शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

अल्फ्रेड अ‍ॅडलर (Alfred Adler): न्यूनगंडातून उभा राहिलेला आशावादी मानसशास्त्रज्ञ

 

अल्फ्रेड अ‍ॅडलर (Alfred Adler): न्यूनगंडातून उभा राहिलेला आशावादी मानसशास्त्रज्ञ

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

मानसशास्त्राच्या इतिहासात सिग्मंड फ्रॉईड आणि कार्ल युंग यांच्यासोबत ज्यांचा उल्लेख “त्रयी” (Freud–Jung–Adler) म्हणून केला जातो, त्यांपैकी अल्फ्रेड अ‍ॅडलर हे एक महत्त्वाचे नाव आहे. अ‍ॅडलर यांनी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याची दिशा बदलून टाकली. त्यांच्या मते माणूस केवळ भूतकाळातील दडपलेल्या प्रेरणांनी चालत नाही, तर तो भविष्यातील ध्येयांनी प्रेरित असतो (teleological orientation). त्यांनी ‘न्यूनगंड’ (Inferiority) ही संकल्पना केवळ मानसिक कमकुवतपणा म्हणून न पाहता ती प्रगती, परिश्रम आणि आत्मोन्नतीची उगमस्थाने आहेत, असे प्रतिपादन केले (Adler, 1927/1954). त्यामुळेच त्यांना “आशावादी मानसशास्त्रज्ञ” असे संबोधले जाते.

अल्बर्ट बंडूरा (Albert Bandura): निरीक्षण आणि मानवी क्षमतेचा शोध

 

अल्बर्ट बंडूरा (Albert Bandura): निरीक्षण आणि मानवी क्षमतेचा शोध

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

मानसशास्त्राच्या इतिहासात काही विचारवंत असे झाले की ज्यांनी केवळ नवे सिद्धांत मांडले नाहीत, तर मानवी स्वभावाविषयीची मूलभूत समजच बदलून टाकली. अल्बर्ट बंडूरा हे अशाच परिवर्तनशील मानसशास्त्रज्ञांपैकी एक. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रभावी असलेल्या वर्तनवाद आणि मनोविश्लेषण यांच्या दरम्यान त्यांनी एक मध्यममार्ग सुचवला कि मानव केवळ बाह्य बक्षीस-शिक्षा किंवा अचेतन प्रेरणांचा परिणाम नसून, तो बोधनिक, सामाजिक आणि आत्मविश्वासपूर्ण एजंट आहे.

बंडूरा यांनी मांडलेली सामाजिक अध्ययन सिद्धांत आणि नंतर विकसित केलेली सामाजिक-बोधनिक सिद्धांत यांमुळे मानसशास्त्रात “मानव स्वतःचा शिल्पकार आहे” ही धारणा बळकट झाली (Bandura, 1977; Bandura, 1986). त्यांच्या मते, माणूस परिस्थितीचा निष्क्रीय बळी नसतो; तो निरीक्षण करतो, अर्थ लावतो, अपेक्षा तयार करतो आणि त्या अपेक्षांवर आधारित कृती करतो. या विचाराने अध्ययन, व्यक्तिमत्त्व, आरोग्य, माध्यम अभ्यास आणि गुन्हेगारी मानसशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडवले.

बुधवार, २५ फेब्रुवारी, २०२६

कार्ल युंग (Carl Gustav Jung): अंतर्मनाचा शोध घेणारा शास्त्रज्ञ

 

कार्ल युंग (Carl Gustav Jung): अंतर्मनाचा शोध घेणारा प्रवासी

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

मानवी मनाच्या गूढ, रहस्यमय आणि खोल थरांमध्ये उतरून त्याचा अर्थ शोधण्याचे धाडस ज्यांनी केले, त्यांपैकी सर्वात प्रभावशाली नाव म्हणजे कार्ल गुस्ताव युंग. मानसशास्त्राच्या इतिहासात सिग्मंड फ्रायड यांच्यानंतर जर कोणी अबोध मनाला व्यापक आणि सांस्कृतिक संदर्भ दिला असेल, तर ते युंग होते. परंतु युंग यांचा प्रवास केवळ वैज्ञानिक सिद्धांतांचा नव्हता; तो आत्मशोध, अंतर्मुखता, वैचारिक संघर्ष आणि स्वतंत्र बौद्धिक ओळख घडवण्याचा प्रवास होता. त्यांनी मानसशास्त्राला केवळ रोगनिवारणाची पद्धत न मानता, मानवी आत्मविकासाचा (individuation) मार्ग म्हणून पाहिले (Jung, 1961; 1964).

कार्ल युंग यांचा जन्म 26 जुलै 1875 रोजी स्वित्झर्लंडमधील Kesswil येथे झाला. त्यांचे वडील प्रोटेस्टंट पाद्री होते आणि घरात धर्म, प्रतीकात्मकता व अध्यात्म यांचे वातावरण होते. बालपणात युंग अनेकदा एकाकी राहत असत. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात (Memories, Dreams, Reflections) नमूद केले आहे की त्यांना स्वप्ने, गूढ प्रतिमा आणि अंतर्मनातील संवाद यांविषयी लहानपणापासूनच तीव्र आकर्षण होते (Jung, 1961). इतर मुलांना जिथे खेळात रस असे, तिथे युंग स्वतःच्या कल्पनाविश्वात रममाण होत. हा एकाकीपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कमजोरी नव्हती; उलट तो त्यांच्या अंतर्मनाच्या संशोधनाचा पाया ठरला. त्यांच्या बालपणीच्या स्वप्नांनी आणि धार्मिक प्रतीकांनी त्यांच्या पुढील “सामूहिक अचेतन” (collective unconscious) या सिद्धांताला आकार दिला.

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

जीन पियाजे (Jean Piaget): विचारांचे मानसशास्त्र

 

जीन पियाजे (Jean Piaget): विचारांचे मानसशास्त्र

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

मानसशास्त्राच्या इतिहासात मानवी विचारप्रक्रियेचा स्वतंत्र, वैज्ञानिक आणि टप्प्याटप्प्याने अभ्यास करणाऱ्या संशोधकांमध्ये जीन पियाजे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मानसशास्त्र प्रामुख्याने वर्तनवाद या दृष्टिकोनातून अभ्यासले जात होते; मानवी मनाच्या अंतर्गत प्रक्रियांकडे तुलनेने कमी लक्ष दिले जात होते. अशा वेळी पियाजे यांनी मुलांच्या विचारप्रक्रियेचा सखोल अभ्यास करून बोधनिक विकासाची एक सुसूत्र, टप्प्यांमध्ये मांडलेली संकल्पना जगासमोर मांडली. त्यामुळे मानसशास्त्रात “मन कसे विचार करते?” या प्रश्नाला वैज्ञानिक अधिष्ठान प्राप्त झाले (Piaget, 1952; 1970).

जीन पियाजे यांचा जन्म 9 ऑगस्ट 1896 रोजी स्वित्झर्लंडमधील नेउशातेल येथे झाला. त्यांच्या वडिलांचा इतिहास आणि साहित्य यांशी संबंध होता, तर आई धार्मिक प्रवृत्तीची होती. लहान वयातच पियाजे यांना नैसर्गिक विज्ञानाची गोडी लागली. केवळ 11व्या वर्षी त्यांनी एका अल्बिनो चिमणीवर लेख लिहिला आणि स्थानिक वैज्ञानिक वर्तुळात त्यांची नोंद झाली. या घटनेतून त्यांच्या जिज्ञासू वृत्तीची आणि निरीक्षणक्षमतेची जाणीव होते. पुढे त्यांनी नेउशातेल विद्यापीठातून जीवशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली (1918). जैविक संरचना आणि अनुकूलन (adaptation) या संकल्पनांचा प्रभाव त्यांच्या पुढील मानसशास्त्रीय विचारांवर स्पष्टपणे दिसून येतो (Gruber & Vonèche, 1995).

पियाजे यांचे मानसशास्त्राकडे वळणे हा त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला. पॅरिसमध्ये त्यांनी अल्फ्रेड बिने (Alfred Binet) यांच्या बुद्धिमत्ता चाचण्यांच्या मूल्यमापन प्रक्रियेत सहभाग घेतला. मुलांच्या उत्तरांचे विश्लेषण करताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणली, मुलं फक्त कमी माहिती असलेली “लहान प्रौढ” नसतात; त्यांची विचार करण्याची पद्धतच गुणात्मकदृष्ट्या वेगळी असते. ही निरीक्षणे त्यांच्या पुढील संशोधनाची बीजे ठरली. त्यांनी मुलांच्या चुकीच्या उत्तरांमागील विचारप्रक्रिया समजून घेण्यावर भर दिला. त्यांच्या मते, चूक ही अज्ञानाचे लक्षण नसून विकासाच्या विशिष्ट टप्प्याचे द्योतक असते (Piaget, 1926).

रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

आई-मुलाचे नाते: Harry Harlow आणि माकडांवरील प्रयोग

 

आई-मुलाचे नाते: Harry Harlow आणि माकडांवरील प्रयोग

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

“माणूस असो की प्राणी आई प्रत्येकालाच हवी.” ही भावना केवळ काव्यात्म वाक्य नाही, तर जैविक आणि मानसशास्त्रीय सत्य आहे. जुलै 2025 मध्ये जपानमधील इचिकावा सिटी प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या एका लहान माकडाच्या पिल्लाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि जगभरातील लोकांच्या हृदयाला भिडली. जन्मताच आईने त्याला दूर ढकलले; इतर माकडांनीही त्याला गटात स्वीकारले नाही. कर्मचाऱ्यांनी त्याची काळजी घेतली, त्याला खायला दिले आणि प्रेमाने त्याचे नाव “पंच” ठेवले. परंतु पंचच्या वर्तनात एक वेगळीच कहाणी दडलेली होती, तो सतत आपल्या आईकडे जाण्याचा प्रयत्न करत असे, नाकारला गेला की घाबरून परत येई, आणि मग कर्मचाऱ्यांनी पुरविलेल्या एका मऊ खेळण्याला घट्ट मिठी मारून बसत असे. त्या खेळण्यात त्याला सुरक्षितता आणि ऊब सापडत होती.

पंचच्या या वर्तनात लोकांना स्वतःचे बालपण, स्वतःचा एकटेपणा आणि भावनिक गरजा दिसू लागल्या. काहींनी त्याला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली; काहींनी त्या खेळण्याला “आईचा पर्याय” असे म्हटले. हळूहळू प्राणीसंग्रहालयाच्या प्रयत्नांमुळे इतर माकडांनी पंचला स्वीकारायला सुरुवात केली, त्याच्याशी खेळू लागली, त्याला गटात सामावून घेतले. पण या संपूर्ण घटनेने एक मूलभूत प्रश्न पुन्हा समोर आणला आईच्या प्रेमाची आणि सुरक्षित बंधाची गरज ही किती खोलवर आणि सार्वत्रिक आहे?

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

NEP-2020 आणि मूल्यमापन

 

NEP-2020 आणि मूल्यमापन

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

भारत सरकारने जाहीर केलेली राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP-2020) ही केवळ अभ्यासक्रम बदलण्याची योजना नाही; ती संपूर्ण शैक्षणिक तत्त्वज्ञान बदलण्याचा प्रयत्न आहे. ज्ञानकेंद्री (content-centric) पद्धतीपासून कौशल्यकेंद्री (skill-centric), अनुभवाधारित (experiential) आणि बहुविद्याशाखीय (multidisciplinary) शिक्षणाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. परंतु एक मूलभूत प्रश्न उभा राहतो, जर अध्यापन प्रक्रिया बदलत असेल, तर मूल्यमापन प्रक्रिया जुन्याच चौकटीत राहू शकते का? याचे स्पष्ट उत्तर नाही असे आहे. NEP-2020 मधील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक बदल हा मूल्यमापन प्रक्रियेत करणे अत्यावश्यक आहे.

NEP-2020 ची मूलभूत उद्दिष्टे

NEP-2020 हे भारतीय शिक्षणव्यवस्थेचे पुनर्रचना करणारे धोरण असून त्याचा केंद्रबिंदू रटाळ शिक्षणापासून संकल्पनात्मक आकलन आणि कौशल्याधारित शिक्षणाकडे संक्रमण हा आहे. धोरणात स्पष्टपणे नमूद केले आहे की विद्यार्थ्यांनी केवळ माहिती पाठ न करता ती समजून घेतली पाहिजे, तिचा विविध संदर्भांमध्ये उपयोग करता आला पाहिजे आणि समस्यांचे निराकरण करता आले पाहिजे (Ministry of Education [MoE], 2020). पारंपरिक “content-heavy” अभ्यासक्रमाऐवजी core concepts आणि higher-order thinking skills यांवर भर देण्याची भूमिका धोरण मांडते. ही भूमिका शैक्षणिक मानसशास्त्रातील Bloom च्या उद्दिष्टांच्या वर्गीकरणाशी सुसंगत आहे, ज्यात स्मरणशक्तीपेक्षा विश्लेषण, मूल्यांकन आणि सृजन या उच्च स्तरांवर भर दिला जातो (Anderson & Krathwohl, 2001).

भारतीय सकारात्मक मानसशास्त्र : एक समग्र दृष्टीकोन

 

भारतीय सकारात्मक मानसशास्त्र : एक समग्र दृष्टीकोन

सकारात्मक मानसशास्त्र ही शाखा मानवी शक्ती, सद्गुण, आनंद, समाधान आणि अर्थपूर्ण जीवन यांचा अभ्यास करते. पाश्चिमात्य जगात याचा औपचारिक विकास Martin Seligman आणि Mihaly Csikszentmihalyi यांनी 1998 नंतर केला. परंतु भारतीय परंपरेत आनंद, आत्मज्ञान, समाधी, करुणा, कर्तव्य आणि धर्म या संकल्पनांवर हजारो वर्षांपासून सखोल चिंतन झालेले आहे. त्यामुळे भारतीय सकारात्मक मानसशास्त्र हे केवळ आयात केलेले तत्त्वज्ञान नसून आपल्या सांस्कृतिक वारशाशी सुसंगत अशी समृद्ध परंपरा आहे.

भारतीय तत्त्वज्ञान आणि सकारात्मक मानसशास्त्र

भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मानसिक आरोग्य, स्व-नियमन, करुणा, समत्व आणि आत्मबोध या संकल्पना अत्यंत केंद्रस्थानी आहेत. पाश्चिमात्य सकारात्मक मानसशास्त्राचा औपचारिक विकास 20व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला असला, तरी भारतीय ग्रंथ आणि साधना परंपरेत मानवी उत्कर्ष (flourishing) याविषयी सखोल विचार हजारो वर्षांपासून आढळतो. आधुनिक सकारात्मक मानसशास्त्रामधील स्थितीस्थापकत्त्व, भावनिक नियमन, अर्थपूर्ण जीवन, परहितवादी वर्तन आणि सहजगता या संकल्पना भारतीय तत्त्वज्ञानाशी खोलवर सुसंगत दिसतात.

अंतर्ज्ञान (Intuition) : मानवी निर्णयक्षमतेतील प्रज्ञेची शक्ती

  अंतर्ज्ञान ( Intuition) : मानवी निर्णयक्षमतेतील प्रज्ञेची शक्ती (सर्व चित्रे आणि इमेजेस google साभार) मानवाच्या विचारप्रक्रियेमध्ये दोन ...