शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

शाश्वत विकास आणि भारत | Sustainable Development and India

 शाश्वत विकास आणि भारत

शाश्वत विकास अहवाल 2023 हा डब्लीन युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे जून, 2023 मध्ये प्रकाशित झाला. ही शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने सर्व सदस्य राष्ट्रांच्या प्रगतीच्या वार्षिक मूल्यांकनाची आठवी आवृत्ती आहे. या अहवालामध्ये 166 देशांचा समावेश होता त्यात भारत 112 नंबरवर आहे. आपल्या शेजारील भूतान (61), श्रीलंका (83), नेपाल (99) व बांग्लादेश (101) या देशांच्या तुलनेत खुपच मागास आहे.

संयुक्त राष्ट्र, शांतता आणि मानवतेसाठी कार्यरत जागतिक व्यासपीठाने, 2030 च्या अजेंड्याला मान्यता दिली ज्यात शाश्वत विकास ध्येये मांडलेले आहेत. सप्टेंबर 2015 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या सर्व 193 सदस्य देशांच्या जागतिक नेत्यांनी 17 शाश्वत विकास उद्दिष्टे जागतिक लक्ष्य म्हणून मान्य केली. 2030 अजेंड्यातील ध्येये ही मानवनिर्मित सर्व संकटातून मानवी हस्तक्षेप कमी करण्याची क्षमता आहे. ही उद्दिष्टे जागतिक आव्हानांवर केंद्रित आहेत ज्यामध्ये गरिबी, उपासमार, असमानता, हवामान बदल, पर्यावरणाचा ऱ्हास, शांतता आणि न्याय यासाठी असून आपल्या चांगल्या भविष्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विकास आणि पर्यावरणाच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करून तयार करण्यात आलेली आहेत. ही उद्दिष्टे व्यापक आणि परस्परावलंबी असल्याने, प्रत्येक लक्ष्याच्या दिशेने प्रगतीचे मापन करण्यासाठी अधिक कार्यक्षम बनवली आहेत.

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

कायझेन: एक छोटेसे पाऊल आयुष्य बदलू शकते

 

कायझेन: एक छोटेसे पाऊल आयुष्य बदलू शकते

आज चारचाकी वाहनांच्या बाजारात टोयोटा या कंपनीला तोड नाही. ही जपानी कंपनी वर्षांनुवर्षे आपल्या उत्पादनांमुळे व विक्रीनंतरची सेवा यासाठी वाखाणली जाते. आपल्या उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी यांनी कायझेन नावाचे तंत्र यशस्वीपणे राबविले आहे. कायझेन हा मुळत: जपानी शब्द आहे. म्हणजेच, जपानी व्यवसाय तत्त्वज्ञानातून कैझेन तत्त्वाचा उदय झाला. कायझेन शब्दाला विभाजित केल्यास दोन शब्द मिळतात. KAI शब्दाचा अर्थ ‘विकास’ आणि ZEN शब्दाचा अर्थ ‘चांगल्यासाठी’ असा होतो. Kaizen या शब्दाचा अर्थ सामान्यतः सतत सुधारणा असा होतो. तसेच KAI आणि ZEN हे दोन शब्द छोटे छोटे चांगले बदल या भावनेशी निगडित आहेत. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींद्वारे मोठमोठी ध्येये गाठता येतात, हा कायझेन विचारसरणीचा मूलभूत पाया आहे. Kaizen ही जपानी संज्ञा दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथम जपानमधील व्यवसाय सुधारण्यासाठी लागू करण्यात आली होती, तेव्हापासून कायझेन हे तंत्र जगातील सर्व व्यवसायांमध्ये सतत सुधारणा करण्यासाठी समाविष्ट आहे.

इकिगाई: दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाची जपानी कला

 

इकिगाई: दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाची जपानी कला

इकिगाई म्हणजे जपानी भाषेत ‘जगण्याचा अर्थ’ जी रोजच्या व्यवहारात अंमलात आणली जाते. इकिगाई हे जीवनातील एक ध्येय आहे, ज्याचा अर्थ खरा आनंद मिळविण्याचा मार्ग देखील आहे, जो प्रत्येकासाठी वेगळा आहे, असे मानले जाते. तथापि, पाश्चात्य जगात, इकिगाईचा अर्थ अधिक व्यावहारिक अंगाने घेतला जातो. असा व्यावसायिक मार्ग शोधणे जो एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी सर्वोत्तम आहे. मूळ संकल्पनेनुसार, इकिगाईचे चार भाग आहेत: तुम्हाला काय करायला आवडते; आपल्याला एखादी गोष्ट चांगली कशी करता येते हे माहित आहे; लोक कशासाठी पैसे द्यायला तयार आहात? आणि आपल्या सभोवतालच्या जगाला काय हवे आहे.

इकिगाई संकल्पनेचा उदय

इकिगाई ही संकल्पना जपानमधून आली आहे. इतिहासकारांच्या मते, "इकिगाई" हा शब्द प्रथम हेयान काळात (794-1185) आढळून आला. याबरोबर, इतिहासकारांना अनेक समान शब्द सापडले: हटरकिगाई, म्हणजे, "कामाचे मूल्य" आणि यारीगाई, म्हणजेच "जे करणे योग्य आहे". इकिगाईचा सर्वात आधुनिक संदर्भ 1996 मध्ये इंटरनेटवर दिसला, जेव्हा गॉर्डन मॅथ्यूजने इकिगाई बद्दल "What Makes Life Worth Living" नावाचे पुस्तक लिहिले. तथापि, इकिगाईची संकल्पना अलिकडे 2009 मध्ये लोकप्रिय झाली, जेव्हा डॅन ब्युटनर यांनी TED Talks परिषदेत इकिगाईबद्दल एक कथा सांगितली, त्यानंतर हे तत्वज्ञान पाश्चात्य देशांमध्ये आणि उर्वरित जगामध्ये पसरले.  

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

मॅस्लोची गरजांची अधिश्रेणी | Maslow’s Needs of Hierarchy

 

मॅस्लोची गरजांची अधिश्रेणी (Maslow’s Needs of Hierarchy)

एखाद्या परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण त्याचे प्रेरणास्थान नक्की विचारतो कारण कोणत्याही यशामागे प्रेरणा अतिशय महत्त्वाचे काम करत असते. जन्मतः प्रत्येक मुलांसाठी आई ही पहिली प्रेरणादायी व्यक्ती असते. किंबहुना प्रत्येक व्यक्तीला आई हीच प्रथम प्रेरणास्थान असते. कुटुंबातील इतर व्यक्तीदेखील व्यक्तीच्या वाढ आणि विकासासाठी हातभार लावतात. त्यामुळे अनुकरण हा सहज स्वभाव बालपणात प्रेरणादायी ठरतो. अनुकरणाबरोबरच अनुकूलन देखील प्रत्येक सजीवाची गरज आहे. परिस्थितीशी मिळतेजुळते घेणे हा देखील स्वप्रेरणेचा भाग आहे. मूल शाळेत जाऊ लागले की हळूहळू मित्रमैत्रिणी, शिक्षक, आजूबाजूचा परिसर, समाज कळत नकळतपणे प्रेरणा देत असतात.

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

गुगल प्रभाव | Google Effect

 

गुगल प्रभाव | Google Effect

समजा तुम्ही एखादे पुस्तक वाचत आहात आणि एक अपरिचित शब्द तुमच्या समोर आला आहे. या शब्दाची व्याख्या पाहण्यासाठी तुम्ही Google वर शोध घेतला. काही दिवसांनंतर, तुम्हाला हा शब्द पुन्हा दिसतो… पण तुम्हाला त्याचा अर्थ आठवत नाही. ही परिस्थिती Google इफेक्टचे वर्णन करते, जिथे माहिती ऑनलाइन सहज उपलब्ध असल्यामुळे, आपण ती मेमरीमध्ये साठवून ठेवत नाही. Google हा आपल्या दैनंदिन जीवनाचा इतका अविभाज्य भाग बनला आहे की तो 2006 मध्ये ऑक्सफर्ड इंग्रजी डिक्शनरीमध्ये क्रियापद म्हणून जोडला गेला आहे. “Google it” करणे इतके सोपे आहे, की ती माहिती मेमरीमध्ये साठवण्याऐवजी ती माहिती वारंवार ऑनलाइन पाहत राहतो.

शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

सायबर सुरक्षा | Cyber Security

    सायबर सुरक्षा | Cyber Security 

    Information Security Education and Awareness (ISEA) ह्या जाणीव-जागृतिविषयक कार्यक्रमाद्वारे, पौगंडावस्थेतील मुलामुलींना / विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल नेहमीच माहिती व सूचना दिल्या जातात. इंटरनेट वापरण्यापूर्वी त्या पायर्‍यांचा / सूचनांचा अवलंब करावे.

1. वेब ब्राउझर वापरणे

मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी इंटरनेट खूपच उपयोगी आहे. अनेक विद्यार्थी बातम्या तसेच संशोधनाची माहिती मिळवण्यासाठी, पुस्तके डाऊनलोड करण्यासाठी, खरेदीसाठी, अर्ज भरण्यासाठी नेटचा वापर करतात. बॅँकिंग, बिले भरणे, विविध अर्ज भरून सादर करणे ह्यांसाठीही इंटरनेट लोकप्रिय आहे. ही ऑनलाइन कामे करण्यासाठी वेब ब्राउझर वापरावा लागतो. हे अगदी सोपे आहे परंतु ब्राउझरमध्ये तुम्हाला आणि तुमच्या कॉँप्यूटरला धोकादायक असलेल्या काही गोष्टी लपलेल्या असू शकतात, उदा. वैयक्तिक संवेदनशील माहिती उघड होणे, व्हायरस व हेरगिरी तसेच व्यापारी स्वरूपाची सॉफ्टवेअर (ह्यांना मालवेअर, स्पायवेअर, ऍडवेअर इ. नावे आहेत) कॉँप्यूटरमध्ये घुसणे इ. ह्या ऑनलाइन धोक्यांची जाणीव ठेवून ते टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलणे म्हणजेच सुरक्षित ब्राउझिंग.

माहिती सुरक्षा | Information Security

 माहिती सुरक्षा | Information Security 

    इरंबू थिराई (2018) नावाचा तमिळ चित्रपट नंतर तो दि रिटर्न ऑफ अभिमन्यू नावाने हिंदीमध्ये डब झालेला चित्रपट आपणास सायबर गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा याविषयी अवगत करतो. या चित्रपटात व्हाईट डेव्हिल उर्फ सत्यमूर्ती हा एक मास्टर हॅकर आहे. प्रत्येक व्यक्तीची माहिती त्याच्या हातात असणे हे त्याचे अंतिम ध्येय साध्य करण्याच्या मार्गात असलेली अडचण म्हणजे कर्ण, भारतीय सैन्यातील मेजर, जो त्याच्या वडिलांच्या अनावश्यक कर्ज घेण्याच्या सवयीमुळे कुटुंबापासून दूर गेला होता. त्याला आपल्या बहिणीचे तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी  पैशांची आवश्यकता असल्याने खोट्या कागदपत्रांसह बँकेकडून कर्ज घेतो. तथापि, त्याच्या खात्यातून संपूर्ण रक्कम गायब होते आणि दृढनिश्चयी कर्ण यासाठी जबाबदार असलेल्या घोटाळेबाजांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. सदर चित्रपटात अनेक प्रसंगातून आपण किती बेफिकारीने पैशांचा व्यवहार करतो, माहिती कशी असुरक्षितपणे हाताळतो आणि त्यामुळे आपणास अनेक आर्थिक समस्यांना कसे सामोरे जावे लागते याविषयी जनजागृती केलेली आहे.

मानवी मनाची अद्भुत रहस्ये : The Amazing Mysteries of the Human Mind

  मानवी मनाची अद्भुत रहस्ये ( The Amazing Mysteries of the Human Mind) संपूर्ण विश्वात जर एखादी गोष्ट सर्वात रहस्यमय , अचंबित करणारी आणि अ...