारणास्तव, तो प्लेसिबो ​​असलेल्या गोळीने देखील बरा होतो.

      अनेक संशोधकांचा असा विश्वास आहे की प्लेसिबो प्रभावामुळे व्यक्तीच्या शरीरात बदल झालेले आहेत. एका संशोधनात असे आढळून आले की प्लेसिबो इफेक्ट शरीरातील एंडोर्फिन नावाच्या रसायनाचे उत्पादन वाढवते, जे नैसर्गिक वेदना कमी करणारे आहे. संशोधनात असेही आढळून आले आहे की, अनेक वेळा, एखाद्या व्यक्तीची धारणा बदलणारे विविध घटक प्लेसिबो प्रभावाचे परिणाम बदलू शकतात. अशाच एका संशोधनानुसार, प्लेसिबो उपचारात दिलेल्या टॅब्लेटचा रंग आणि आकार यांचा परिणामकारकतेत फरक असतो. फिकट रंगाच्या गोळ्यांपेक्षा गडद रंगाच्या गोळ्यांचा प्रभाव चांगला असतो. त्याचप्रमाणे प्लेसिबो थेरपीमध्ये उपचारासाठी गोळ्यांपेक्षा कॅप्सूल अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

मानसशास्त्रीय संशोधनात प्लेसिबो प्रभाव

      मानसशास्त्रीय प्रयोगात, प्लेसिबो ही एक अचल उपचार किंवा पदार्थ आहे ज्याचे कोणतेही ज्ञात परिणाम नसतात. संशोधक प्लेसिबोचा वापर नियंत्रण समूहावर करू शकतात, जो प्लेसिबो किंवा फसव्या स्वतंत्र परिवर्त्याच्या संपर्कात असलेल्या सहभागींचा एक गट आहे. या प्लेसिबो उपचाराच्या परिणामाची नंतर प्रायोगिक गटाच्या परिणामांशी तुलना केली जाते.

उपचारांच्या परिणामकारकतेची चाचपणी घेण्यासाठी वैद्यकीय चाचण्यांमध्ये प्लेसबोचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, एका गटातील लोकांना वास्तविक औषध मिळते, तर इतरांना निष्क्रिय औषध किंवा प्लेसबो मिळते. वैद्यकीय ट्रायलमधील सहभागींना माहीत नसते की त्यांना खरी गोष्ट मिळाली की प्लेसबो. अशा प्रकारे, दोन्ही गटांच्या प्रतिसादाची तुलना करून संशोधक औषध कार्य करते की नाही हे शोधू शकतो. जर दोनही गटाची समान प्रतिक्रिया असेल किंवा सुधारणा दिसून येत नसेल तर औषध कार्य करत नाही असे मानले जाते.

      नवीन औषधाचे मूल्यमापन करताना प्लॅसिबो वापरण्याचा मोठा फायदा हा आहे की ते परिणामावर अपेक्षेचा प्रभाव कमकुवत करते किंवा काढून टाकते. जर संशोधकांना विशिष्ट परिणामाची अपेक्षा असेल, तर ते नकळतपणे सहभागींना त्यांनी कसे वागावे याबद्दल संकेत देऊ शकतात. याचा परिणाम अभ्यासाच्या निकालांवर होऊ शकतो.

      अपेक्षा परिणाम कमी करण्यासाठी, संशोधक कधीकधी दुहेरी-अंधत्व अभ्यास म्हणून ओळखले जाणारे अभ्यास करतात. या प्रकारच्या अभ्यासात भाग घेणार्‍यांना किंवा संशोधकांना हे माहित नसते की कोणाला प्लॅसिबोची मात्रा दिली जात आहे आणि कोणाला खरे उपचार मिळत आहेत. अभ्यासावर प्रभाव टाकणाऱ्या या सूक्ष्म पूर्वग्रहांचा धोका कमी करून, संशोधक औषध आणि प्लॅसिबोचे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे तपासू शकतात.

प्लॅसिबोसंबंधी दंतकथा

      समाज माध्यमाद्वारा प्रसारित झालेली कथा आपल्याला माहिती असेल. ती कथा अशी आहे कि, अमेरिकेत जेव्हा एका कैद्याला फाशीची शिक्षा सुनावली, तेव्हा तेथील काही वैज्ञानिकांनी विचार केला, की आपण ह्या कैद्यावर काही प्रयोग करूयात. शास्त्रज्ञांना प्रयोग करण्यास परवानगी देण्यात आली. कैद्याला सांगितलं गेलं, की तुला फाशी न देता विषारी साप डसवून मारण्यात येइल. त्याला खुर्चीला बांधून एक मोठा साप त्याच्यासमोर आणण्यात आला. त्यानंतर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली. त्याला साप डसवून नाही, तर दोन सेफ्टी पिन्स टोचविण्यात आल्या आणि आश्चर्यकारकरित्या त्या कैद्याचा दोन सेकंदात मृत्यू झाला. त्या कैद्याचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर असे दिसून आले की त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याच्या शरीरात सापाच्या 'व्हेनम' सदृश्य विष सापडले. साप न चावताही हे विष त्या कैद्याच्या शरीरात कोठून आलं, की ज्यामुळे कैद्यांचा जीव गेला? तर ते विष मानसिक धक्क्यामुळे त्याच्या शरीरानेच उत्पन्न केलं होतं. यावरून हे सिद्ध होते की सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा हार्मोन्स आणि विषारी पदार्थ सोडतात. आपल्यावर परिणाम करणारे 75% रोग आपण निर्माण करत असलेल्या नकारात्मक ऊर्जेने मोठ्या प्रमाणावर प्रभावित होतात. भस्मासुर या पौराणिक राक्षसाप्रमाणे, त्याने ज्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याला मारण्याचे वरदान मिळाले होते. वरदानाच्या संशयाने, त्याने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आपला जीव गमावला.

वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत इतर आपल्याबद्दल काय विचार करतात याची आपल्याला पर्वा नसते. 25 ते 50 दरम्यान इतर आपल्याबद्दल काय विचार करतात याची आपण काळजी करतो. 50 शी नंतर, आम्हाला कळते की लोक स्वत:चाच विचार करण्यात खूप व्यस्त होते. चला तर जगाचा विचार सोडूया आणि जीवनाचा आनंद घेऊया. कदाचित हे कायमचे टिकणार नसेल परंतु जर आपण जीवनाकडे योग्य दृष्टीकोनातून पाहिल्यास जीवन सुंदर आहे.


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Banagiri, V. (2014). The Placebo Effect: I Think, Therefore It Exists. Author Solutions.

Brown, W. A., & Brown, W. A. (2013). The Placebo Effect in Clinical Practice. OUP USA.

Colloca, L. (Ed.). (2018). Neurobiology of the Placebo Effect, Part I. Elsevier Science.

Colloca, L. (Ed.). (2018). Neurobiology of the Placebo Effect, Part II. Elsevier Science.

Erik, Vance (2016). Suggestible You: The Curious Science of Your Brain's Ability to Deceive, Transform, and Heal. National Geographic

Hall, K. T. (2022). Placebos. MIT Press


1 टिप्पणी:

Thank you for your comments and suggestions

रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills

  रोजगारक्षम कौशल्ये | Employability Skills      एम्प्लॉयमेंट असेसमेंट कंपनी “एस्पायरिंग माइंड्स” च्या अहवालानुसार, देशातील 80 टक्क्यांहू...