स्मृती
सुधार तंत्रे (Improve Memory Effectively)
मानवी जीवनात स्मृती ही बुद्धीच्या कार्यप्रणालीचा एक
महत्त्वपूर्ण घटक आहे. शिक्षण, व्यवसाय,
नातेसंबंध
आणि दैनंदिन जीवनातील लहानमोठ्या कामांसाठी स्मरणशक्तीची भूमिका अत्यंत निर्णायक
ठरते. परंतु विस्मरण, एकाग्रतेचा अभाव,
माहितीचे
overload,
मानसिक
ताणतणाव यामुळे स्मृती कमी होऊ लागते. मानसशास्त्रज्ञ,
न्यूरोसायन्स
तज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांनी स्मृती सुधारण्यासाठी अनेक प्रभावी तंत्रांचा अभ्यास
केला आहे.
1.
अवधान/लक्ष केंद्रीकरण (Attention and Focus)
स्मरणशक्तीच्या कार्यप्रणालीमध्ये लक्ष केंद्रीकरण (attention)
ही
सर्वात महत्त्वाची पायरी मानली जाते. आपण एखाद्या गोष्टीकडे कितपत लक्ष देतो यावरच
ती माहिती अल्पकालीन स्मृतीत टिकते आणि त्यानंतर
दीर्घकालीन स्मृतीत साठवली जाण्याची
शक्यता ठरते (Craik & Lockhart, 1972).
मानसशास्त्रातील Levels of Processing Theory नुसार,
सखोल पातळीवर दिलेले लक्ष आणि अर्थपूर्ण प्रक्रिया ही माहिती
दीर्घकाळासाठी लक्षात ठेवण्यास मदत करते. जर अभ्यास करताना किंवा दैनंदिन कार्य
करताना लक्ष विचलित झाले, तर माहिती पृष्ठभागी प्रक्रिया (shallow
processing) होते आणि विस्मरणाची गती वाढते.