गर्दीतील मृत्यूचे पथक: अविवेकाकडे वाटचाल
तिरुपती
मंदिरातील वैकुंठद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ 9 जानेवारी 2025 रोजी झालेल्या
चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाल्यानं गर्दी व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित केले
गेले आहेत. इंटरनॅशनल जर्नल ऑफ डिझास्टर रिस्क रिडक्शन यांनी (IJDRR) प्रकाशित केलेल्या 2013 च्या अभ्यासात
असं दिसून आलं की, भारतातील 79 टक्के चेंगराचेंगरीचे ठिकाणे हे धार्मिक मेळावे आणि
तीर्थयात्रेची ठिकाणे आहेत. तर विकसित देशांमध्ये बहुतेक चेंगराचेंगरी स्टेडियम, संगीत मैफिली आणि नाईट क्लबच्या ठिकाणी
होतात. परंतु भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये गर्दीच्या आणि चेंगराचेंगरीच्या
बहुतेक दुर्घटना धार्मिक स्थळांवर होतात. यासाठी महाराष्ट्रातील काही ठळक घटना
पाहूया.