मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये: भाग दोन
भावनिक नियमन (Emotional
Regulation):
भावनिक
नियमन म्हणजे व्यक्तीच्या आतून उत्पन्न होणाऱ्या भावना योग्य प्रकारे ओळखून, समजून घेत
त्यांचे व्यवस्थापन करणे. मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांसाठी हे
कौशल्य अत्यंत मूलभूत आहे, कारण या क्षेत्रात सतत इतरांच्या
दुःखद, क्लेशदायक व गुंतागुंतीच्या अनुभवांशी सामना करावा लागतो. त्यामुळे, स्वतःचे
भावविश्व सांभाळून रुग्णाला तटस्थ व परानुभूतीपूर्वक मदत करणे ही एक अत्यंत नाजूक
पण गरजेची प्रक्रिया असते (Gross, 1998).
मानसिक
आरोग्य व्यावसायिक अनेकदा नैराश्य, चिंता, आघात, शोक, आणि
आत्महत्येच्या विचारांशी झगडणाऱ्या रुग्णांना मदत करतात. या प्रक्रियेत, रुग्णांच्या
भावनांचा प्रभाव व्यावसायिकांवरही होऊ शकतो, ज्याला "secondary
traumatic stress" किंवा "vicarious trauma" असे म्हटले
जाते (Figley, 1995). अशा परिस्थितीत, भावनिक नियमन
जोपासणे म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणे, त्यांच्याशी
प्रामाणिक राहणे आणि त्यांचा व्यावसायिक कामावर परिणाम होऊ न देणे.
भावनिक
नियमन राखण्यासाठी अनेक मानसशास्त्रज्ञ विविध तंत्रांचा वापर सुचवतात. उदाहरणार्थ,
James Gross यांच्या “Process Model of Emotion Regulation”
नुसार, भावना
व्यवस्थापनासाठी व्यक्ती "situation selection",
"attention deployment", "cognitive change", आणि "response
modulation" अशा टप्प्यांवर काम करू शकते (Gross, 1998). विशेषतः,
cognitive reappraisal हे तंत्र मानसिक आरोग्य व्यावसायिकांना परिस्थितीचा सकारात्मक किंवा
तटस्थ अर्थ लावून ताण कमी करण्यात मदत करते (John &
Gross, 2004).
स्वतःच्या
भावना समजून घेण्यासाठी emotional intelligence हे कौशल्यही
उपयोगी ठरते. Daniel Goleman यांच्यानुसार, भावनिक
बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे, समजणे, व योग्य
प्रकारे प्रतिसाद देणे. हे कौशल्य असलेले व्यावसायिक रुग्णाच्या भावनांच्या
प्रभावाखाली न जाता त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतात (Goleman,
1995).
शिवाय, मानसिक आरोग्य
व्यावसायिकांनी स्वतःची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. Self-care
म्हणजेच, ध्यानधारणा, व्यायाम, कुटुंबासोबत
वेळ घालवणे, आणि सुपरव्हिजन किंवा पिअर-सपोर्ट ग्रुप्समध्ये
सहभागी होणे, यामुळे भावनिक थकवा टाळता येतो (Barnett
et al., 2007).
मानसिक
आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी भावनिक नियमन जोपासणे ही केवळ वैयक्तिक
आवश्यकता नाही, तर व्यावसायिक जबाबदारी आहे. रुग्णांच्या
भावनांमध्ये अडकून न पडता, त्यांना मदतीचा हात देण्यासाठी
स्वतःच्या भावना नियंत्रित ठेवणे हे या क्षेत्रातील यशाचे मूलभूत अंग आहे. या
कौशल्याचा विकास सातत्याने स्व-निरीक्षण, प्रशिक्षण व
भावनिक बुद्धिमत्तेच्या विकासाद्वारे शक्य आहे.
नैतिक आणि
गोपनीयतेची जाणीव (Ethical Awareness and
Confidentiality)
मानसिक
आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी नैतिकता आणि गोपनीयता ही केवळ
आचारसंहितेतील तात्त्विक संकल्पना नसून, त्या
रुग्णाच्या हितासाठी अत्यंत व्यावहारिक आणि मूलभूत मूल्ये आहेत. मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, सामाजिक
कार्यकर्ते, मानसोपचारतज्ज्ञ किंवा थेरपिस्ट हे सर्व
व्यावसायिक अत्यंत नाजूक आणि वैयक्तिक माहितीच्या संपर्कात येतात. त्यामुळे ही
माहिती किती काळ, कशासाठी, कोणासोबत शेअर
करायची आणि कधी गोपनीयता मोडायची याचे सूक्ष्म भान असणे अत्यावश्यक असते.
1. गोपनीयतेचे
तत्त्व (Principle of Confidentiality)
गोपनीयता
म्हणजे रुग्णाने दिलेली माहिती व्यावसायिकांनी कोणत्याही तृतीय पक्षाशी
परवानगीशिवाय शेअर करू नये, ही एक मूलभूत जबाबदारी आहे. American
Psychological Association (APA) च्या
2017
च्या Ethical
Principles of Psychologists and Code of Conduct नुसार,
“Psychologists have a primary obligation and take reasonable precautions to
protect confidential information obtained through or stored in any medium.”
(APA, 2017, Standard 4.01).
गोपनीयतेमुळे
रुग्ण उपचार प्रक्रियेत अधिक मोकळेपणाने संवाद साधतो. जर रुग्णास ही खात्री नसेल
की त्याची माहिती सुरक्षित आहे, तर तो अनेक महत्त्वाच्या गोष्टी
थेरपिस्टकडे सांगणारच नाही, ज्यामुळे उपचार प्रक्रिया अर्धवट
राहते.
2. नैतिक
निर्णय प्रक्रियेतील संवेदनशीलता
मानसिक
आरोग्य व्यावसायिकांनी कोणतीही कृती करताना beneficence (हित करणे),
non-maleficence (अपाय न करणे), autonomy (स्वायत्ततेचा सन्मान करणे) आणि justice
(न्याय)
या मूलभूत नैतिक तत्त्वांचा विचार करणे अपेक्षित आहे (Beauchamp
& Childress, 2013). उदाहरणार्थ, जर रुग्ण आत्महत्येच्या विचारात असेल, तर गोपनीयतेचे
उल्लंघन करणे नैतिकदृष्ट्या आवश्यक ठरू शकते, पण हे निर्णय
योग्य नैतिक चौकटीत, व्यावसायिक मार्गदर्शनानुसार आणि
किमान हस्तक्षेप ठेवून घ्यावे लागतात.
3. व्यावसायिक
मर्यादा राखणे (Maintaining Professional Boundaries)
नैतिकतेचा
आणखी एक भाग म्हणजे व्यावसायिक संबंध मर्यादित ठेवणे. मानसिक आरोग्य व्यावसायिक
आणि रुग्ण यांच्यातील संबंध केवळ व्यावसायिक असावा. भावनिक गुंतवणूक, वैयक्तिक भेटी, सोशल मीडियावर
अनावश्यक संपर्क किंवा आर्थिक संबंध यामुळे dual
relationships निर्माण होतात, जे नैतिकदृष्ट्या अनुचित आहेत (Zur,
2007). अशा
संबंधांमुळे रुग्णाच्या हिताला धोका पोहोचतो, कारण त्याचा
उपचारांवरील विश्वास डळमळीत होतो.
4. साक्षर आणि
स्पष्ट संमती (Informed and Explicit Consent)
गोपनीयतेसंदर्भातील
निर्णयामध्ये रुग्णाची पूर्वसंमती घेणे आवश्यक असते. याला informed
consent म्हणतात. यामध्ये रुग्णाला स्पष्टपणे सांगितले जाते की त्याची माहिती
कुठे, कशी आणि कोणत्या परिस्थितीत वापरली जाईल. उदाहरणार्थ, संशोधनासाठी
रुग्णाच्या माहितीचा उपयोग करायचा असल्यास, त्याची स्पष्ट
संमती (written informed consent) आवश्यक असते (WMA, 2013).
5. कायदेशीर
अपवाद (Legal Exceptions)
जर रुग्ण आत्महत्येचा, इतरांचा जीव
घेण्याचा किंवा हिंसाचाराचा धोका निर्माण करत असल्यास, बाल लैंगिक अत्याचार, कौटुंबिक
हिंसाचार इत्यादी प्रकरणांत आणि कोर्टाचे आदेश असल्यास अशा विशिष्ट
परिस्थितींमध्ये गोपनीयता मोडणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असते. अशा प्रसंगी
गोपनीयता मोडताना अत्यंत कमी आवश्यक माहितीच उघड केली पाहिजे, ही नैतिक
अपेक्षा असते (Corey, Corey & Callanan, 2014).
गोपनीयता
आणि नैतिकता या मानसिक आरोग्य क्षेत्रातील शिडीच्या पाया आहेत. रुग्णाच्या
विश्वासावर आधारित उपचार प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी या मूल्यांचा आधार घेणे
अनिवार्य आहे. प्रत्येक व्यावसायिकाने professional
ethics चा अभ्यास सतत करत राहणे, केस स्टडींचा
संदर्भ घेणे आणि नैतिक संभ्रमाच्या प्रसंगी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक
आहे.
संशोधन व
विश्लेषण कौशल्ये: (Research and Analytical Skills)
मानसिक
आरोग्य क्षेत्र हे एक सतत विकसित होत जाणारे क्षेत्र आहे. विज्ञान, समाजशास्त्र,
तंत्रज्ञान आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनात घडणारे सततचे बदल या
क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी संशोधन आणि विश्लेषण कौशल्ये अत्यावश्यक
बनवतात. आधुनिक मानसिक आरोग्य सेवा केवळ पारंपरिक सल्लागार तंत्रावर आधारित नसून,
त्या प्रमाणाधिष्ठित (evidence-based) पद्धतींवर
आधारलेल्या असतात (Kazdin, 2008). त्यामुळे, संशोधन व विश्लेषणाच्या दृष्टीकोनातून समज आणि कौशल्ये यांची आवश्यकता
वाढते.
1. संशोधन
कौशल्यांचे महत्त्व
संशोधन
म्हणजे नवीन माहिती गोळा करणे, त्याचे परीक्षण करणे, आणि
त्यातून निष्कर्ष काढून पुढील कार्यात त्या निष्कर्षांचा वापर करणे. मानसिक आरोग्य
क्षेत्रात संशोधनाचे अनेक प्रकार असतात. उदाहरणार्थ, केस
स्टडीज, क्लिनिकल ट्रायल्स, क्वालिटेटिव्ह
इंटरव्ह्यूज, आणि लॉन्गिट्युडिनल स्टडीज. ही कौशल्ये केवळ
वैज्ञानिक लेखनापुरती मर्यादित नसून, ती प्रत्यक्ष उपचार
प्रक्रियेत उपयोगी पडतात. उदाहरणार्थ, एखादी विशिष्ट थेरपी
विशिष्ट वयोगटात किती परिणामकारक आहे, यासाठी स्थानिक किंवा
राष्ट्रीय पातळीवर संशोधन आवश्यक असते (Creswell & Poth, 2017).
2.
मानसशास्त्रीय चाचण्यांचे विश्लेषण
मानसशास्त्रीय
चाचण्या — जसे की Beck Depression Inventory (BDI), Minnesota Multiphasic Personality
Inventory (MMPI) किंवा Wechsler Intelligence Scale for
Children (WISC) या चाचण्या घेतल्यानंतर त्याचे परिणाम वाचून समजून
घेणे ही एक विश्लेषणात्मक प्रक्रिया असते. विश्लेषण कौशल्यांशिवाय या चाचण्या
निरुपयोगी ठरू शकतात. एखाद्या रुग्णाचे स्कोअर केवळ वाचणे नव्हे, तर ते रुग्णाच्या पार्श्वभूमी, सध्याच्या स्थिती,
आणि सामाजिक संदर्भात बसवून पाहणे हे या कौशल्याच्या कक्षा आहेत (Groth-Marnat
& Wright, 2016).
3. थेरपी
मॉडेल्सचे तुलनात्मक मूल्यांकन
आजच्या
काळात विविध प्रकारच्या थेरपी पद्धती उपलब्ध आहेत — Cognitive Behavioral Therapy (CBT),
Dialectical Behavior Therapy (DBT), Mindfulness-Based Therapies, Psychodynamic
Therapy इत्यादी. प्रत्येक थेरपीची मूलभूत भूमिका, वापरण्याची पद्धत आणि परिणामकारकता वेगळी असते. संशोधन कौशल्यांच्या
आधारेच मानसतज्ज्ञ एखाद्या विशिष्ट थेरपीची निवड रुग्णासाठी करतात. उदाहरणार्थ,
CBT हे नैराश्यासाठी प्रभावी असल्याचे अनेक meta-analyses दर्शवतात (Butler et al., 2006), परंतु रुग्णाचा कल व स्वीकार यावर आधारित पर्याय शोधण्यासाठी विश्लेषण
गरजेचे असते.
4. डेटा
विश्लेषण आणि तांत्रिक कौशल्ये
आज
मानसिक आरोग्य क्षेत्रात SPSS, R, Python, अशा सांख्यिकीय साधनांचा वापर करून
डेटा विश्लेषण केले जाते. यामध्ये गणिती आकडेवारी, ट्रेंड
विश्लेषण, कोरिलेशन व रिग्रेशन मॉडेल्स इत्यादींचा समावेश
होतो. ज्या व्यावसायिकांकडे ही कौशल्ये असतात, ते evidence-informed
decisions घेऊ शकतात, जे क्लिनिकल कार्यात
उपयुक्त ठरते (Field, 2013).
5. नवीन
ज्ञानासाठी सतत अध्ययन
संशोधन
व विश्लेषण कौशल्ये म्हणजे केवळ एखादा डेटा वाचणे नाही, तर तो योग्य
संदर्भात समजून घेणे, त्यातून नवे प्रश्न निर्माण करणे आणि
त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वैज्ञानिक वृत्ती ठेवणे होय. Critical
appraisal ही या कौशल्यातील कळीची प्रक्रिया असून, व्यावसायिकांनी सतत शास्त्रीय जर्नल्स व संशोधने वाचून स्वतःला अद्ययावत
ठेवणे अपेक्षित असते (Sackett et al., 2000).
संशोधन
आणि विश्लेषण कौशल्ये म्हणजे मानसिक आरोग्य व्यावसायिकांचा मार्गदर्शक दीप आहे. या
कौशल्यांच्या साहाय्यानेच ते विविध रुग्णांच्या गरजा समजून घेऊ शकतात, योग्य उपचार पद्धती
ठरवू शकतात आणि त्यांच्या सेवेचा दर्जा वाढवू शकतात. त्यामुळे या कौशल्यांचा
अभ्यास, वापर आणि वृद्धी ही मानसिक आरोग्य क्षेत्रातील
प्रत्येक विद्यार्थ्याची व व्यावसायिकाची प्राथमिक जबाबदारी ठरते.
(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
संदर्भ:
American
Psychological Association. (2017). Ethical Principles of
Psychologists and Code of Conduct. https://www.apa.org/ethics/code
Barnett,
J. E., Baker, E. K., Elman, N. S., & Schoener, G. R. (2007). In
pursuit of wellness: The self-care imperative. Professional Psychology:
Research and Practice, 38(6), 603–612.
Beauchamp,
T. L., & Childress, J. F. (2013). Principles of
Biomedical Ethics (7th ed.). Oxford University Press.
Butler,
A. C., Chapman, J. E., Forman, E. M., & Beck, A. T. (2006). The
empirical status of cognitive-behavioral therapy: A review of meta-analyses.
Clinical Psychology Review, 26(1), 17–31.
Corey,
G., Corey, M. S., & Callanan, P. (2014). Issues and
Ethics in the Helping Professions (9th ed.). Brooks/Cole.
Creswell,
J. W., & Poth, C. N. (2017). Qualitative Inquiry and
Research Design: Choosing Among Five Approaches. Sage publications.
Field,
A. (2013). Discovering Statistics Using IBM SPSS
Statistics. Sage.
Figley,
C. R. (1995). Compassion Fatigue: Coping With Secondary
Traumatic Stress Disorder in Those Who Treat the Traumatized. Brunner/Mazel.
Goleman,
D. (1995). Emotional Intelligence: Why It Can Matter More
Than IQ. Bantam Books.
Gross,
J. J. (1998). The emerging field of emotion regulation: An
integrative review. Review of General Psychology, 2(3), 271–299.
Groth-Marnat,
G., & Wright, A. J. (2016). Handbook of Psychological
Assessment (6th ed.). Wiley.
John,
O. P., & Gross, J. J. (2004). Healthy and unhealthy
emotion regulation: Personality processes, individual differences, and life
span development. Journal of Personality, 72(6), 1301–1334.
Kazdin,
A. E. (2008). Evidence-Based Psychotherapies for Children
and Adolescents. Guilford Press.
Sackett,
D. L., Strauss, S. E., Richardson, W. S., Rosenberg, W., & Haynes, R. B. (2000). Evidence-Based Medicine: How to Practice and Teach EBM (2nd ed.). Churchill Livingstone.
WMA
(World Medical Association). (2013). Declaration of
Helsinki – Ethical Principles for Medical Research Involving Human Subjects.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions