बुधवार, १० एप्रिल, २०१९

तदानुभूती | Empathy |


भावनिक बुध्दिमत्ता व भावनांक (Emotional Intelligence & Emotional Quotient) या संज्ञा बऱ्याचवेळा समान अर्थाने वापरलेल्या आढळून येतात. वास्तविक भावनिक बुध्दिमत्ता ही वस्तू असून भावनांक हे या वस्तुच्या मापनाला दिलेले संख्यात्मक रुप आहे. बुध्दिमत्ता ही संकल्पना आपण विविध कसोटयांच्या सहाय्याने मोजतो. बुध्दिमापन करण्यासाठी आपण बुध्दिगुणांक हे परिमाण वापरतो.  भावनिक बुध्दिमत्ता मोजण्यासाठी काही कसोटया विकसित करण्यात आलेल्या आहेत. त्याआधारे मोजली जाणारी भावनिक बुध्दिमत्ता म्हणजे भावनांक होय.  भावनिक बुध्दिमत्तेचा संबंध थेट व्यक्तीच्या समाजातील स्थानाशी येतो.  आता आपण भावनिक बुध्दिमत्तेच्या विविध व्याख्याचा परामर्श घेऊ.
भावनिक बुध्दिमत्ता ही संकल्पना जगासमोर आणणा­या Danniel Goleman (1995) यांनी भावनिक बुध्दिमत्तेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.
“Emotional intelligence refers to the capacity for recognizing our own feelings and those of others for motivating ourselves and for managing emotions well in ourselves and in our relationships”.
यावरुन असे सांगता येईल की, ही एक अशी क्षमता आहे की, ज्यायोगे आपणास स्वत:च्या भावनांची तसेच इतरांच्या भावनांची ओळख पटते की, ज्यायोगे आपल्या भावनांचे व इतरांशी असलेल्या संबंधाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आपणास प्रेरणा मिळते.  या व्याख्याचे अभ्यास केला असता असे जाणवते की, व्यक्ति मध्ये ज्या विविध भावना असतात व प्रसंगोपन त्यांचे प्रकटीकरण होत असते त्यांचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.
भावनिक बुध्दिमत्तेत फक्त एकाच घटकाचा विचार केला जात नाही तर यात विविध घटकांचा समावेश होतो.  हे आपणास 1990 मध्ये भावनिक बुध्दिमत्तेची उपपत्ती मांडणा­या पीटर सॅलोव्ही व जॉन मेयेर यांच्या भावनिक बुध्दिमत्तेच्या पुढील विवेचनावरुन लक्षात येईल.
“Emotional intelligence is the ability of monitor and regulate one’s own and other’s feelings and to use feeling to guide thought and action”.
त्यांच्या उपपत्तीप्रमाणे भावनिक बुध्दिमत्तेमध्ये आत्मप्रचिती, आत्मनियमन, प्रेरण, तदानुभूती व सामाजिक कौशल्ये या क्षमतांचा समावेश होतो.  या क्षमतांचा परिचय करुन घेतल्यास भावनिक बुध्दिमत्ता अधिक स्पष्ट होईल. बऱ्याचदा आपण सहानुभूती आणि तदानुभूती यात तफावत करत नाही पण सहानुभूतीमध्ये व्यक्ती दु:खातून, व्यथेतून मुक्त व्हावी व तिला दिलासा मिळावा, हा निखळ हेतू असतोतदानुभूतीप्रमाणे यात दृष्टिकोन आणि भावविश्व समजून घेऊन, त्या व्यक्तीशी एकरूप होऊन भूमिका समजून घेणे असेलच असे नाही. तदानुभूती हा समुपदेशन प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग मानला जातो. यापैकी तदानुभूती विषयी जाणून घेऊ या.

तदानुभूती
इतरांच्या भूमिकेत शिरणे !!

तदानुभूती भावनिक बुद्धिमत्तेतील (EQ) घटकांपैकी एक आहे.
बुद्धिमत्ता (IQ) आपल्याला समस्यांचे निराकरण करण्यास, गणना करण्यास किंवा माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी तर भावनिक बुद्धिमत्ता (EQ) आपणास अधिक सृजनशील होण्यासाठी आणि आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या भावनांचा सुयोग्य वापर करण्यास मदत करते. 1995 मध्ये डॅनिअल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता नावाचे पुस्तक प्रकाशी केलेले आहे. या पुस्तकामध्ये ईक्यूची क्षमता म्हणून खालील बाबी परिभाषित केलेल्या आहेत.

1. आपल्या स्वतःच्या भावना ओळखणे, समजून घेणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे.
2. इतरांच्या भावना ओळखणे, समजून घेणे आणि त्यांचा इतरांवरील प्रभाव पहाणे.

भावनात्मक बुद्धीमत्तेचे 5 घटक:
1. स्व जाणिव - स्वतःचे सामर्थ्य/कमकुवतपणाचे मूल्यांकन करण्याची क्षमता.
2. स्व-नियमन - बदलास योग्य प्रकारे सामोरे जाण्याची क्षमता.
3. स्व प्रेरणा- स्वतःला प्रेरित करण्याची क्षमता आणि आशावादी राहणे.
4. तदानुभूती - इतरांच्या भावना आहे तशा समजून घेण्याची क्षमता.







5. सामाजिक कौशल्ये - नातेसंबंधाचे व्यवस्थापन करण्याची क्षमता.
खालील लिंकवरून आपण आपली तदानुभूती क्षमता तपासू शकता.



(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ:
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2008). मानसशास्त्र- दक्षिण आशिया आवृत्ती. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2014). सामान्य मानसशास्त्र. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
बडगुजर, बच्छाव व शिंदे (2009). सामान्य मानसशास्त्र. पुणे: डायमंड प्रकाशन
बर्वे बी. एन. (2006). व्यक्तिमत्व सिद्धांत. नागपूर: विद्या प्रकाशन 
नाईक, शिरगावे, घास्ते व बिराजे (2013). सामान्य मानसशास्त्र. पुणे: निराली प्रकाशन
पलसाने, एम. एन. (2006). मानसशास्त्र. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Ciccarelli, S.K. and White, J.N. (2012). Psychology- south Asia edition. New Delhi: Pearson Publication  
ShivajiUniversity online SIM: Personality Development Skills, retrieved from http://www.unishivaji.ac.in/uploads/syllabus/Home/Skill%20development%20courses%202018/Personality%20development.PDF

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

आपणही ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का? | Brain Rot

  आपण ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का ? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 चा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘ब्रेन रॉट’ ( Brain Rot...