शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

सायबर सुरक्षा | Cyber Security

    सायबर सुरक्षा | Cyber Security 

    Information Security Education and Awareness (ISEA) ह्या जाणीव-जागृतिविषयक कार्यक्रमाद्वारे, पौगंडावस्थेतील मुलामुलींना / विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल नेहमीच माहिती व सूचना दिल्या जातात. इंटरनेट वापरण्यापूर्वी त्या पायर्‍यांचा / सूचनांचा अवलंब करावे.

1. वेब ब्राउझर वापरणे

मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी इंटरनेट खूपच उपयोगी आहे. अनेक विद्यार्थी बातम्या तसेच संशोधनाची माहिती मिळवण्यासाठी, पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी, खरेदीसाठी, अर्ज भरण्यासाठी नेटचा वापर करतात. बॅँकिंग, बिले भरणे, विविध अर्ज भरून सादर करणे ह्यांसाठीही इंटरनेट लोकप्रिय आहे. ही ऑनलाइन कामे करण्यासाठी वेब ब्राउझर वापरावा लागतो. हे अगदी सोपे आहे परंतु ब्राउझरमध्ये तुम्हाला आणि तुमच्या कॉँप्यूटरला धोकादायक असलेल्या काही गोष्टी लपलेल्या असू शकतात, उदा. वैयक्तिक संवेदनशील माहिती उघड होणे, व्हायरस व हेरगिरी तसेच व्यापारी स्वरूपाची सॉफ्टवेअर (ह्यांना मालवेअर, स्पायवेअर, ऍडवेअर इ. नावे आहेत) कॉँप्यूटरमध्ये घुसणे इ. ह्या ऑनलाइन धोक्यांची जाणीव ठेवून ते टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलणे म्हणजेच सुरक्षित ब्राउझिंग.

इंटरनेट सुरक्षितपणे ब्राउझ करण्यासाठी थोडीच प्राथमिक माहिती, आवश्यक प्रयत्न आणि काही साधनांची गरज असते. आपली वैयक्तिक माहिती आणि आपला कॉँप्यूटरसुद्धा ऑनलाइन असताना तो सुरक्षित ठेवण्यासाठी खालील मार्गदर्शक बाबींचा अवलंब करा.

 • कॉँप्यूटर किंवा तत्सम उपकरणामध्ये नवीनतम ऍँटिव्हायरस सॉफ्टवेअर स्थापित करून त्याचा वापर करा.
 • आपला ब्राउझर अद्यावत ठेवा
 • कॉँप्यूटरवर असाधारण प्रक्रिया किंवा समस्या आढळल्यास सावध व्हा.
 • कॉँप्यूटरवर फायरवॉल स्थापित करून तो वापरा.
 • पॉपअप-ब्लॉकर सारख्या सुविधा पुरवणार्‍या आधुनिक ब्राउझरचा वापर करा.
 • संवेदनशील माहिती कॉँप्यूटरमध्ये दीर्घकाळ साठवून ठेवणे टाळा.
 • पासवर्ड सतत बदलत रहा.
 • इंस्टंट मेसेजिंगद्वारे मिळणार्‍या लिंक्स तसेच इमेल ऍटॅचमेटपासून सावध रहा.

2. सोशल मीडियावर फ्रेंड्स’ बनवणे

कॉँप्यूटरवर तासनतास घालवणे योग्य नाही हे आपणां सर्वांनाच माहीत आहे. परंतु सोशल नेटवर्कवर मोठ्या संख्येने ‘फ्रेंड्स’ असवेत असा खूप लोकांचा अट्टाहास असतो हीदेखील एक समस्या आहे. ह्याबाबत लक्षात ठेवण्याच्या काही बाबी अशा:

 • खरी मैत्री लोकांशी प्रत्यक्ष बोलून आणि अनुभवांची देवाणघेवाण करून होते, ऑनलाइन फक्त एक बटन क्लिक केल्याने नव्हे.
 • प्रत्यक्ष भेटीतून साधणारी मैत्री ऑनलिन फ्रेंडशिप पेक्षा अधिक अर्थपूर्ण असते.
 • एखाद्या कॉमेंटमुळे गैरसमज होऊन तुमची ऑनलाइन मैत्री अत्यंत सहजपणे तुटू शकते.
 • काही मतभेद किंवा वादावादी झाल्यास अशी समस्या प्रत्यक्ष बोलून सोडवणे केव्हाही अधिक सोपे आणि योग्य असते.

त्यामुळे आपल्या माहितीत माझे सोशल नेटवर्किंग साईटवर ‘फ्रेंड्स’ आहेत असे गर्वाने सांगणारे कोणी असले, तरी हे लक्षात असू द्या की मैत्री ही कॉम्प्यूटरद्वारे होत नसते.

सोशल नेटवर्किंग साइट्सवर सुरक्षित राहण्यासाठी काही टिप्स

 • सदस्य होण्यापूर्वी स्वतःचे वय पुरेसे असल्याची खात्री करावे.
 • प्रोफाइलवर स्वतःच्या खर्‍या नावाऐवजी टोपण नाव किंवा दुसरेच एखादे नाव वापरू शकता.
 • ज्यांना वैयक्तिकरीत्या ओळखत नसाल अशा व्यक्तींना फ्रेंडस बनवू नका.
 • स्वतःच्या नावाचा समावेश नसलेला इमेल पत्ता वापरू शकता.
 • प्रोफाइल सेट करताना सर्वांत मजबूत प्रायव्हसी सेटिंग वापरा, ह्यामुळे फक्त तुमचे फ्रेंड्स तुमची माहिती पाहू शकतील तसेच प्रोफाईल लॉक करा.
 • फोटो आणि व्हीडिओ अपलोड करताना अत्यंत सावध रहा कारण ह्या गोष्टी तुम्ही फक्त तुमच्या फ्रेंड्ससोबतच शेअर केल्या तरी त्या सहजपणे पुढे पाठवल्या जाऊ शकतात.
 • कोणताही आशय किंवा मजकूर इ. ऑनलाइन शेअर करण्याबाबत सावध रहा, विशेषतः त्याची मालकी दुसर्‍यांची असल्यास. बेकायदेशीर बाबी डाउनलोड करणे नक्कीच टाळा.

3. स्मार्टफोनची सुरक्षितता

मोबाइल फोनचा वापर आता मित्रपरिवार किंवा कुटुंबियांना कॉल करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक स्मार्टफोन वापरून अनेक कामे करता येतात – इंटरनेट ब्राउझ करणे, बिले भरणे, बॅँकेचे व्यवहार करणे, कार्यालयीन इमेल तपासणे इ. आजचे स्मार्टफोन प्रगत असल्याने इतके दिवसपर्यंत कॉँप्यूटरपुरत्या असलेल्या सुरक्षाविषयक समस्या आता स्मार्टफोनमध्येही दिसतात.

धोके कशा स्वरूपाचे आहेत?

हरवणे किंवा चोरीला जाणे. ह्यामुळे पैशाची आणि वैयक्तिक हानी होते, त्यामधील माहिती वाया जाते आणि माहिती-सुरक्षिततेच्या नियमांमुळे जबाबदारी वाढते.

संवेदनशील माहितीचे नुकसान. मोबाइल साधनांमध्ये संवेदनशील किंवा गुप्त माहिती साठवलेली असू शकते, उदा. वैयक्तिक स्वरूपाचे फोटो आणि व्हीडिओ, इमेल संदेश, मजकुरात्मक (टेक्स्ट) संदेश, फाइल्स इ.

नेटवर्कमध्ये अनधिकृत घुसखोरी. अनेक मोबाइल साधनांमध्ये नेटवर्कला जोडण्याबाबतचे विविध पर्याय असू शकतात व त्यांचाच वापर करून संरक्षित सिस्टिम्सवर हल्ला चढवला जाऊ शकतो.

अडथळा आणलेली किंवा खराब केलेली माहिती. मोबाइल फोन्सवरून असंख्य ऑनलाइन  व्यवहार केले जात असल्याने, फोन लाइन टॅप करून किंवा सूक्ष्मलहरी (मायक्रोवेव्ह) प्रक्षेपणांत अडथळा आणून, महत्त्वाची माहिती वाचली जाऊ शकते.

मॅलिशिअस (घातक) सॉफ्टवेअर. व्हायरस, ट्रोजन हॉर्स, वर्म्स हे प्रकार मोबाइल साधनांमध्ये घुसू शकतात आणि ही विशेष आजकाल चिंतेची बाब बनली आहे.

ते आपण कशा प्रकारे टाळू शकतो?

 • मोबाइल साधनाची निवड करताना त्यामधील सुरक्षा-सुविधा तपासा आणि त्या चालू झाल्याची खात्री करा.
 • तुमच्याकडील स्मार्ट-साधनामध्ये ऍँटिव्हायरस ऍप प्रस्थापित करून त्याचा वापर करा.
 • संशयास्पद इमेल किंवा टेक्स्ट मेसेजमधून येणार्‍या लिक्स उघडू नका.
 • मोबाइल साधनामध्ये कोणती माहिती साठवायची आणि कोणती नाही हे काळजीपूर्वक ठरवा
 • ऍप्स निवडून ती प्रस्थापित (इंस्टॉल) करताना सावध रहा
 • असुरक्षित वायफाय हॉटस्पॉट वापरून अपरिचित वायफाय नेटवर्क्सवर जाणे टाळा.
 • वायफाय, ब्ल्यूटूथ, इन्फ्रारेड ह्.यांसारखी संवादमाध्यमे (इंटरफेस) वापरात नसताना बंद ठेवा.
 • एखादे संसाधन टाकून देण्यापूर्वी त्यामध्ये साठवलेली सर्व माहिती काढून टाका (डिलीट करा).

(सर्व चित्रे, इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Information security education and awareness program (2018). माहिती सुरक्षा जागरूकता हैंडबुक https://www.infosecawareness.in/material-download/handbooks/marati-general-handbook-1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

योगा थेरपी आणि मनोसामाजिक आरोग्य| Yoga Therapy and Psychosocial health

  योगा थेरपी आणि मनोसामाजिक आरोग्य आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांना योगाचे फायदे जाणू...