शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

माहिती सुरक्षा | Information Security

 माहिती सुरक्षा | Information Security 

    इरंबू थिराई (2018) नावाचा तमिळ चित्रपट नंतर तो दि रिटर्न ऑफ अभिमन्यू नावाने हिंदीमध्ये डब झालेला चित्रपट आपणास सायबर गुन्हेगारी आणि सायबर सुरक्षा याविषयी अवगत करतो. या चित्रपटात व्हाईट डेव्हिल उर्फ सत्यमूर्ती हा एक मास्टर हॅकर आहे. प्रत्येक व्यक्तीची माहिती त्याच्या हातात असणे हे त्याचे अंतिम ध्येय साध्य करण्याच्या मार्गात असलेली अडचण म्हणजे कर्ण, भारतीय सैन्यातील मेजर, जो त्याच्या वडिलांच्या अनावश्यक कर्ज घेण्याच्या सवयीमुळे कुटुंबापासून दूर गेला होता. त्याला आपल्या बहिणीचे तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी  पैशांची आवश्यकता असल्याने खोट्या कागदपत्रांसह बँकेकडून कर्ज घेतो. तथापि, त्याच्या खात्यातून संपूर्ण रक्कम गायब होते आणि दृढनिश्चयी कर्ण यासाठी जबाबदार असलेल्या घोटाळेबाजांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. सदर चित्रपटात अनेक प्रसंगातून आपण किती बेफिकारीने पैशांचा व्यवहार करतो, माहिती कशी असुरक्षितपणे हाताळतो आणि त्यामुळे आपणास अनेक आर्थिक समस्यांना कसे सामोरे जावे लागते याविषयी जनजागृती केलेली आहे.

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३

भारतीय ज्ञान प्रणाली | Indian Knowledge System I इंडियन नॉलेज सिस्टम

 

भारतीय ज्ञान प्रणाली | Indian Knowledge System

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकताच शालेय शिक्षणाच्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखडय़ाचा मसुदा प्रसिद्ध केला असून त्यावर पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक यांच्याकडून हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. या आराखडय़ात ३ ते १८ वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या गरजा, अध्ययन-अध्यापन पद्धती, शैक्षणिक साहित्य, शिक्षणाचे विविध टप्पे यांचा समावेश आहे. प्राचीन भारतातील तत्त्वज्ञानाची बैठक हा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा खरा स्रोत असल्याचे नमूद करून सहा प्रमाणांवर अभ्यासक्रमात भर देण्यात आला आहे. तसेच पंचकोश विकासाच्या माध्यमातून मुलांच्या मनोविकासालाही महत्त्व देण्यात आले आहे. देशातील समृद्ध, सांस्कृतिक वारसा आणि परंपरांच्या माध्यमातून भारतीयत्व समजून घेण्यावर, आयुर्वेद आणि योग शिकण्यावर भर देण्यात आला आहे.

बुधवार, ३० ऑगस्ट, २०२३

SOAR Analysis | SOAR विश्लेषण

 SOAR Analysis | SOAR विश्लेषण

SOAR Analysis हे एक स्व-विश्लेषण तंत्र असून ते आपल्या विद्यमान सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि भविष्यकालीन उद्दिष्टांसाठी नवी दृष्टी विकसित करण्यासाठी वापरू शकतो. हे मुळात एक धोरणात्मक नियोजन करण्याचे साधन आहे ज्याद्वारे आपण आपल्या महत्वाकांक्षा सुस्पष्ट करू शकतो.

SOAR विश्लेषण हे प्रामुख्याने आपण कोण आहोत आणि भविष्यात आपण स्वतःला कुठे पाहतो आणि इतरांबरोबर कसे काम करत आहात हे समजून घेण्यास मदत करते. आपण SWOT विश्लेषण बद्दलचा लेख वाचला असाल तर त्याच्याशी हे साम्य असेल. SWOT विश्लेषण हे आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहे तर SOAR विश्लेषण हे व्यक्तिमत्वाबरोबरच ध्येय धोरणे निश्चितीसाठी आवश्यक आहे. आपण हे लक्षात  ठेवावे की आपल्या विचारांची किंवा धोरणात्मक प्रक्रियेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी ही सर्व फ्रेमवर्क आहेत. म्हणूनच, या सर्वांचे अगदी नवीन तंत्रात विलीन करून दुसरी रचना शोधणे देखील शक्य आहे. जर आपला विश्वास असेल तरच त्यांना मर्यादा आहे अन्यथा आपल्या महत्वाकांक्षेला आकाश ठेंगणे असते. आपण SOAR विश्लेषणाच्या घटकांचे एक-एक करून परिक्षण करणार आहोत आणि प्रत्येक शीर्षकाच्या खाली SOAR विश्लेषण प्रश्न सापडतील.

सोमवार, २१ ऑगस्ट, २०२३

सॉफ्ट स्किल्स: नातेसंबंध हाताळण्याची कौशल्ये | Soft Skills for managing relationships

 

सॉफ्ट स्किल्स: नातेसंबंध हाताळण्याची कौशल्ये | Soft Skills for managing relationships 

आज आपणास कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल मग ते नोकरी असो किंवा व्यवसाय तर आपल्या अंगी सॉफ्ट स्किल्स आणि हार्ड स्किल्स अशी दोन अंत्यत महत्त्वाची कौशल्ये आवश्यक आहेत. हार्ड कौशल्ये ही आपण आपल्या शैक्षणिक जीवनात मिळविलेल्या सगळ्या पदव्या किंवा गुणपत्रिका होत. हार्ड कौशल्ये, ज्यांना तांत्रिक कौशल्ये देखील म्हणतात जी नोकरीशी निगडीत असतात, जी प्रत्येक कामाच्या स्वरूपावरून आवश्यक पात्रता असते. दुसऱ्या शब्दांत, प्रत्येक कंपनीतील प्रत्येक पदासाठी एक अद्वितीय हार्ड कौशल्यांची सूची असते. उदाहरणार्थ, एका अकाउंटंटला बँक स्टेटमेंट्सची जुळवाजुळव कशी करावी हे माहित असणे आवश्यक आहे, तर ते शिक्षकास अनावश्यक आहे. त्याच वेळी, शिक्षकासाठी त्यांच्या अनुभवाची पातळी काहीही असो, शिकवित असलेल्या विषयातील आशय समृद्धी महत्त्वाची असते, परंतु इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हे एक कौशल्य आहे जे सहसा शिक्षकासाठी आवश्यक नसते. म्हणजेच ज्या त्या कामासाठी मुलभूत ज्ञान आणि कौशल्ये अभ्यासक्रमातून आत्मसात केलेले असतात त्यास हार्ड स्किल्स किंवा तांत्रिक कौशल्ये म्हणतात. तांत्रिक कौशल्ये ही प्रशिक्षण, शिक्षण आणि सराव याद्वारे मिळवलेली आणि मापन करता येणारी कौशल्ये होत. यामध्ये आपले कार्य किती कौशल्याने केल्या जाते हे ठरविले जाते. विशिष्ट क्षेत्राशी निगडीत आवश्यक क्षमता असतात ज्यांना आपण साधारण कौशल्ये अथवा व्यवहारिक कौशल्य देखील म्हणू शकतो.

व्यक्तिमत्त्व प्रकार आणि विकास | Personality Development

 

व्यक्तिमत्त्व प्रकार आणि विकास

किशोरवयीन आकाश हा मित्र आणि नातेवाईक यांच्या कोणत्याही कार्यक्रमात नेहमी पुढे असायचा. कोणतही नियोजन असो वा कार्यक्रम असेल तर आपलं म्हणणं निर्भीडपणे मांडायचा. त्याचा स्वभाव अगदी मनमोकळा आणि लाघवी होता. आकाश बरोबर असला की, सगळे मित्र निश्चिंत असत, नातेवाईकांतही तो धीट म्हणून ओळखला जायचा. जसजसा तो मोठा होत गेला तसा तो कॉलेजमध्ये आणि नंतर नोकरीच्या ठिकाणीही विविध गोष्टींवर चर्चा करताना निर्भीडपणे बोलायचा. सगळ्यांमध्ये मिसळणं त्याला आवडायचं. आपलंही व्यक्तिमत्त्व आकाश सारखं असाव असं इतरांना वाटत असते.

नम्रता ही अतिशय गोड मुलगी, नृत्य आणि मानसशास्त्र या दोन्हींचं शिक्षण घेऊन नृत्याचे शिकवणी घेते. मात्र तिला स्वत:ला समुपदेशक म्हणून काम करता येत नाही. खूपच कमी बोलते, त्यामुळे ती बोलण्यापेक्षा लेखन करते. लोकांत फारशी मिसळत नाही, सणसमारंभात जाणे तिला संकोचित वाटते. एकटं राहायला तिला आवडतं. मनन-चिंतन करणं, नवनवीन विषयाचं वाचन करणं तिला मनापासून आवडतं. मात्र तिच्या या एकलकोंड्या स्वभावाची घरच्यांना चिंता वाटत आहे.

आकाश हा बहिर्मुख किंवा एक्स्ट्रोव्हर्ट व्यक्तिमत्त्व प्रकारात मोडतो तर नम्रता ही अंतर्मुख किंवा इन्ट्रोव्हर्ट व्यक्तिमत्त्वाची आहे. बहिर्मुख व्यक्ती सर्वांना हव्याहव्याशा वाटतात तर अंतर्मुख व्यक्तींबद्दल लोक फारसे उत्सुक नसतात. अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या संज्ञा कार्ल युंग यांनी मानसशास्त्रात आणल्या. पण मुळात व्यक्तिमत्त्व म्हणजे काय आणि व्यक्तिमत्त्वासंबंधी समज-गैरसमज दूर होण्यासाठी शास्त्रीय माहिती जाणून घेऊ या.

शनिवार, २९ जुलै, २०२३

बायस्टँडर / दर्शक प्रभाव | Bystander Effect

 

लोक बघ्याच्या भूमिकेत का असतात?

रविवार 28 मे, 2023 रात्री नऊच्या आसपास एक मुलगा दिल्लीच्या शाहबाद डेअरीजवळ रस्त्यावर उभा होता. अनेक लोक रस्त्यावरून ये-जा करत होते. साक्षी तयार होऊन मित्राच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहण्यासाठी बाहेर पडते. तेव्हा रस्त्यावर उभा असलेला तो मुलगा साक्षीला थांबवतो. त्यानंतर त्याने एका हाताने साक्षीला पकडून दुसऱ्या हातात चाकूने हल्ला करतो. साक्षी भिंतीजवळ पडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते. तो मुलगा पुढील दोन मिनिटात साक्षीवर चाकूने 40 हून अधिक हल्ले करतो. साक्षी रस्त्यावर पडल्यावर तो मुलगा शेजारी पडलेल्या एका मोठ्या दगडाने तिच्यावर 6 वेळा हल्ला करतो. त्यानंतर तो साक्षीला लाथ मारून तिथून निघून जातो. या दरम्यान विविध वयोगटातील किमान 17 लोक तेथून जातात. त्यांच्यामध्ये काही महिला होत्या, परंतु त्यापैकी कोणीही त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त सुरुवातीला एक मुलगा वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर तोही निघून जातो. सुमारे अर्धा तास साक्षीचा मृतदेह रस्त्यावर पडून होता.

काही दिवसानंतर पुण्यातही अशीच घटना दिसून आली. वर्दळीचे ठिकाण अशी ओळख असलेल्या सदाशिव पेठेतील एका रस्त्यावर एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वार लागल्यामुळे जखमी झालेली तरुणी पळत सुटली. तरुणी धावत असल्याचे बघून तिचा पाठलाग करून तो तरुण वारंवार कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. पण एका तरुणाने हल्लेखोराच्या हातातील कोयता हिसकावला म्हणून मुलगी वाचली नाही तर भलतेच घडले असते. अशीच एक घटना पुन्हा पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क या ठिकाणी संध्याकाळी सातच्या सुमारास बर्निग घाट परिसरात घडली. तेथेही लोक केवळ बघ्याची भूमिकेत होते. लोक असे का वागतात? बहुसंख्य लोक मदत न करता घटना मोबाईलमध्ये व्हिडीओ करण्यात का गुंतलेले होते? लोकांचे नैतिक वर्तन असे का असते? शेवटी असाही प्रश्न उपस्थित होतो की, माणुसकी संपत चालली आहे का? की यामागे मानसशास्त्रीय काही कारण असू शकते. यास बायस्टँडर प्रभाव म्हणजे प्रेक्षक प्रभाव असे म्हणतात.

शनिवार, ८ जुलै, २०२३

माइंडफुलनेस: सजगपणे जगण्याची क्षमता | Mindfulness

 

माइंडफुलनेस: सजगपणे जगण्याची क्षमता | Mindfulness

एका शहरात सागर आणि प्रीती कुटुंबापासून दूर दोघेच रहात होते. त्यांना पाच वर्षाचा रोहन नावाचा मुलगा होता. दोघेही कामावर जात असल्याने तो गुंतून राहावा म्हणून त्याला मोबाईल दिलेला होता. रोहन कोणतीही गोष्ट करायची असेल तर मोबाईलशिवाय करू शकत नव्हता. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला मोबाईल लागायचा, जेवण करताना तर पहिली अटच ती असायची. त्याचे आई-वडील सांगतात की मोबाईल दिल्याशिवाय तो जेवतच नाही.........

आज जवळपास सर्वच घरात वरील प्रसंग घडताना दिसत असेल. मुले काय खात आहेत, पीत आहेत याचे भानच राहिलेले नाही. हे भान किंवा अस्तित्वाची जाणीव असणे म्हणजे काय तर माइंडफुलनेस किंवा सजगता होय. आपण माइंडफुलनेस ही एक मूलभूत मानवी क्षमता म्हणू शकतो,  मानवाला कोणत्याही प्रसंगी पूर्णपणे सचेतन राहण्याची, जागरूक राहण्याची, मन शांत ठेवून सारासार विचार करण्याची, आपण कोठे आहोत आणि आपण नेमकं काय करीत आहोत याची निष्पक्षपणे जाणीव असणे होय.

थोडक्यात सांगायचे झाले तर माइंडफुलनेस म्हणजे सद्य स्थितीत जगणे होय, दोन श्वासामधील जगणं होय. काही लोक आपल्या भूतकाळात जगतात, तर काही लोक आपल्या भविष्यकाळात विहार करत असतात. परंतु आपल्याला जर आनंदी राहायचे असेल तर आपण वर्तमानात जगले पाहिजे आणि सद्य स्थितीतला क्षण जगता आला पाहिजे. आपणास जर कायमस्वरूपी आनंदी राहायचे असेल तर आपण माइंडफुलनेसच्या मदतीने आनंदी राहू शकतो. काही लोकांचा स्वभावच असा असतो की, ते तुरूंगामध्ये जरी असले तरी तिथे आनंदी असतात आणि काहींचा स्वभाव असा असतो की त्यांना राज महालात जरी ठेवले तरी ते कायम दुखी असतात.

माइंडफुलनेस हा नेहमी आनंदी राहण्याचा एक राजमार्ग आहे. आपण विचार करत असाल की हे काय आणि कसे असते? खरं तर माइंडफुलनेस ही एक अशी पद्धत आहे, ज्याद्वारे आपण आपल्या आत, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा परिस्थितींबद्दल जागरूकता निर्माण करतो. हे एक प्रकारचे ध्यानच आहे, फरक एवढाच आहे की, एका विशिष्ट वेळी स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, माइंडफुलनेसमध्ये, आपण आपले लक्ष त्या क्षणावर केंद्रित केले पाहिजे, आपण जिथे आहोत, त्याच स्थितीत तो क्षण अनुभवणे आणि जगणे आवश्यक आहे.

असे मानले जाते की माइंडफुलनेस तंत्राच्या नियमित सरावाने आपण आनंदी राहू शकतो. वास्तविक, याद्वारे आपण वर्तमान क्षणाशी जोडतो आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारतो. आपण परिस्थिती बदलू शकत नाही पण आपण आपली प्रतिक्रिया नक्कीच बदलू शकतो आणि परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलू शकतो. यामुळे आपण हळूहळू प्रत्येक परिस्थिती स्वीकारायला आणि त्यात आनंदी राहायला शिकतो. कारण आपण त्याची निवड केलेली असते “मी आनंदी आहे कारण मी आनंदी राहण्याची निवड केलेली आहे”.

योग थेरपी : शारीरिक, मानसिक आरोग्य आणि जीवनशैली संतुलन

  योग थेरपी : शारीरिक , मानसिक आरोग्य आणि जीवनशैली संतुलन मानवी आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नव्हे , तर शारीरिक , मानसिक आणि सामाजिक स्...