बुधवार, १० एप्रिल, २०१९

मुलाखत कौशल्ये | Interview skills |


यशस्वी मुलाखतीसाठी कौशल्ये :
भारतात नोकरी निवड प्रक्रिया सामान्यतः पुढील टप्प्यामध्ये होत असते.
लेखी चाचणी
गट चर्चा
मुलाखत
या लेखात आपण यशस्वी मुलाखतीसाठी आवश्यक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत.
नोकरीसाठी मुलाखत ही एक अशी मुलाखत आहे ज्यामध्ये नोकरीसाठी  इच्छुक व्यक्ती आणि नियुक्ती प्रतिनिधी यांच्यातील संभाषण समाविष्ट असते. यामध्ये उमेदवाराची आकांक्षा पातळी ही संस्थेच्या आकांक्षा पातळीशी मिळतीजुळती आहे का? हे तपासण्यासाठी मुलाखत घेतली जाते. कर्मचारी निवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वात लोकप्रिय प्रक्रियापैकी मुलाखत ही एक आहे.
मुलाखतीचे प्रकारः
 • पारंपारिक नोकरीची मुलाखत (येथे कंपनीच्या प्रतिनिधीद्वारे मुलाखत घेतली जाते).
 • वर्तणूक मुलाखत (आपण पूर्वीच्या विविध नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती कशी हाताळली आहे).
 • केस मुलाखत (आपणास व्यवसायाचे दृष्य दिले जाते आणि आपल्याला त्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यास सांगितले जाते.)
 • समूह मुलाखती (उमेदवारांना नोकरीवर घेण्यासाठी जलद चाळणी प्रक्रिया करण्यासाठीची मुलाखत),
 • फोन आणि व्हिडिओ मुलाखती (फोन किंवा स्काईपद्वारे घेतलेल्या मुलाखती),
 • व्दितीय मुलाखती (एक अधिक तपशीलवार मुलाखत जी बऱ्याच काळापर्यंत सुरु राहू शकते) आणि जेवणाच्या वेळेतसुद्धा मुलाखती घेतल्या जातात. याद्वारे आपल्या सामाजिक कौशल्यांचे मूल्यांकन होते आणि आपण दबाव किती कुशलतेने हाताळू शकतो हे पाहण्यासाठी ही प्रक्रिया चालू असते.

मुलाखत प्रक्रियाः
मुलाखत प्रक्रिया ही एक विविध टप्प्यातून पुढे सरकणारी प्रक्रिया आहे. मुलाखत प्रक्रियेत सामान्यत: पुढील टप्पे समाविष्ट असतात:
नोकरीतील कामाचे तपशील लिहिणे, नोकरीची जाहिरात करणे, मुलाखतीचा कार्यक्रम तयार करणे, प्रारंभिक मुलाखती घेणे, वैयक्तिक मुलाखती घेणे, उमेदवारांचा पाठपुरावा करणे, आणि शेवटी नोकर भरती करणे.

रचना:
सर्वोत्तम उमेदवार निवड करण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण मुलाखत ही रणनीती किंवा रचना ओळखण्यासाठी मदत करतात. नोकरी-संबंधित सामग्री आणि मुलाखतीची दोन कार्ये निवडली गेली आहेत.
नोकरी संबंधी सामग्रीमध्ये सामान्य वैशिष्ट्ये आहेत (जसे की मानसिक क्षमता, व्यक्तिमत्व आणि स्वारस्य, ध्येय आणि मूल्ये), अनुभवात्मक घटक (जसे की शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभव) आणि नोकरीसाठी मुलभूत घटक (जसे की निर्देशनात्मक ज्ञान, प्रक्रियात्मक कौशल्ये आणि क्षमता) यांचा समावेश असतो.
मुलाखतीमधील कामगिरी प्रामुख्याने दोन प्रमुख विभागांशी संबंधित आहे उदा. सामाजिक प्रभावशीलता कौशल्य आणि आंतर वैयक्तिक सादरीकरण. सामाजिक परिणामकारकता कौशल्यांमध्ये प्रामुख्याने प्रभावी व्यवस्थापन समाविष्ट आहे (नोकरीसाठी आलेले उमेदवार मुलाखत घेणाऱ्यावर सकारात्मक प्रभाव तयार करण्याचा प्रयत्न करतात) आणि सामाजिक कौशल्ये (उमेदवाराच्या परिस्थितीनुसार त्यांच्या वर्तनास अनुकूल बदल करण्याची क्षमता मुलाखतकार तपासतो). मौखिक अभिव्यक्तीमध्ये आंतर वैयक्तिक व्यवस्थापन (संभाषणादरम्यान चढउतार, वेग आणि बोलण्यात विराम/खंड) आणि अशाब्दिक वर्तन (मुलाखती दरम्यान एकाग्रता, हसणे, हातवारे, शारीरिक हालचाली आणि शारीरिक ठेवण इ.) तपासले जाते.
उपरोक्त मुद्द्यांनुसार आपण यशस्वीरित्या मुलाखत देण्यास सक्षम व्हावे. आपल्या तांत्रिक क्षमता आणि अनुभव आपण मुलाखतकारास दाखवू शकतो. आपण एक चांगला संवाददाता, एक संघटक, कोणत्याही कामासाठी तत्पर आणि तार्किक विचार क्षमता आणि संस्थेच्या नावलौकिकास मूल्य जोडणारे कोणीतरी आहात हे दर्शवू शकतो.

मुलाखतीस यशस्वीरित्या तोंड कसे द्यावे:
काही सोप्या पायऱ्यामधून मुलाखतीमध्ये यश मिळवण्याच्या शक्यतांमध्ये आपण लक्षणीय वाढ करू शकतो.
चांगला गोषवारा (Resume) तयार करा: शैक्षणिक आणि व्यावसायिक यश, कौशल्ये, प्रमाणपत्रे आणि नोकरीसाठी उपयोगी ठरेल अशा इतर तपशीलांचा विचार करुन एक चांगला गोषवारा पुन्हा तयार करा. सहसा कंपनी आणि उमेदवार यांच्यातील हा पहिला संपर्क असतो.

मुलाखत सुरु करण्यापूर्वी:
1. संस्थेचा अभ्यास करा: कंपनीची तपशीलवार माहिती घ्या. त्यांचे प्रतिस्पर्धी तपासा. त्यांचे शेवटचे वार्षिक अहवाल वाचा. त्या कंपनीचा इतिहास आणि भविष्य जाणून घ्या. त्यांचे भूतकाळातील आणि  वर्तमानातील बाजारामधील स्थान समजून घ्या आणि भविष्यासाठीचे त्यांचे उद्दिष्टे जाणून घ्या.
2. मुलाखतीचा सराव करा: मुलाखतीमध्ये सामान्यतः विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची यादी करा. एका मित्रास मुलाखतकार म्हणून तयार करा आणि मुलाखत परिस्थितीचा सराव करा.

येथे काही मुलाखतीचे सामान्य प्रश्न आहेत:
अ) स्वत:विषयी माहिती द्या.
ब) आपले बलस्थाने आणि कमतरता कोणती आहेत?
क) आपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दल सांगा.
ड) कंपनीबद्दल आपणास काय माहिती आहे?
ई) आपण सदर कंपनीसाठी का काम करू इच्छिता?
च) आम्ही आपणास कामावर का ठेवावे?
) आपले सर्वात मोठे व्यावसायिक यश कोणते मानता?
ज) आपल्या नेतृत्वाची शैली कोणती?
) आपले मित्र आपले वर्णन कसे करतात?
) आपण स्वतःला 5 वर्षानंतर कोठे पाहता?
के) तुमच्या छंद सांगा?
ल) आपली वेतनाची अपेक्षा किती आहे? आपण त्यास न्याय देऊ शकता.
म) आपण बदली किंवा प्रवास करण्यास इच्छुक आहात का?

3. व्यावसायिक पोशाख: मुलाखतकारावर आपण पाडलेली प्रथम छाप अविश्वसनीयपणे महत्वाची असते. जेव्हा आपण एखाद्या संभाव्य मुलाखतकारास पहिल्यांदा भेटतो तेव्हा आपण जे कपडे घातलेले असतात आणि स्वत:ला कसे सादर करता त्यावर आधारित ते तात्काळ आपल्याबद्दल मत तयार करतात. आपण ज्यासाठी अर्ज करीत आहात त्या व्यवसायासाठी योग्य अशा पद्धतीने पोशाख करा.
4. मुलाखतीच्या ठिकाणी आपले आगमनः आपल्या नियोजित मुलाखतीच्या वेळेपूर्वी 15 ते 20 मिनिटे मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. खोल श्वास घ्या, "मी सक्षम आणि बुद्धिमान आहे" व "ही मुलाखत खरोखरच चांगली होणार आहे" यासारखे सकारात्मक विचारांची पुनरावृत्ती करा.

मुलाखती दरम्यान:
1. प्रथम छाप: प्रथम छाप पाडण्यास केवळ एक मिनिट घ्या. सुसंवाद साधा, प्रत्यक्ष आणि विश्वासदर्शक डोळ्यांचा संपर्क स्थापित करा, आत्मविश्वासपूर्ण हस्तांदोलन, प्रेमळ हास्य, स्वत:ला आत्मविश्वासपूर्ण सादर करणे ही चांगली प्रथम छाप पाडण्यास आवश्यक गोष्टी आहेत.
2. देहबोली: शरीराची ठेवण चांगली असू द्या आणि मुलाखतकाराच्या डोळ्यांशी विश्वासदर्शक संपर्क स्थापित करा. सरळ व ताठ बसा. कधीही खाली मन घालून बसू  नका.
3. स्पष्टपणे बोला: स्पष्टपणे आणि मोठ्याने बोला. गोंधळ करू नका त्यामुळे आत्मविश्वास कमी असल्याचे दर्शविते.
4. उत्तर देण्यापूर्वी ऐका: मुलाखतकाराच्या प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला प्रश्न समजला असल्याची खात्री करा. नसल्यास मुलाखतदारास नाम्रपणे तशी विनंती करा. उत्तर देण्यापूर्वी थोडा वेळ घेण्यास घाबरू नका.
5. ठराविक आणि संक्षिप्त उत्तरे द्या: आपले उत्तर संक्षिप्त आणि मुद्देसूद असू द्या. रॅम्पलिंगने असे सुचविले आहे की आपणास प्रश्नाचे खरे उत्तर माहित नसते त्यामुळे आपले मत व्यक्त करा. जसे मला असे वाटते की.......इ.
6. नेहमी सत्य बोला: मुलाखती दरम्यान प्रामाणिक रहा. आपण जे केले नाही त्याबद्दल विचारल्यावर खोटे बोलू नका.
7. मुलाखतकाराचे आभार माना: मुलाखत संपल्यावर मुलाखत घेण्याकरिता मुलाखतकाराचे शाब्दिक आभार माना.

चांगल्या मुलाखतीसाठी टिप्सः
 • सकारात्मक व उत्साहपूर्ण सादरीकरणावर लक्ष केंद्रित करा.
 • आपणास कमजोरपणाचे वर्णन करण्यास सांगितल्यास, कमकुवतपणामुळे घेतलेले धडे सांगा आणि नकारात्मक वर्णनांपासून दूर रहा.
 • आपल्या वैयक्तिक गुणधर्मांबद्दल, आपण शिकलेल्या कौशल्यांबद्दल, आणि संबंधित अनुभवांबद्दल तीन किंवा चार महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी विचार करा ज्यामुळे आपण चांगले कार्य करू शकत असल्याचे दर्शविते.
 • आपल्याबद्दल महत्वाचे मुद्दे स्पष्ट करू शकतील असे विशिष्ट स्वानुभवातील उदाहरणे स्पष्ट करा.
 • प्रश्नांची उत्तरे देताना, लवचिकता, अनुकूलता, जबाबदारी, प्रगती, यश, सर्जनशीलता, पुढाकार आणि नेतृत्व दर्शविणाऱ्या अनुभवांवर लक्ष केंद्रित करा.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ:
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2008). मानसशास्त्र- दक्षिण आशिया आवृत्ती. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2014). सामान्य मानसशास्त्र. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
बडगुजर, बच्छाव व शिंदे (2009). सामान्य मानसशास्त्र. पुणे: डायमंड प्रकाशन
बर्वे बी. एन. (2006). व्यक्तिमत्व सिद्धांत. नागपूर: विद्या प्रकाशन 
नाईक, शिरगावे, घास्ते व बिराजे (2013). सामान्य मानसशास्त्र. पुणे: निराली प्रकाशन
पलसाने, एम. एन. (2006). मानसशास्त्र. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Ciccarelli, S.K. and White, J.N. (2012). Psychology- south Asia edition. New Delhi: Pearson Publication  
ShivajiUniversity online SIM: Personality Development Skills, retrieved from http://www.unishivaji.ac.in/uploads/syllabus/Home/Skill%20development%20courses%202018/Personality%20development.PDF

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

योगा थेरपी आणि मनोसामाजिक आरोग्य| Yoga Therapy and Psychosocial health

  योगा थेरपी आणि मनोसामाजिक आरोग्य आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांना योगाचे फायदे जाणू...