वुल्फगँग
कोहलर (Wolfgang Köhler): अंतर्दृष्टीची
शक्ती

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
मानसशास्त्राच्या
इतिहासात काही संशोधकांनी मानवी विचारशक्ती आणि शिकण्याच्या प्रक्रियेकडे
पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. अशाच महान शास्त्रज्ञांमध्ये वुल्फगँग कोहलर
यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी मांडलेला अंतर्दृष्टीद्वारे अध्ययन (Insight
Learning) हा सिद्धांत आजही शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र,
व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समस्या
सोडविण्याच्या अभ्यासात तितकाच महत्त्वाचा मानला जातो.
कोहलर
यांनी जगाला शिकवले की, प्रत्येक समस्या केवळ
प्रयत्न-प्रमाद (Trial and Error) करूनच सुटत नाही; अनेक वेळा शांत विचार, निरीक्षण आणि परिस्थितीचे
समग्र आकलन यामुळे अचानक उत्तर सापडते, हीच अंतर्दृष्टी होय.