सोमवार, ५ जुलै, २०२१

कार्यालयीन मानसिक आरोग्य | Mental Health at Workplace

 

कार्यालयीन मानसिक आरोग्य

आज जागतिक पातळीवर 30 कोटी लोक डिप्रेशनने ग्रासलेले आहेत. त्यामुळे डिप्रेशन मानवास पंगू बनविन्याचे एक प्रमुख कारण बनले आहे. यातील कांही लोक चिंताग्रस्त असलेलेही आढळून आलेली आहेतअलिकडील WHO (जागतिक आरोग्य संघटना) च्या अभ्यासावरून डिप्रेशन व चिंतेमुळे जागतिक पातळीवर 1 अब्ज अमेरिकन डॉलरएवढे नुकसान घडून आलेले आहेआज मानसिक आरोग्य विषयक समस्येमुळे बेरोजगारी हा मोठा धोका निर्माण झाला आहेकार्यालयीन वातावरण नकारात्मकतेमुळे शारीरिक व मानसिक समस्या उदभवू शकते आणि त्यामुळे लोक नोकरी गमावू शकतातकार्यालय ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी मानसिक आरोग्यास चालना मिते व मानसिक अस्वास्थ लोकांना आधार मितोयामुळे कार्यालयीन अनुपस्थिती कमी होन उत्पादकता वाढीमुळे आर्थिक वृध्दी घडून येते. WHO ने 2017 हे वर्ष कार्यालयीन मानसिक आरोग्यावर भर देन काम कारावयाचे ठरविले होतेज्यामुळे कर्मचायांचे ताण तणाव व कार्यक्लांती (burnout) यांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.

आरोग्यासाठी कामाशी निगडित घटक:

        सद्याच्या परिस्थितीत मानसिक आरोग्यास धोका निर्माण करू शकतील असे अनेक घटक उपस्थित आहेत. संघटनात्मक व व्यवस्थापकीय परिस्थिती, कर्मचायांची कौशल्ये व क्षमता आणि कर्मचायांना नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यास मिणारा आधार यातून होणारी आंतरक्रियात्मक धोके जास्त आहेतउदाएकाद्या कर्मचायांकडे नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्याची कौशल्ये जरी असली तरी ते कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक स्त्रोत नसतील किंवा व्यवस्थापकीय व संघटनात्मक आधार मिळाला नाही तर समस्या निर्माण होतात. कामाशी संबंधीत आरोग्य व सुरक्षतेविषयी अपुया योजनाअपुरे संभाषण व व्यवस्थापकीय व्यवहार, निर्णयप्रक्रियेतील मर्यादित सहभाग किंवा विशिष्ट कार्यक्षेत्रातील नियंञणाचा अभावकर्मचायांसाठी पाठिंब्यांचा अभाव, अलवचिक कामाच्या वेळा आणि अस्पष्ट कामाचे स्वरूप किंवा अस्पष्ट संघटनात्मक उद्दिष्टे अशा घटकांचा समावेश होतो.

व्यक्तिच्या क्षमतेच्या विपरित काम देणे किंवा अति आणि असंबंधित कार्यभार यासारखे कामाच्या स्वरूपाशी निगडित कार्यालयीन धोके असू शकतात. काही कामाच्या ठिकाणी अतिशय अवघड कार्य पार पाडावे लागतेयामुळे मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो व मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे दिसतात परिणामी व्यक्तिला मादकद्रव्ये व पदार्थ सेवनासाठी उद्यूक्त करतातजर समूह व सामाजिक पाठिंबा कमी पडल्यास याचे प्रमाण वाढण्याची शक्यता दाट असते.

कर्मचायांच्या कामाशी निगडित ताण वाढण्याची प्रमुख कारणेही कार्यालयातील कामाचा दबाव, अनियमितता, नियोजनाचा अभाव व मानसिक छ हे आहेत असे संशोधनातून दिसून आलेले आहे. सद्या कर्मचायांच्या आरोग्यामध्ये याचा मोठा धोका असलेला दिसून येतो. त्यामुळे कर्मचायांमध्ये शारीरिक व मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेतयाचा परिणाम म्हणून कर्मचायांची उत्पादकता कमी झाली आहेत्याचबरोबर त्याचा नकारात्मक परिणाम हा त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक आंतरक्रियावरही झालेला दिसून येतो.

सदॄढ कामाची जागा निर्माण करणे:

सर्व कर्मचायांच्या चांगल्या आरोग्याचे संरक्षण, प्रोत्साहन, सुरक्षितता व जीवन कल्याणाव्दारे कर्मचारी व व्यवस्थापकांच्या सक्रिय सहभागातून आपण सदॄढ कार्यस्थनिर्माण करू शकतोअलिकडेच world economic forum नी 3 सक्षम दॄष्टिकोन सुचचिलेले आहेत.   कामाशी निगडित धोकादायक घटकांच्या क्षीणणाव्दारे मानसिक आरोग्याचे संरक्षण करणे,  कर्मचायांच्या क्षमता व कामाविषयी सकारात्मक दॄष्टिकोन विकसित करून मानसिक आरोग्यास चालना देणे. आणि कारणांची फिकीर न करता मानसिक आरोग्य समस्या सांगणेयाच्या पुर्ततेसाठी पुढील गोष्टी निर्माण करणे आवश्यक आहे.

1. कार्यस्थवातावरणाची जाणिवजागृती आणि विविध कर्मचाऱ्यासाठी सुयोग्य मानसिक आरोग्यास चालना देन ते कसे आत्मसात करता येर्इल याची माहिती देणे.

2. संघटनेमधील नेतॄत्व प्रेरणेतून शिकणे व ते आमलात आणणे.

3. इतर कंपन्याना भेडसावणाया अडचणीना ते कसे सामोरे गेले याचा शोध घेणे.

4. कर्मचायांच्या वैयक्तिक गरजा व संधी ओखून कार्यस्थळावरील मानसिक आरोग्यासाठी चांगल्या योजना विकसित करण्यासाठी मदत करणे.

5. व्यक्तिंना कोणाकडून मदत व आधार मिळू शकेल अशा स्त्रोतांची जाणिव करून देणे.

कार्यस्थळातील मानसिक आरोग्याचे संरक्षण व उन्नतीसाठी उपाय व चांगल्या पद्धती.

1. अतिताण, घातक मनोविकारी घटक, आजारीपण यांच्या व्यवस्थापनासाठी स्त्रोत पुरवणे आणि यासाठी सुरक्षित योजना व चांगल्या पद्धतींचा अवलंब आणि अंमलबजावणी करणे.

2. आवश्यक त्यावेळी मदत करणारा सेवकवर्ग निर्माण करणे.

3. निर्णयप्रक्रियेत कर्मचाऱ्यांचा सहभाग घेणे ज्यामुळे संघटनेत संतुलित कार्यशैली विकसित होर्इल.

4. कर्मचायांच्या करियर विकसनासाठी कार्यक्रम राबविणे.

5. कर्मचायांच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव व सन्मान करणे.

एखादी गोष्ट होच नये म्हणून जशी काजी घेतली जाते त्याप्रकारे कर्मचायांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठी काजी घेणे, वेळेत लक्ष देणे, आधार व पुर्नवसन या गोष्टी तात्काकरणेयासाठी प्रत्येक संघटनेने व कार्यालयांनी अशी व्यवस्था करणे अपेक्षित आहेत्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सह-कर्मचारी वर्गांनी आपल्या सहकायांची काजी घेणे व त्यांना आवश्यक त्यावेळी मदत करणे काळाची गरज बनली आहे. एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपंथ...

कार्यालयातील मानसिक अस्वास्थ्य व्यक्तिंना आधार:

आपल्या समाजात कायद्याने का असेना कार्यालयात दिव्यांग व्यक्तिंना सामावून घेण्यास मदत केलेली आहेत्याप्रकारे एखाद्या मानसिक अस्वास्थ्य व्यक्तिला सामावून घेन त्यांनाही सन्मानाने काम करण्यास मदत केली पाहिजेआपल्या समाजात आजही मानसिक अस्वास्थ्य व्यक्तिला वाळी टाकले जातेमुळात अशा परिस्थितीत त्याला जास्त आधाराची गरज असतेकार्यालये व संघटनेने अशा व्यक्तिंसाठी लवचिक कार्यभार, कमी गुंतागुंतीचे कार्ये किंवा जमेल अशा कार्यांची जबाबदारी द्यावी जेणेकरून ते हळूहळू पुर्वस्थितीत ये शकतील.

अमेरिकासारख्या विकसित देशात मानसिक अस्वास्थ्य व्यक्तिंसाठी कामावर रूजू होण्यास व त्यांना सन्मानाने काम करण्यासंबंधीचे कायदे आहेतपण भारतात यासाठी ऑगष्ट, 2017 साल उजाडावे लागलेयाव्दारे कोणत्याही मानसिक अस्वास्थ्य व्यक्तिस भेदभावाची वागणूक देता कामा नयेहे झाले कायद्याचे पण त्यांचा एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपण हिसकावू शकत नाही.

WHO ची जबाबदारी:

WHO ने मानसिक आरोग्यासाठी प्रत्येक वर्षी वेगवेगया घटकांना समोर ठेन जागतिक पातीवर भरीव काम करत आलेली आहेत्यासाठी WHO ने 2008 पासून वेगवेगया कार्मचारी घटकासाठी कार्यरत राहीली आहेतसेच सर्वांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठी 2013 ते 2020 असा मोठा कृती कार्यक्रम आखलेला आहेत्याव्दारे जगभर लोकांच्या जीवनाचा दर्जा उंचावून स्वास्थपूर्ण जीवन जगता यावे यासाठी ही संस्था मदत करते. जगभर मानवी मूल्यांना महत्व प्राप्त करून देण्यासाठी WHO प्रयत्नशील असून सर्वांचे मानसिक आरोग्य सदॄढ रहावे यासाठी ही संस्था अखंडपणे प्रयत्नशील आहे.

केवळ WHO ने जबाबदारी घ्यावी आपण काहीही करणार नाही का? तर आपलीही तितकीच किंबहुना सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. कारण आपल्या निष्क्रिय वृत्तीने अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी सर्वाना एकत्र घेऊन चर्चा घडून मार्ग शोधणे व समस्याग्रस्त व्यक्तिंना आधार मिळवून देण्याचे खुप महत्वाचे काम आपण करू शकतो.

                                            
                     (सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

ॲनिमा आणि ॲनिमस | Archetypes: Anima and Animus

  जन्मताच आपण स्त्री-पुरुष असतो?  रामकृष्ण परमहंस हे एक भारतीय रहस्यवादी संत होते , जे आत्मज्ञान अनेक मार्गांनी प्राप्त केले जाऊ शकते या श...