ताणासंबंधी शरीरशास्त्रीय कारणमीमांसा
ताण हे मानसिक दबाव निर्माण करते आणि
शरीरामध्ये अल्प आणि दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम होणारे बदल घडवून आणते. ताणाच्या
प्रतिक्रियेमध्ये दोन परस्पर संबंधित प्रणाली मोठ्या प्रमाणात सहभागी असतात. त्या
म्हणजे अनुकंपी-अधिवृक्क मज्जासंस्था (SAM) प्रणाली आणि हायपोथॅलॅमस-पियुषिका-अधिवृक्क
ग्रंथी अक्ष आहेत. मेंदूद्वारे अनुकंपी मज्जासंस्थेच्या नियंत्रणाखाली भय, क्रोध, उत्तेजना इत्यादी भावनांची निर्मिती होते. यांचे
नियंत्रण प्रामुख्याने शरीरात ऐड्रिनैलिन यंत्रणेद्वारे केले जाते.