भविष्यातील
शिक्षणाची दिशा: ब्लेंडेड अध्ययनाचे महत्त्व
डॉ. हावर्ड गार्डनर (मल्टीपल इंटेलिजंस) हे असे म्हणतात की "ब्लेंडेड अध्ययन हे विद्यार्थ्यांच्या विविध बुद्धिमत्तांच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. तांत्रिक व पारंपरिक शिक्षण पद्धती एकत्र आणल्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो."
शिक्षण
प्रणालीतील बदल हे सामाजिक, आर्थिक, आणि तंत्रज्ञानातील प्रगतीसोबत घट्टपणे जोडलेले आहेत. 21व्या शतकात शिक्षण
क्षेत्रात एक अभूतपूर्व बदल पाहायला मिळाला आहे, ज्यामुळे
शिकण्याच्या पद्धती अधिक सुलभ, किफायतशीर, आणि प्रभावी बनलेल्या आहेत. यामध्ये "ब्लेंडेड अध्ययन" (Blended
Learning) ही एक महत्त्वाची अध्ययन पद्धत समोर आली आहे. ब्लेंडेड
अध्ययन ही संकल्पना पारंपरिक वर्ग शिक्षण पद्धती आणि डिजिटल शिक्षण पद्धतींचा एक
प्रभावी संगम आहे. या पद्धतीमध्ये शिक्षकांचा सहभाग, ऑनलाइन
सामग्री, आणि विद्यार्थी यांच्यातील परस्परसंबंध अधिक दृढ
होतो.
ब्लेंडेड
अध्ययन ही पद्धत विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी देते.
यामध्ये पारंपरिक शिक्षण आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून वैयक्तिक शिकण्याचा अनुभव
अधिक समृद्ध केला जातो. 21व्या शतकातील विद्यार्थ्यांसाठी, ब्लेंडेड अध्ययन हे त्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी
उपाय ठरले आहे. शिक्षणातील हा नव्या तंत्राचा समावेश भविष्यातील शिक्षणासाठी एक
नवा दृष्टीकोन प्रस्थापित करत आहे.
ब्लेंडेड
अध्ययनाचा विकास
ब्लेंडेड
अध्ययनाची सुरुवात 20व्या शतकाच्या शेवटी झाली. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे
पारंपरिक शिक्षण पद्धतीत हळूहळू बदल घडत गेले, आणि यामुळे शिक्षण अधिक सुलभ आणि प्रभावी बनले. ब्लेंडेड अध्ययनाचा विकास
पुढील टप्प्यांमध्ये होतो:
प्रारंभिक काळ:
1960-1980:
ब्लेंडेड
अध्ययनाची बीजे 1960च्या दशकात रोवली गेली. यावेळी तंत्रज्ञानाची सुरुवात
संगणक-आधारित शिक्षण (Computer-Based Training) स्वरूपात झाली. विद्यापीठे आणि कंपन्यांनी संगणकाचा वापर प्रशिक्षणासाठी
सुरू केला. शिक्षण क्षेत्रात मल्टीमीडिया साधनांचा वापर वाढला. याची सुरुवात
अमेरिकेत झाली भारतात ते 10 वर्षानंतर हळूहळू दिसू लागले.
इंटरनेटचा उदय:
1990चे दशक:
1990च्या
दशकात इंटरनेटचा प्रसार वाढला. ई-लर्निंग प्लॅटफॉर्म्स आणि ऑनलाइन कोर्सेस यामुळे
शिक्षण अधिक सुलभ झाले. शिक्षण संस्थांनी पारंपरिक वर्ग शिक्षणासोबत डिजिटल
सामग्रीचा समावेश करण्यास सुरुवात केली. यामुळे ब्लेंडेड अध्ययनाची मूळ संकल्पना
विकसित होऊ लागली.
LMS आणि वेब तंत्रज्ञानाचा प्रसार (21 व्या शतकाची सुरुवात):
21
व्या शतकाची सुरुवातील लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम्स (LMS)
जसे की Moodle, Smartboard यांचा प्रसार झाला.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन संसाधनांचा सहज प्रवेश मिळू लागला. याच काळात ब्लेंडेड
अध्ययनाचा वापर शिक्षण क्षेत्रात अधिक प्रमाणात होऊ लागला.
स्मार्टफोन आणि
अॅप्सचा उदय (2010 नंतर):
स्मार्टफोन
आणि शिक्षण क्षेत्रातील अॅप्सच्या उदयानंतर ब्लेंडेड अध्ययन अधिक प्रगत बनले.
विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी शिकण्याची सुविधा मिळाली.
यामुळे शिक्षणात वैयक्तिकरण आणि लवचिकता आली.
कोविड-19 आणि
ब्लेंडेड अध्ययन (2020 नंतर):
कोविड-19
महामारीच्या काळात ब्लेंडेड अध्ययन हे शिक्षणाचा मुख्य भाग बनले. शाळा, महाविद्यालये, आणि कंपन्यांनी दूरस्थ शिक्षणासाठी
ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. यामुळे ब्लेंडेड अध्ययनाची
व्याप्ती आणि स्वीकाहार्यता मोठ्या प्रमाणावर वाढली.
ब्लेंडेड
अध्ययनाच्या पद्धती आणि प्रकार
ब्लेंडेड
अध्ययन हे विविध पद्धतींवर आधारित आहे, ज्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना लवचिक आणि सर्जनशील शिक्षण देणे शक्य
होते. यातील प्रमुख पद्धती आणि प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
1. फेस-टू-फेस
ड्राइव्हन ब्लेंडेड लर्निंग
या
प्रकारात मुख्य भर पारंपरिक वर्ग शिक्षणावर असतो, ज्यामध्ये डिजिटल सामग्री आणि तंत्रज्ञानाचा पूरक वापर केला जातो.
विद्यार्थ्यांना वर्गातील चर्चांद्वारे शिकवले जाते, आणि
अतिरिक्त डिजिटल सामग्रीचा उपयोग त्यांच्या ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी केला
जातो.
2. ऑनलाइन
ड्राइव्हन ब्लेंडेड लर्निंग
या
प्रकारात मुख्यतः ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना ऑनलाइन
प्लॅटफॉर्म्सद्वारे शिक्षण दिले जाते, आणि अधूनमधून वर्गात भेटी आयोजित केल्या जातात. हा प्रकार प्रामुख्याने
उच्च शिक्षण आणि व्यावसायिक कोर्सेससाठी वापरला जातो.
3. फ्लिप्ड क्लासरूम
या पद्धतीत विद्यार्थ्यांना शिक्षणाची
पूर्वतयारी म्हणून ऑनलाइन सामग्री दिली जाते. वर्गामध्ये शिक्षकांसोबत चर्चासत्रे, प्रॅक्टिकल्स, आणि प्रकल्प कार्य केले जाते. यामुळे
वर्ग व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन अधिक प्रभावीपणे वापरण्याचा प्रयत्न केला जातो.
4. रोटेशन मॉडेल
या
प्रकारात विद्यार्थी विशिष्ट वेळेनुसार गरजेनुसार विविध शिक्षण पद्धतींमध्ये फिरत
असतात, जसे की ऑनलाइन शिक्षण, लघु गट
चर्चा, आणि वैयक्तिक शिक्षक मार्गदर्शन. यामुळे
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वैविध्यपूर्ण अनुभव मिळतो.
5. फ्लेक्स
मॉडेल
फ्लेक्स
मॉडेलमध्ये विद्यार्थ्यांना मुख्यतः ऑनलाइन शिक्षण सामग्री उपलब्ध असते, पण त्यांना वर्गात येऊन शिक्षकांकडून वैयक्तिक मार्गदर्शन घेण्याची संधी
असते. हा प्रकार वैयक्तिक शिक्षणासाठी अधिक उपयुक्त आहे.
6.
प्रोजेक्ट-आधारित ब्लेंडेड लर्निंग
या
पद्धतीत विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमातील एखाद्या घटकाच्या प्रकल्पांवर काम
करतात, ज्यामुळे त्यांचे व्यावहारिक ज्ञान आणि सर्जनशीलता
विकसित होते. ऑनलाइन संसाधने आणि प्रत्यक्ष वर्ग शिक्षणाचा या प्रकारात समावेश
होतो.
7.
सेल्फ-डायरेक्टेड ब्लेंडेड लर्निंग
या
प्रकारात विद्यार्थी स्वतःच्या गतीने आणि स्वयंस्फूर्तीने शिकण्याची प्रक्रिया पार
पाडतात. शिक्षक आणि ऑनलाइन सामग्री केवळ सहाय्यक भूमिकेत असते. हा प्रकार
व्यावसायिक प्रशिक्षणासाठी उपयुक्त आहे.
ब्लेंडेड
अध्ययनात शिक्षक आणि विद्यार्थ्यांची भूमिका
ब्लेंडेड
अध्ययनाची प्रभावीता ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सक्रिय भूमिकांवर अवलंबून
असते. या पद्धतीमध्ये दोघांनाही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात:
शिक्षकांची भूमिका
- मार्गदर्शक म्हणून कार्य: शिक्षक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांना विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणे आवश्यक असते. ब्लेंडेड अध्ययनाच्या कोणत्याही प्रकारात शिक्षक हा प्रमुख मार्गदर्शक असतो.
- साहित्य तयार करणे: शिक्षकांना पारंपरिक शिक्षण साहित्याबरोबरच ऑनलाइन शिक्षणासाठी उपयुक्त सामग्री तयार करावी लागते. यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स, प्रेझेंटेशन, आणि इतर डिजिटल संसाधनांचा समावेश होतो.
- विद्यार्थ्यांचे मूल्यमापन: शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे आणि त्यांना वेळोवेळी प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुधारणा करावयाच्या क्षेत्रांचा अंदाज येतो.
- तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे: ब्लेंडेड अध्ययनामध्ये शिक्षकांना विविध डिजिटल टूल्स आणि प्लॅटफॉर्म्सचा प्रभावी वापर करण्यासाठी तांत्रिक कौशल्ये आत्मसात करावी लागतात.
- संवाद आणि सहकार्य: शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे शैक्षणिक व वैयक्तिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल तसेच त्यांना प्रोत्साहन देणे देखील महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांची भूमिका
- स्वयं-अध्ययन: विद्यार्थ्यांना स्वयंस्फूर्तीने अध्ययन करण्याची सवय लावणे आवश्यक आहे. ऑनलाइन संसाधनांचा उपयोग करून स्वतःच्या गतीने शिकण्याची प्रक्रिया हाती घ्यावी लागेल.
- सक्रिय सहभाग: विद्यार्थ्यांनी वर्गातील चर्चांमध्ये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर सक्रिय सहभाग (शरीराने नव्हे तर मनानेही तिथे हजार असावे) नोंदवावा. प्रकल्प कार्य आणि गट चर्चांमध्ये योगदान देणे महत्त्वाचे आहे.
- तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे: विद्यार्थ्यांनी डिजिटल टूल्सचा उपयोग करून स्वतःच्या शिक्षणाला पूरक ठरणाऱ्या कौशल्यांचा विकास करावा.
- वेळ व्यवस्थापन: विद्यार्थ्यांना वेळेचे प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींचा लाभ घेऊ शकतील.
- प्रतिक्रिया स्वीकारणे: विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांचा स्वीकार करून त्यांच्या शिक्षणातील कमतरतांवर काम करावे.
ब्लेंडेड अध्ययनासाठी आवश्यक संसाधने
आणि कौशल्ये
21व्या शतकातील ब्लेंडेड अध्ययन
यशस्वी करण्यासाठी विविध संसाधनांचा वापर आवश्यक आहे.
1. तांत्रिक साधने: ब्लेंडेड शिक्षणासाठी
विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना संगणक व लॅपटॉप हे मूलभूत साधन आहे. त्यासाठी उच्च-गती
इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही आधुनिक शिक्षणासाठी एक अपरिहार्य गोष्ट आहे. काळाबरोबर टॅबलेट्स, स्मार्टफोन्स यांसारख्या स्मार्ट
डिव्हाइसेसच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षण सामग्री सहज उपलब्ध होते.
2. शिक्षण सॉफ्टवेअर आणि अॅप्स: लर्निंग मॅनेजमेंट सिस्टम्स (LMS) जसे Moodle, Blackboard, आणि Google Classroom यांसारखी सॉफ्टवेअर्स विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना परस्परसंवाद साधण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच Zoom, Microsoft Teams, आणि Google Meet यांसारखी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टूल्स दूरस्थ शिक्षणासाठी महत्त्वाची आहेत. Unacademy, Khan Academy, Udemy आणि Coursera यांसारख्या प्लॅटफॉर्म्स विद्यार्थ्यांना विविध कोर्सेस उपलब्ध करून देतात.
3. डिजिटल सामग्री: ई-पुस्तके आणि ई-पुस्तकालये
याद्वारे विद्यार्थ्यांना विविध विषयांवरील ई-पुस्तके वाचण्यासाठी ऍक्सेस मिळतो. अध्ययन प्रक्रियेत व्हिडिओ, पॉडकास्ट, आणि अॅनिमेशनचा
समावेश केल्याने विद्यार्थ्यांना संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजायला मदत होते.
विज्ञान, गणित, आणि तंत्रज्ञान
शिकण्यासाठी सिम्युलेशन आणि शैक्षणिक गेम्स प्रभावी ठरतात.
4. पारंपरिक पद्धतींचा समावेश: ब्लेंडेड
अध्ययनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे नियमित वर्गातील चर्चासत्रे आणि ग्रुप
डिस्कशन. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सल्ला विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत
महत्त्वाचे आहे त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष आणि सक्रीय सहभाग महत्त्वाची भूमिका
बजावतो.
5. वैयक्तिक संसाधने: विद्यार्थ्यांना स्वतःहून
अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते त्यामुळे स्वयं-अध्ययन कौशल्ये विकसित
होतात.: ब्लेंडेड अध्ययन यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेचे व्यवस्थापन करण्यास
शिकविले जाते.
6. मूल्यांकन पद्धती: डिजिटल प्लॅटफॉर्मवरून
नियमित चाचण्यांद्वारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाते. वैयक्तिक प्रकल्प आणि
असाइनमेंटद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा विकास होतो.
ब्लेंडेड अध्ययनाचे महत्त्व:
- लवचिकता (Flexibility): विद्यार्थी त्यांना सोयीस्कर वेळेत व ठिकाणी शिक्षण घेऊ शकतात. ऑनलाईन स्रोतांमुळे शिक्षण कधीही आणि कुठेही उपलब्ध होते.
- वैयक्तिकृत शिक्षण (Personalized Learning): विद्यार्थ्यांच्या गतीनुसार व आवडीनुसार अभ्यासक्रम तयार केला जातो. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्यासाठी योग्य पद्धतीने शिकता येते.
- तंत्रज्ञानाचा वापर (Use of Technology): डिजिटल साधनांचा वापर शिक्षणाला अधिक रंजक व आकर्षक बनवतो. व्हिडिओ, क्विझ, आणि व्हर्च्युअल सत्रांमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकता येते.
- सहभागी शिक्षण (Collaborative Learning): विद्यार्थी वर्गमित्रांबरोबर ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे चर्चा व सहकार्य करू शकतात. त्यामुळे टीमवर्क व संवाद कौशल्य विकसित होतात.
- शिकवण्याच्या पद्धतीत नावीन्यता (Innovation in Teaching): शिक्षक विविध तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनाचे नवे मार्ग शोधू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीने शिकण्याचा अनुभव मिळतो.
- मूल्यमापन प्रक्रिया (Assessment Process): ऑनलाईन टेस्ट, असाइनमेंट्स, आणि प्रोजेक्ट्स यांचा वापर करून विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करता येते.
- शिक्षण खर्च कमी होणे (Cost Efficiency): ब्लेंडेड शिक्षण पद्धतीमुळे शिक्षणाच्या खर्चात बचत होऊ शकते. वर्गातील सुविधा व प्रवासाचा खर्च कमी होतो.
समारोप
ब्लेंडेड अध्ययन ही
शिक्षणक्षेत्रातील एक क्रांतिकारी पद्धत असून 21व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या
गरजांना अनुसरून आहे. या पद्धतीमुळे शिक्षण अधिक व्यापक, सुलभ, आणि प्रभावी
बनले आहे. तांत्रिक साधने, डिजिटल सामग्री, आणि पारंपरिक
पद्धतींचा समन्वय करून विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण प्रदान करणे शक्य झाले
आहे. भविष्यात, ब्लेंडेड अध्ययनाच्या मदतीने शिक्षण अधिक
सृजनशील, व्यक्तिनिष्ठ, आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा
आहे.
संदर्भ:
Bonk,
C. J., & Graham, C. R. (Eds.). (2006). The handbook of
blended learning: Global perspectives, local designs. San Francisco, CA:
Pfeiffer Publishing.
Dziuban,
C., Hartman, J., & Moskal, P. (2004). Blended
learning. EDUCAUSE Center for Applied Research Bulletin, 7,
1-12.
Garrison,
D. R., & Kanuka, H. (2004). Blended learning:
Uncovering its transformative potential in higher education. The Internet and
Higher Education, 7(2), 95-105.
Graham,
C. R. (2006). Blended learning systems: Definition,
current trends, and future directions. In C. J. Bonk & C. R. Graham (Eds.),
The handbook of blended learning: Global perspectives, local designs (pp. 3-21). San Francisco, CA: Pfeiffer Publishing.
Graham,
C. R., Woodfield, W., & Harrison, J. B. (2013). A
framework for institutional adoption and implementation of blended learning in
higher education. The Internet and Higher Education, 18, 4-14.
Hrastinski,
S. (2019). What do we mean by blended learning?
TechTrends, 63(5), 564-569.
Picciano,
A. G. (2009). Blending with purpose: The multimodal model.
Journal of Asynchronous Learning Networks, 13(1), 7-18.
Stein,
J., & Graham, C. R. (2014). Essentials for blended
learning: A standards-based guide. New York, NY: Routledge.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions