बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

टेक्नोफरन्स (Technoference) : आधुनिक नात्यांमधील तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप

 

टेक्नोफरन्स (Technoference) : आधुनिक नात्यांमधील तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप

आधुनिक डिजिटल युगात तंत्रज्ञान आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात खोलवर रुजलेले आहे. स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टॅबलेट, लॅपटॉप, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि 24x7 येणाऱ्या डिजिटल नोटिफिकेशन यांनी मानवी दैनंदिन व्यवहाराची संरचना बदलली आहे. संशोधनानुसार सरासरी प्रौढ व्यक्ती दिवसाला 96 ते 150 वेळा तरी फोन तपासते (Andrews et al., 2015), ज्यातून तंत्रज्ञानाचा वावर किती व्यापक झाला आहे हे स्पष्ट होते. या वाढत्या डिजिटल अवलंबित्वाला Technological Immersion असे संबोधले जाते आणि याच तंत्र-आधारित जीवनशैलीमुळे मानवी नातेसंबंध, संवाद प्रक्रिया आणि लक्ष नियंत्रित करण्याची क्षमता यांच्या गुणवत्तेत हळूहळू क्षय होऊ लागला आहे. या हस्तक्षेपात्मक परिणामाला टेक्नोफरन्स असे म्हणतात. हा शब्द Technology आणि Interference या दोन शब्दांपासून तयार झाला असून त्याचा अर्थ आहे तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारा मानवी परस्परसंवादातील व्यत्यय किंवा हस्तक्षेप (McDaniel & Coyne, 2016). याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तंत्रज्ञान स्वतः समस्या नसून त्याचा अनियंत्रित आणि अवधानभंग करणारा वापर मानवी नातेसंबंधाच्या गुणवत्तेत हस्तक्षेप करतो.

टेक्नोफरन्सची व्याख्या:

टेक्नोफरन्स या संकल्पनेचा मूळ विचार मानसशास्त्रज्ञ लॅरी रोझेन आणि सामाजिक संशोधक शेरी टर्कल यांच्या कार्यातून पुढे आला. Rosen (2012) यांच्या मते, टेक्नोफरन्स म्हणजे तंत्रज्ञानामुळे मानवी संवादखंडीत होणे किंवा त्याची गुणवत्ता कमी होणे, तर Turkle (2011) या संकल्पनेला “The robotic nature of digital distraction” असे संबोधतात.

McDaniel आणि Coyne (2016) यांनी दिलेली सर्वमान्य व्याख्या अशी आहे: “Technoference refers to everyday interruptions in face-to-face communications or interactions between people that occur due to the presence or use of technology.” “मानवी प्रत्यक्ष संवादादरम्यान उपस्थित तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या दैनंदिन व्यत्ययांना टेक्नोफरन्स असे म्हणतात.”

याचे काही सर्वसामान्य उदाहरणे पुढीलप्रमाणे —

  • संभाषणादरम्यान सतत फोनकडे पहाणे (Phubbing)
  • नोटिफिकेशन वाचण्यासाठी संवाद थांबवणे
  • जेवताना सोशल मीडिया स्क्रोल करण्यात व्यस्त राहणे
  • मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मोबाइलवरील व्हिडिओ पाहणे
  • जोडीदाराशी बोलताना अनायासे स्क्रीनकडे पहाणे

ही सर्व उदाहरणे दर्शवितात की टेक्नोफरन्स हा केवळ तांत्रिक संज्ञा नसून एक मनो-सामाजिक घटना आहे.

संकल्पनेची पार्श्वभूमी:

2014 नंतर या संकल्पनेवर विशेष लक्ष दिले गेले, कारण स्मार्टफोन आणि सोशल मीडिया यांचा वापर झपाट्याने वाढला. संशोधकांनी लक्षात आणून दिले की तंत्रज्ञानामुळे होणारे व्यत्यय आंतरवैयक्तिक नातेसंबंध, पालकत्व, मैत्री, प्रेमसंबंध, आणि अगदी कामाच्या ठिकाणीही दिसू लागले (Roberts & David, 2016).

या विषयावर सर्वात महत्वाचा शोधनिबंध म्हणजे McDaniel आणि Coyne (2016) यांचा “Technoference in Parenting” अभ्यास. त्यांनी 337 पालकांवर केलेल्या अभ्यासातून सिद्ध केले की:

  • पालकांकडून वारंवार होणाऱ्या फोन वापरामुळे मुलांमध्ये भावनिक अस्थिरता वाढते
  • मुलांचे लक्ष विचलित होते
  • वर्तन-संबंधी समस्या वाढतात (उदा. राग, अस्थिरता, असहकार)
  • पालक-मुलं नात्यातील भावनिक जवळीक कमी होते

त्यांनी असे स्पष्ट केले की टेक्नोफरन्स हा पालकत्वाचा अदृश्य पण गंभीर ताण आहे, ज्यामुळे पालक-मुलांच्या संवादाची गुणवत्ता प्रभावित होते.

Turkle (2011) यांनी त्यांच्या Alone Together या ग्रंथात लिहिले आहे की: “Technology gives us the illusion of companionship without the demands of relationships.”

या विचाराला पुढे नेत Clayton et al. (2018) यांनी असे सिद्ध केले की जोडीदारांमध्ये टेक्नोफरन्स वाढला की भावनिक समाधान कमी होते, विश्वास घटतो आणि संबंधात तणाव वाढतो.

टेक्नोफरन्सची लक्षणे

1. संभाषणात एकाग्रता नसणे (Lack of Attentional Engagement)

टेक्नोफरन्समुळे सर्वात प्रथम दिसणारे लक्षण म्हणजे संवादादरम्यान एकाग्रता कमी होणे. जेव्हा व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना मोबाईल स्क्रीनकडे पाहते, संदेश तपासते किंवा नोटिफिकेशनला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिचे लक्ष विभागले जाते. याला मानसशास्त्रात “Attentional Fragmentation” असे म्हटले जाते (Rosen, 2012).

संवाद खंडित होण्यामुळे केवळ माहिती ग्रहण करण्यात अडथळा निर्माण होत नाही, तर समोरच्या व्यक्तीला दुर्लक्षित केल्याची भावना निर्माण होते. McDaniel आणि Coyne (2016) यांच्या संशोधनानुसार, जोडीदारांमधील तंत्रज्ञानाचा हस्तक्षेप वाढला, तितक्या प्रमाणात संवादाची गुणवत्ता आणि नात्यावरील समाधान कमी झाले. हे लक्षण विशेषतः “Phubbing” (Phone + Snubbing) रूपात दिसते – म्हणजे व्यक्तीला दुर्लक्षित करून फोनला महत्त्व देणे.

2. भावनिक जवळीक कमी होणे (Reduced Emotional Intimacy)

टेक्नोफरन्समुळे भावनिक संवादात व्यत्यय निर्माण होतो. भावनिक जवळीक ही सततचे ऐकणे, लक्ष देणे, परस्पर प्रतिसाद आणि सहानुभूती यावर आधारित असते. परंतु स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणांची सतत उपस्थिती हे घटक कमजोर करतात.

Sherry Turkle (2011) यांनी “Alone Together” या पुस्तकात असे नमूद केले आहे की तंत्रज्ञानामुळे आपण “connected” आहोत, परंतु “emotionally present” नाही. संशोधकांचा दावा आहे की मोबाईल वापरामुळे व्यक्तीचे नजरेला नजर देऊन संपर्क कमी होतो, देहबोली बदलते आणि भावनिक अभिव्यक्तीला अडथळा येतो, ज्यामुळे भावनिक जवळीक कमी होते (Krasnova et al., 2013). याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये एकटे असण्याची भावना, भावनिक अंतर आणि असंतोष वाढतो, जरी ते प्रत्यक्षात एकत्र बसलेले असले तरी.

3. काळजी व अस्वस्थता वाढणे (Increased Anxiety & Restlessness)

टेक्नोफरन्सचा मानसशास्त्रीय दुष्परिणाम म्हणजे सततची मानसिक अस्वस्थता आणि काळजीची भावना. “Notification Anxiety” हा एक नव्या काळातील मानसिक घटक आहे, ज्यात व्यक्ती सतत एखाद्या संदेश, कॉल किंवा अपडेट येईल का, या भीतीत राहते (Rosen, 2012). तंत्रज्ञानापासून काही वेळ दूर राहिल्यास Nomophobia (No Mobile Phone Phobia) दिसते.

American Psychological Association (2022) च्या “Stress in America” रिपोर्टनुसार डिजिटल हस्तक्षेपामुळे होणारा ताण, चिंता आणि अस्वस्थतेचे प्रमाण 40% पर्यंत वाढले आहे. विशेषतः तरुणांमध्ये सोशल मीडिया ‘likes’ आणि ‘views’ वर मानसिक अवलंबित्व निर्माण होते आणि ते मिळाले नाहीत तर बेचैनी वाढते. याला Reward Prediction Error and Social Comparison Anxiety असे म्हणतात (Berridge & Robinson, 2016).

4. सोशल मीडिया नोटिफिकेशनचे सतत निरीक्षण (Compulsive Checking of Notifications)

हे टेक्नोफरन्सचे सर्वात दृश्यमान लक्षण आहे. व्यक्ती अगदी 5-10 मिनिटांच्या अंतराने सतत फोन अनलॉक करून नोटिफिकेशन तपासते, जरी काही महत्त्वाचे आलेले नसले तरी. यामागे Dopamine Reward Loop कार्यरत असतो — प्रत्येक नवीन नोटिफिकेशनला मेंदू बक्षीस (reward) समजतो आणि ते न मिळाल्यास बेचैनी निर्माण होते (Alter, 2017).

Kaspersky Lab (2020) च्या अहवालानुसार, 70% लोक दिवसातील 50 हून अधिक वेळा फोन तपासतात, आणि त्यापैकी बहुतेक वेळा कोणतेही आवश्यक कारण नसते. हे वर्तन Habitual Checking आणि Digital Compulsion म्हणून ओळखले जाते आणि त्यातून पुढे व्यसनाधीनतेसारखी लक्षणे दिसू लागतात.

5. तंत्रज्ञानाशी भावनिक जोड (Emotional Dependency on Technology)

टेक्नोफरन्सचा सर्वात गंभीर पैलू म्हणजे तंत्रज्ञानाशी भावनिक नाते निर्माण होणे. याला “Emotional Offloading on Technology” असे म्हणतात म्हणजे भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार घेणे. उदा.

  • एकटे वाटल्यावर सोशल मीडिया स्क्रोल करणे
  • तणाव आला की यूट्यूब किंवा रील्स पाहणे
  • प्राप्त होणाऱ्या “likes”, “comments” मधून आत्ममूल्याचा अनुभव घेणे

Turkle (2015) यांच्या मते तंत्रज्ञान “कनेक्शनचा आभास” देते, परंतु प्रत्यक्ष भावनिक गरजा पूर्ण करत नाही. तंत्रज्ञानामुळे मिळणारी तात्कालिक समाधानाची भावना (instant gratification) मेंदूमध्ये dopamine-dependent conditioning निर्माण करते आणि जेव्हा तंत्रज्ञान उपलब्ध नसते, तेव्हा रिक्तता, चिडचिड आणि अस्वस्थता वाढते.

टेक्नोफरन्स ही केवळ तांत्रिक किंवा व्यवहारिक समस्या नसून बोधनिक, भावनिक आणि सामाजिक परिणाम घडवणारी बहुआयामी मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. तिची लक्षणे सूक्ष्म, पण सर्वव्यापी आहेत आणि या प्रत्येक लक्षणातून मानवी नात्यांची गुणवत्ता, मानसिक आरोग्य आणि स्वतःशी असलेले नाते प्रभावित होत जाते.

टेक्नोफरन्स आणि मानवी नात्यांवरील परिणाम

1. पती-पत्नी संबंध (Marital/Partner Relationships)

टेक्नोफरन्सचा सर्वाधिक परिणाम जोडीदारांच्या नात्यावर दिसून येतो. डिजिटल उपकरणांचा सतत वापर, नोटिफिकेशनचे व्यसन, सोशल मीडिया स्क्रोलिंग या गोष्टींमुळे जोडीदारांकडे दिले जाणारे लक्ष कमी होते. McDaniel आणि Coyne (2016) यांच्या अभ्यासानुसार, जे जोडपे संभाषणादरम्यान मोबाईलकडे सतत पाहतात त्यांना नात्यातील समाधान आणि भावनिक जवळीक कमी असल्याचे आढळले. याला “Phubbing” असे म्हटले जाते, Phone + Snubbing म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करून फोनकडे बघणे. या वर्तनामुळे जोडीदारात असुरक्षितता, दुर्लक्षिततेची भावना आणि नात्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो. संशोधन दर्शवते की सततच्या डिजिटल हस्तक्षेपामुळे संभाषणाचा दर्जा घसरतो, कारण संवाद तुटक आणि अपूर्ण राहतो, ज्यामुळे भावनिक एकात्मता कमी होते (Roberts & David, 2017). यामुळे नातेसंबंधातील समाधान, भावनिक सुरक्षितता आणि बांधिलकी या घटकांवर नकारात्मक परिणाम होतो. काही संशोधन दर्शवते की फबिंगमुळे पार्टनरमध्ये मत्सर, असुरक्षितता आणि तणावाचे मानसिक लक्षण वाढतात (Wang et al., 2022).

2. पालक – पाल्य संबंध (Parent–Child Relationships)

टेक्नोफरन्स फक्त पती-पत्नी संबंधातच नाही तर पालक आणि मुलांमधील संवाद देखील बदलतो. जेव्हा पालक मुलांशी बोलताना मोबाइल तपासतात, नोटिफिकेशनला उत्तर देतात किंवा सोशल मीडिया वापरतात, तेव्हा मुलांना आपल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना निर्माण होते. McDaniel (2019) यांच्या संशोधनात आढळले की, पालक सतत फोनकडे लक्ष देत असल्यास मुलांमध्ये वर्तन समस्या जसे चिडचिड, आक्रमकता आणि भावनिक अस्थिरता दिसते. मुलांशी खेळताना, जेवताना किंवा बोलताना पालक सतत डिजिटल साधनांकडे वळत असल्यास मुलांच्या भाषा विकासावर आणि सामाजिक कौशल्यांवर परिणाम होतो (Radesky et al., 2015). कारण बालकांचे सामाजिक-भाषिक कौशल्य हे सततच्या डोळसंपर्क, भावनिक प्रतिसाद आणि थेट संवादावर अवलंबून असते. त्याउलट, पालकांचे लक्ष उपकरणांवर केंद्रीत झाल्यास मुलांना ‘connection starvation’ जाणवते, ज्यामुळे आक्रमकता आणि दुर्लक्षिततेची मानसिक जखम निर्माण होते (Hiniker et al., 2016). काही संशोधन दाखवते की अशा मुलांमध्ये पुढे peer adjustment difficulties, attention disorders आणि emotion regulation समस्याही दिसतात.

3. मैत्री आणि सामाजिक संबंध (Friendship and Social Connectivity)

टेक्नोफरन्समुळे प्रत्यक्ष मैत्रीची जागा आभासी संवाद घेत आहे. सोशल मीडियावरील ‘चॅट’, ‘लाईक’, ‘स्टोरीज’ हे एक प्रकारचे symbolic interaction असले तरी, ते प्रत्यक्ष संवादातील भावनिक खोली, देहबोली, अशाब्दिक संकेत आणि सहानुभूतीचे आदानप्रदान यांची जागा घेऊ शकत नाहीत. Turkle (2011) यांनी दाखवून दिले आहे की डिजिटल संबंधांमुळे व्यक्ती “alone together” परिस्थितीत अडकतात, जिथे ते ऑनलाइन जोडलेले असतात पण भावनिकदृष्ट्या एकाकी असतात. संशोधन दर्शवते की सोशल मीडियावरून ‘Online Validation’ म्हणजे लाइक्स, कमेंट्स, फॉलोअर्स यावर अवलंबित्व वाढते, आणि त्याच्याशिवाय स्वतःच्या मूल्याची जाणीव कमी होते (Baker & Algorta, 2016). यामुळे प्रत्यक्ष मैत्रीचे बंध कमकुवत होतात, कारण व्यक्ती डिजिटल प्रतिमेच्या व्यवस्थापनात इतके गुरफटतात की खरी नाती कमजोर होतात. परिणामतः, मैत्रीचे गुणात्मक स्वरूप बदलते, गहिरा संवाद कमी होतो, आणि व्यवहार ‘सामाजिक देवाणघेवाण’ पेक्षा ‘डिजिटल एक्सचेंज’वर आधारित होतो.

मानसिक आरोग्यावर परिणाम (Impact on Mental Health)

  • चिंताग्रस्तता: सतत ऑनलाइन उपस्थित राहण्याची गरज आणि कोणत्याही क्षणी संदेश चुकू नये याची भीती यामुळे ‘always-on anxiety’ निर्माण होते. APA (2022) च्या अहवालानुसार, सोशल मीडिया आणि नोटिफिकेशनच्या सतत संपर्कामुळे तणाव निर्देशांक 40% ने वाढतो. व्यक्तीला सतत “काहीतरी चुकत नाही ना?” ही काळजी त्रास देते.
  • Nomophobia (फोन नसल्याची भीती): “मोबाइल जवळ नाही म्हणजे मी असुरक्षित आहे” या भावनेला Nomophobia म्हणतात. King et al. (2013) च्या अभ्यासानुसार, ही भावना panic disorder प्रमाणेच शरीर-मनावर परिणाम करते, हातात फोन नसला तर हृदयाचे ठोके वाढणे, अस्वस्थता, चिडचिड आणि अति तणाव निर्माण होतो.
  • Attention Deficit (लक्ष विचलन): सतत नोटिफिकेशन, अॅप्स आणि मल्टिटास्किंगमुळे मेंदूची Attention Switching Capacity वाढते आणि खोल ध्यान (Deep Focus) कमी होते. Rosen (2012) यांनी सांगितले की, सतत स्क्रीन बदलणे हे Working Memory वर नकारात्मक परिणाम करते. मुलांमध्ये यामुळे पुढे ADHD सारखी लक्षणे दिसू शकतात.
  • Sleep Disturbance (झोपेचे विकार): झोपेपूर्वी सोशल मीडिया किंवा स्क्रीन वापरल्यास Blue Light मुळे मेलाटोनिन हार्मोनचे प्रमाण कमी होते, परिणामतः झोप येण्यास विलंब होतो व झोपेची गुणवत्ता खालावते (Hale & Guan, 2015). रात्री उशिरापर्यंत फोन वापरणे हे Delayed Sleep Phase Syndrome ला कारणीभूत ठरते.
  • Dopamine Addiction (डोपामिन व्यसन): लाइक्स, कमेंट्स, रील्स यांमधून मिळणारा तात्पुरता आनंद हा Dopamine Reward Loop निर्माण करतो. Montag et al. (2018) यांच्या संशोधनानुसार हे मेंदूतील reward pathways वर ड्रग्सप्रमाणेच परिणाम करते. त्यामुळे फोन न वापरल्यास मेंदूला “इमोशनल व्रजिंग” जाणवू लागते.

टेक्नोफरन्स कमी करण्याचे उपाय

1. Digital Boundaries (डिजिटल सीमारेषा)

डिजिटल सीमारेषा म्हणजे तंत्रज्ञानाच्या वापराबाबत ठराविक नियम, वेळ आणि जागा निश्चित करणे. जेवणाच्या वेळी फोन न वापरणे हा तांत्रिक हस्तक्षेप कमी करण्याचा सर्वात प्राथमिक आणि प्रभावी उपाय मानला जातो. McDaniel & Coyne (2016) यांच्या अभ्यासात असे आढळले की जेवताना फोनच्या वापरामुळे संभाषणाची गुणवत्ता कमी होते, भावनिक जवळीक कमी होते आणि कुटुंबातील सदस्यांना 'दुर्लक्षित' झाल्याची भावना निर्माण होते. यामुळे दीर्घकालीन कौटुंबिक बंध कमी होतात. म्हणून अनेक संशोधक “Technology-Free Meals” हा तंत्रज्ञानशिक्षणाचा पहिला टप्पा मानतात.

"No Phone Zone" म्हणजे ठराविक जागा जिथे फोन, टॅबलेट, स्मार्टवॉच यांचा वापर पूर्णपणे बंद असतो. उदाहरणार्थ शयनकक्ष, पूजा घर, जेवणाची टेबल, किंवा मुलांशी खेळण्याची जागा. Turkle (2011) यांच्यानुसार, जेव्हा व्यक्ती फोनविरहित जागेत काही काळ घालवतात तेव्हा त्यांच्या attention span, भावनिक उपलब्धता आणि वास्तविक संवादकौशल्यात सुधारणा दिसते.

मुलांसोबत वेळ घालवताना तंत्रज्ञान मुक्त वातावरण तयार करणे हे विशेषतः पालकांसाठी महत्त्वाचे आहे. “Technoference in Parenting” या संकल्पनेनुसार मुलं मोठ्यांच्या फोन वापराचे अनुकरण करतात आणि पालकांना भावनिकपणे अनुपलब्ध अनुभवतात. Radesky et al. (2014) यांनी सिद्ध केले की पालकांचा तंत्रज्ञानातील अधिक सहभाग, मुलांच्या लक्ष वर्तनात, भाषिक विकासात आणि भावनिक प्रतिसादामध्ये नकारात्मक बदल घडवतो. त्यामुळे मुलांसोबत खेळताना किंवा बोलताना “digital fasting” हा मानसशास्त्रीय दृष्ट्या फायदेशीर हस्तक्षेप आहे.

2. Notification Hygiene (नोटिफिकेशन स्वच्छता)

नोटिफिकेशन स्वच्छता म्हणजे अनावश्यक अलर्ट, पिंग, वायब्रेशन, रिमाइंडर इत्यादी नियंत्रितपणे बंद करणे आणि केवळ आवश्यक सूचना चालू ठेवणे. आजच्या काळात फोनवरील नोटिफिकेशन “dopamine-triggering micro-rewards” प्रमाणे कार्य करतात (Alter, 2017). त्यामुळे अनावश्यक नोटिफिकेशन बंद केल्यामुळे मेंदूचे attention shifting कमी होते आणि संवाद किंवा कामातील लक्ष केंद्रीत राहते.

स्क्रीन टाइम मर्यादा ठरवल्याने वापर सवयी नियमित होतात. Apple Screen Time आणि Digital Wellbeing सारख्या साधनांचा वापर करून लोक दररोजच्या डिजिटल वापराचे निरीक्षण करू शकतात. संशोधनानुसार, जेव्हा व्यक्ती स्वतःची तंत्रज्ञान वापर पद्धत मोजतात, तेव्हा त्यांचे वापर नियंत्रणात येण्याची शक्यता 38% अधिक असते (Pew Research, 2022).

रात्री ‘Do Not Disturb’ मोड वापरणे झोपेच्या गुणवत्ता आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. Harvard Medical School Sleep Research (2019) नुसार झोपण्यापूर्वी व झोपेच्या काळात फोन वापर हायपरअक्टिविटी, चिंता, आणि झोपेचे विकार वाढवतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटे फोन बंद ठेवणे किंवा DND मोड लावणे हे प्रभावी डिजिटल सवयीचे एक उदाहरण आहे.

3. Mindful Usage (सजग डिजिटल वापर)

Mindful Usage म्हणजे तंत्रज्ञान मन लावून, सजगतेने आणि स्वतःच्या नियंत्रणाखाली वापरणे. यामध्ये “Digital Autopilot” मोडमधून बाहेर पडून “Selective Engagement” मोडमध्ये प्रवेश करणे अपेक्षित असते. म्हणजेच, फोन हातात घेताना स्वतःला विचारणे “हे खरंच आवश्यक आहे का?”

या छोट्याशा प्रश्नामुळे वापर 20–30% ने कमी होऊ शकतो (Rosen, 2012).

प्रत्यक्ष संवादाला प्राधान्य देणे हे टेक्नोफरन्स कमी करणारे सर्वात महत्त्वाचे मानवी वर्तन आहे. Turkle (2015) यांच्या "Reclaiming Conversation" या ग्रंथात नमूद केले आहे की “Screen presence cannot replace Real presence.” फोनशिवाय चालणारा मानवी संवाद Empathy, Emotional Resonance आणि Relationship Satisfaction वाढवतो. संशोधनानुसार निवडक तंत्रज्ञान वापरणारे लोक जास्त आनंदी, कमी चिंताग्रस्त आणि नात्यांमध्ये अधिक समाधानी असतात (APA Annual Report, 2022).

4. सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवरील उपाय

  • शाळांमध्ये Digital Well-being Education: शैक्षणिक पातळीवर “Digital Citizenship” आणि “Healthy Tech Habits” यांचा समावेश करणे जगभरातील शालेय अभ्यासक्रमात आवश्यक होत आहे. UNESCO (2021) अहवालानुसार डिजिटल शिक्षणात “Digital Discipline Skills” शिकवणाऱ्या शाळांतील मुलांचे स्क्रीन व्यसन कमी दिसते आणि त्यांची एकाग्रता व सामाजिक कौशल्य अधिक विकसित होताना आढळतात.
  • कौटुंबिक डिजिटल सवयी: संशोधकांचे मत आहे की तंत्रज्ञानाचा व्यवस्थित वापर हा वैयक्तिक नाही, तर संयुक्त कुटुंबीय नियमांवर आधारित असला पाहिजे (Hiniker, 2016). उदाहरणार्थ, आठवड्यातील एक दिवस “Screen-Free Day”, जेवताना “Device Basket Rule”, रात्री एक ठराविक वेळ फोन बाहेर ठेवणे इत्यादी.
  • कार्यस्थळी ‘No Gadget Meetings’ धोरण: कार्यालयीन कामाच्या ठिकाणी तंत्रज्ञानाशिवाय बैठक घेण्याचे प्रमाण वाढत आहे. Harvard Business Review (2023) यांनी नमूद केले की “No Phone Meetings” असलेल्या कंपन्यांमध्ये सहभाग 26% अधिक, एकाग्रता 34% अधिक आणि चर्चा परिणामकारकता 40% अधिक असते. काही संस्थांनी “Device Parking Zone” धोरणही स्वीकारले आहे.

टेक्नोफरन्स कमी करणे हे केवळ तंत्रज्ञान टाळण्याबद्दल नाही, तर मानवी नात्यांना, ध्यान प्रक्रियेला, आणि मानसिक आरोग्याला पुन्हा प्राधान्य देण्याबद्दल आहे. डिजिटल सीमारेषा, नोटिफिकेशन नियंत्रण, सजग वापर आणि सामाजिक पातळीवरील धोरणात्मक हस्तक्षेप यांच्या मदतीने टेक्नोफरन्स कमी करता येऊ शकतो हे संशोधनाने सिद्ध केले आहे.

समारोप:

टेक्नोफरन्स हे केवळ तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम नसून मानवी नातेसंबंधांच्या गुणवत्तेवरील एक मोठे मानसशास्त्रीय आव्हान आहे. तंत्रज्ञानाचे महत्त्व निर्विवाद आहे, परंतु मानवी संवादाची जागा मशीन घेऊ लागली, तर भावनिक अंतर वाढण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून तंत्रज्ञानाचा वापर शहाणपणाने करणे हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे सामाजिक कौशल्य ठरत आहे.

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Alter, A. (2017). Irresistible: The Rise of Addictive Technology and the Business of Keeping Us Hooked. Penguin.

American Psychological Association. (2022). Stress in America Survey Report.

Andrews, S. et al. (2015). Mobile phone use and stress. Computers in Human Behavior. 55, 1-9.

Baker, D. A., & Algorta, G. P. (2016). The relationship between online social networking and depression: A systematic review of quantitative studies. Cyberpsychology, Behavior, and Social Networking, 19(11), 638–648.

Clayton, R. B., Nagurney, A., & Smith, J. R. (2018). The impact of technoference on relationship satisfaction. Psychology of Popular Media, 7(4), 384–398.

Hale, L., & Guan, S. (2015). Screen time and sleep among school-aged children and adolescents: A systematic literature review. Sleep Medicine Reviews, 21, 50–58.

Harvard Business Review. (2023). The Case for Device-Free Meetings.

Harvard Medical School. (2019). Sleep and Technology Report.

Hiniker, A. (2016). “The Role of Family Digital Rules.” CHI Proceedings.

Hiniker, A., Schoenebeck, S., & Kientz, J. A. (2016). The moral character of technoference: Parents’ perspectives on technology use with their children. In Proceedings of the 2016 CHI Conference on Human Factors in Computing Systems (pp. 1598–1609). ACM.

King, A. L. S., et al. (2013). Nomophobia: Dependency on virtual environments or social networks? Computers in Human Behavior, 29(1), 140–144.

McDaniel, B. T., & Coyne, S. M. (2016). Technoference: The interference of technology in couple relationships and implications for women’s personal and relational well-being. Psychology of Popular Media Culture, 5(1), 85–98.

Montag, C., & Reuter, M. (2018). Internet Addiction: Neuroscientific Approaches and Therapeutical Implications. Springer

Pew Research Center. (2022). Technology Use Report.

Radesky, J. S., Kistin, C. J., Zuckerman, B., Nitzberg, K., Gross, J., Kaplan-Sanoff, M., Augustyn, M., & Silverstein, M. (2014). Patterns of mobile device use by caregivers and children during meals in fast-food restaurants. Pediatrics, 133(4), e843–e849.

Radesky, J. S., Schumacher, J., & Zuckerman, B. (2015). Mobile and interactive media use by young children: The good, the bad, and the unknown. Pediatrics, 135(1), 1–3.

Roberts, J. A., & David, M. E. (2016). My life has become a major distraction from my cell phone: Partner phubbing and relationship satisfaction. Computers in Human Behavior, 54, 134–141.

Roberts, J. A., & David, M. E. (2017). Put down your phone and get to know me: How can phubbing affect intimacy? Computers in Human Behavior, 69, 8–14.

Rosen, L. D. (2012). iDisorder: Understanding our obsession with technology and overcoming its hold on us. Palgrave Macmillan.

Turkle, S. (2011). Alone together: Why we expect more from technology and less from each other. Basic Books.

Turkle, S. (2015). Reclaiming conversation: The power of talk in a digital age. Penguin Press.

UNESCO. (2021). Digital education and well-being guidelines.

Wang, X., Xie, X., Wang, Y., Wang, P., & Lei, L. (2022). Partner phubbing and depression among married adults: A mediated moderation model. Journal of Social and Personal Relationships


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन (Systematic Desensitization): एक मानसशास्त्रीय उपचारतंत्र

  सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन ( Systematic Desensitization): एक मानसशास्त्रीय उपचारतंत्र सिस्टेमॅटिक डीसेंसीटायझेशन हे वर्तनवादी परंपरेत वि...