मानसशास्त्रीय
प्रथमोपचार
आम्ही इयत्ता आठवीत असताना शाळेत प्रथमोपचार याबद्दल प्रशिक्षण झालेले होते. त्यात आम्हाला सांगण्यात आले होते की, प्रथमोपचार म्हणजे एखाद्या आजारात किंवा अपघात झाल्यास केलेले प्राथमिक उपचार. 14 सप्टेंबर हा दिवस प्रथमोपचार दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रथमोपचार हे सामान्यत: एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीद्वारे एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट वैद्यकीय उपचार उपलब्ध होईपर्यंतच्या काळात दिले जातात. पण मानसशास्त्रीय प्रथमोपचार (PFA) हे एक तंत्र जागतिक पातळीवर अनेक अपघात आणि आपत्ती निर्माण झाल्यावर मानसिक आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन 21 व्या शतकाच्या सुरुवातीस उदयास आलेले आहे.