बुधवार, ४ फेब्रुवारी, २०२६

योग मानसशास्त्र | Yoga Psychology |

 

योग मानसशास्त्र (Yoga Psychology) 

आधुनिक मानसशास्त्राचा विकास मुख्यतः पाश्चात्त्य वैज्ञानिक परंपरेत झाला असून, त्याचा भर मानवी वर्तन, बोधनिक प्रक्रिया, भावना तसेच विविध मानसिक विकारांचे निदान व उपचार यांवर राहिला आहे. वर्तनवाद, बोधनिक मानसशास्त्र, मनोविश्लेषण आणि आधुनिक जैविक दृष्टिकोन या प्रवाहांनी मनाच्या विशिष्ट पैलूंवर सखोल अभ्यास केला असला, तरी मानवाच्या अंतःकरणातील रूपांतरण (inner transformation) हा मुद्दा तुलनेने मर्यादित राहिला आहे (जोशीग. ना., 2004).

याच्या उलट, भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतील योग ही संकल्पना केवळ शारीरिक आरोग्य किंवा व्यायामापुरती मर्यादित नसून, ती मन, भावना आणि चेतना यांच्या शुद्धीकरणाची एक समग्र व शास्त्रबद्ध प्रणाली आहे. योगामध्ये मनाला केवळ निरीक्षणाचा विषय न मानता, त्याचे संयमन, अविष्कार आणि अनुभवातीत (transcendence) कसे जाता येते यावर भर दिला जातो. त्यामुळे योग हा केवळ health practice नसून एक मानसिक व अस्तित्ववादी शास्त्र ठरतो (Feuerstein, 2012).

योग मानसशास्त्र | Yoga Psychology |

  योग मानसशास्त्र ( Yoga Psychology)   आधुनिक मानसशास्त्राचा विकास मुख्यतः पाश्चात्त्य वैज्ञानिक परंपरेत झाला असून , त्याचा भर मानवी वर्तन...